आयुष्य...
आयुष्य...
जीवन जगणं काय असत
दु:खात असतांनाही चेहऱ्यावरती
एक छोटंस हात्स्य आणावं लागतं
स्वप्नपुर्तिच्या आकाशात उडता उडता
एक छोटंस पाखरु होउन कधी कधी
अपयशाच्या झाडावर बसाव ही लागतं
येवढ्याशा संकटाला घाबरून कस चालेल
अजुन आपली खूप स्वप्न बाकी आहेत
अस म्हणुनी पुन्हां एकदा उंच उडाव लागतं
कीतीही मोठ संकट का येइना आपल्या मानसांचा
हात सोडून देन हे माणुसकीच उदाहरण नसतं
ह्या क्रूर जगांत मुक्या प्राण्यांना जीव लावुन
त्यांना ही आपलसं कराव लागतं
आज नाही उद्या भेटु अजुन दुसऱ्यांसाठी जगनं
बाकी आहे अस म्हणत मृत्युंला हि टाळाव लागतं
शेवटी कशाचीही चिंता न करता चार खांद्यांवर
जाउनी सरणावर राख व्हाव लागतं
अखेर जीवन जगणं हेच तर असतं....
