आवाज माझा
आवाज माझा
माझ्या मनात भावांना जागवू कितीदा
ओलावले नयन अश्रू दाखवू कितीदा..
संवेदना उरी रंगुनी गुप्त लुप्त का
गंधाळल्या मनी आशा मोहरू कितीदा..
पालव सुगंध नात्याचा शांत हुंदका का
ओरखडले तना आवंढा गिळू कितीदा..
आर्त पुकारते छळती सावल्या छटांना
आर्जविते मना रात्रीं ना ढळू कितीदा..
प्रत्यय प्रतिमा मळल्या जाणिवा मुक्या का
कळले अन्याय दाहक गुपचुप बसू कितीदा
