आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस


अजूनही आठवणीत आहे माझ्या
पहिल्या पावसातलं आपल भिजणं
अखंड प्रेमात न्हावून निघालेलं
तुझं ते लाजिरवाण मनमोहक हसणं
काय बोलाव सुचत नसताना
तु जवळ घेता मन हे बावरायचं
अवचित झालेल्या त्या स्पर्शाने
माझं सारं अंग अंग शहारायचं
रिमझिम पडणार्या पावसामध्ये
एक वेगळाच प्रेमाचा सुगंध होता
आपल्या पहिल्या पहिल्या प्रेमाचा
विलोभनीय बहर खूपच बेधुंद होता
बरसणार्या सरींसवे चालताना
हातातला हात आणखीनच घट्ट होई
मुक्या या अबोल भावनांना
न बोलता स्पर्शातूनि सारं कळून जाई
आयुष्याच्या प्रत्येक पावसात
तुझ्यासोबत भिजायच होतं
पडणार्या प्रत्येक थेंबागणिस
घटट तुला बिलगायचं होतं
आठवतो का रे तुलाही
आपल्या पहिल्या प्रेमाचा पाऊस
नको नको म्हणतानाही
पावसात भिजण्याची ती भारी हौस
परत एकदा तो पाऊस यावा
ज्यामध्ये तु सोबती होशील
येणार्या प्रत्येक क्षणांसाठी
तु फक्त आणि फक्त माझा असशील