आठवणींचा पाऊस
आठवणींचा पाऊस
तुझ्या आठवणींचा पाऊस असा येतो,
मनास माझ्या चिंब भिजवून जातो ….
प्रेमाच्या स्मृती सा-या जागवून जातो,
प्रीतीचा मृदगंध देही भरूनीया उरतो….
त्या पावसात देह माझा मोहरतो,
पिसारा फुलवूनी मनमोर नाचू लागतो ….
थेंबथेंब शब्द होऊन मजसी भुलवीतो,
बीजं प्रेमाचे अंतरात रुजवून जातो…..
तुझ्या मोरपीसी स्पर्शाने जीव वेडावतो,
अन् प्राजक्त होऊनी हळूच ओघळतो….
आठवणींचा पाऊस असा क्षणात येतो,
प्रेमाचे इंद्रधनू मजहाती देऊन जातो….

