STORYMIRROR

Aarti Dingore

Others Children

4  

Aarti Dingore

Others Children

बालपण दे गा देवा

बालपण दे गा देवा

1 min
410

नको द्वेष मत्सरही 

नच कुणाचाही हेवा,

जपण्यास भाव शुद्ध 

बालपण देगा देवा ...


भीती नसावी कशाची

चिंता नसू दे अंतरी,

राहो हास्य निरागस 

सदा माझिया अधरी...


बाधा नको मीपणाची

वारा न लागो अहंचा, 

शुद्ध झरावा निर्झर 

अंतरात रे प्रेमाचा...


आपपरभाव जाता

भेदातीत होता यावे,

धागा तो समानतेचा

विणावया बाल्य हवे...


मुक्त,स्वच्छंद रमावे

बाल्यातील त्या गावात,

झोके घेत झुल्यावरी

गात जीवनाचे गीत...


Rate this content
Log in