आठवण
आठवण
तिन्ही सांजा एक व्हायला आल्या
आठवणी तुझ्या या मनात जागत्या झाल्या,
आपल्या प्रत्येक क्षणाची ती आठवण
मनाच्या कोपऱ्यात करून ठेवते ती साठवण,
आजही हळहळ वाटते या जीवाला
का? कुणी केले असेल दूर आपल्या मनाला,
गिनती न होणाऱ्या प्रेमाला दूर जाताना पाहिले
मन एकाच जागेवर गहिवरून रडत राहिले,
तुझ्या दुनियेला तु स्वतःहून दूरावले
असंख्य गैरसमजाचे पाढे तू मनावर गिरावले,
आजही सुख-दुःखात आठवण तुझी येते
आजपासून ते कालपर्यंतच्या आठवणीत मनाला नेते,
तुझे ते खेळवणे लाडावणे आजही आठवते
ते आठवता आठवता डोळ्यात अश्रू साठवते,
तुझ्या प्रेमाची जिद्द मनात आजही आहे
तुझ्या आठवणीत मी रोज नव्या उमेदीने वाहे

