आठवण
आठवण
प्रिये तु गेलीस आणि माझ्या
जगण्याला एक वेड लावलं ,
खरं तर तुला मि नकोय
हे मला केव्हाच कळलं....!!
तु दिलेले ते वचन मि
आजहि विसरलो नाहि ,
तुला पण् आठवते का
माझ्या बाबतीतहि काहि....?
मला तर आठवते ते आपले
वाळुत बांधलेल छोटसं घर
तुला भिजवत असतांना
पावसाची ति ऐक सर...!!
तुला आठवते का गं ..?
पहिल्या भेटिला आपल्या मि
गुलाबाचं फुल हातात आनलेलं ,
ते तु माझ्या हातानीं
डोक्यात तुझ्या लावलेलं...!!
किती सुंदर लाजायची तु
मि तुझ्या कडे एकटक बघतांना ,
माझे मित्र खुप जळायचे
आपले हातात हात असतांना...!!
प्रिये" दगडा वरचे आपले
नाव अजुनहि तसेच आहे ,
तुझं माझ शेवटी आपलं
ऐकचं तर गाव आहे...!!
बोलत तु असतांना गालात
तुझ्या खळी पडायची ,
मीठीत माझ्या येऊन
तु मनसोक्त रडायची....!!
माझा आता प्रत्येक दिवस
तुझ्या आठवणीत जातो ,
माझ्याचं या आसवांनी
मी ओलचिंब नाहातो...!!
जुने दिवस मला आज
खुपचं छेडत आहेत ,
कारण त्या दिवसांनी सुध्दा
आपले प्रेम पाहिले आहेत...!!

