आठवण येते
आठवण येते
गालात कुणी हसलं की
आठवण तुझी येते
आपलं कुणी भासलं की
आठवण तुझी येते
मनापासून बोललं की
आठवण तुझी येते
नजरेने तोललं की
आठवण तुझी येते
खळीत कुणी लाजलं की
आठवण तुझी येते
गावात कुणी गाजलं की
आठवण तुझी येते
फुलांपरी फुललं की
आठवण तुझी येते
मनझोपाळ्यावर झुललं की
आठवण तुझी येते
प्रेमभावाला मुकलं की
आठवण तुझी येते
खुलून लगेच सुकलं की
आठवण तुझी येते
गंध मातीचा आला की
आठवण तुझी येते
धुंद वारा झाला की
आठवण तुझी येते
हृदयातून आह आला की
अन्
कवितेवर वाह आला की.....
आठवण तुझी येते

