Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashvini Duragkar

Inspirational

3  

Ashvini Duragkar

Inspirational

#आवडते ऐतिहासिक व्यक्तिमत्व...

#आवडते ऐतिहासिक व्यक्तिमत्व...

1 min
500


 इतिहासाची आठवण केली कि एक नाव माझ्या मनात सर्वप्रथम येत ते म्हणजे भगत शाहिद भगत सिंग. एक महान स्वतंत्र सेनानी आणि युवा क्रांतिकारी. त्यांनी इतक्या लहान वयात एवढी मोठी कामगिरी बजावली. आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी त्याचा फार मोलाचा वाटा आहे. 

   म्हणतात ना आपण जस बघतो तसच कृतीतून व्यक्त करतो. भगत सिंग यांच हि तसच झाल. आपल्या बाबांना, भाऊला, काकांना आणि आजूबाजूच्या मंडळींना देशासाठी झटतांनी बघून अगदी लहानपणा पासून त्यांनी क्रांतिकारी बनण्याचा निर्णय घेतला. 

खर तर बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळ्वळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.

लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घ्यावा म्हणून त्यांनी स्कॉट च्या मृत्यूचा कट रचला आणि त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तो कट यशस्वी हि केला. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि अगदी तरुण वयातच ते शहीद झाले. 

  खरं तर काय वय होत त्यांच्या रक्ताच्या एका थेंबाचेही उपकार आपण फेडू शकत नाही. 

जय हिंद जय भारत...



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational