Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शब्दसखी सुनिता

Tragedy Others

4.4  

शब्दसखी सुनिता

Tragedy Others

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

5 mins
483


    माधवी आणि मनोहर दोघेही उच्चशिक्षीतहोते. त्यांना एक मुलगा आशिष. माधवी सिनीअर काॅलेजमध्ये शिक्षिका तर मनोहर प्रसिध्द वकील होते. दोघही एकुलत्या एका मुलाचे खूप लाड करत, त्याला खूप जपत. चांगले संस्कार केले मुलावर. दोघांचही आशीषवर खुप प्रेम होत ,पण काही चुकल तर समजावून सांगत. अशाप्रकारे आशिष खुप लाडात वाढला. त्याला आईवडीलांनी काहीच कमी पडू दिले नाही. त्यालाही त्यांच्या कष्टाची जाणीव होती.त्याने मन लावून अभ्यास केला. तो नेहमी चांगले गुण मिळवत. आशिषआता मोठा झाला होता. त्याने साॅफ्टवेअरइंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे काही सिनीअर मित्र अमेरिकेत नोकरी करून चांगले पैसे मिळवत होते. म्हणून आशिषलाही परदेशात नोकरी करण्याचे वेध लागले. तिकडे चांगल्यासंधी त्याला खुणावत होत्या. त्याने apply केल होत दोन ठिकाणी. आईवडील आशिषसाठी खुश होते. त्याच शिक्षण पूर्ण झाल नि तो नोकरीला लागला की त्याच लग्न करून देऊ अस आई स्वप्न बघत होती. पण आशिषच्या मनातलतिला काय माहीत ? त्याला अमेरिकेतून त्या कंपनीतून नोकरीची ऑफर आली, पॅकेजही चांगल होत म्हणून त्याने होकार दिला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आईबाबांना ही माहीती दिली. त्यांनाही खुप आनंद झाला.पण आशिष आपल्याला सोडून परदेशात जाॅबला जाणार हे ऐकून त्यांना मनातुन दुःख झाल. पण आशिषचा आनंद तोच आपला आनंद म्हणून दोघांनी समजून घेऊन एकमेकांना धीर दिला.दोघांचही वय होत आल होत. आशीषचे बाबात्यांचे मित्र अमेरिकेत होते. तिथे आशिषची सगळी व्यवस्था करण्यास सांगितली. तो थोड्याच दिवसातजाईल म्हणून आई त्याचे खुप लाड करी.आशीषला आवडणारे सगळे पदार्थ ती त्यालाकरून खाऊ घालत. त्याच्या जाण्याच्या आधीत्याचे सगळे फ्रेंन्ड्स आणि ओळखीचे सगळेचफॅमिली पार्टी साठी येऊन आशिषला शुभेच्छा देत होते.    


आशिषचा सगळी कागदपत्र तयार झाली. त्याचीसगळी व्यवस्था तिकडे झाली होती. अखेर तो दिवस उजाडला. आशिष आईवडीलांचा निरोप घेऊन अमेरिकेला गेला.खुप मनातुन वाईटवाटत होते तरी मुलाला हसत हसत निरोप दिला.कधीच ते मुलापासून दुर राहीले नव्हते.पण आपला आशिष खुप मोठा झाला. पण काय कमी हे आपल्याकडे बंगला, गाडी आहे. हे सगळआशिष साठीच आहे. तरी तो भारतात नोकरीकरायच सोडून परदेशात गेला हेच आईला पटतनव्हत. आशीष तिकडे जाऊन नोकरी करू लागला.सगळी त्याची व्यवस्था बाबांमुळे झाली होती.शिवाय मित्र होतेच. ऑफीसच रूटीन चालू झाल.तो आईवडीलांना जस वेळ भेटेल तर काॅल करतहोता. आईबाबा तो तिकडे छान रूळला म्हणूनखुश होते, दिवस जात होते. माधवी आणि मनोहरची नोकरीचे दोन वर्षे बाकी होते. आशिषही चांगल काम करत होता. त्याच प्रमोशन झाल.आईवडीलांना खुप आनंद झाला. कामावरील जबाबदारीमुळे तो फोन कमी करू लागला.      


दोन वर्षांनी माधवी आणि मनोहर निवृत्तझाले होते. दोन वर्षांनी आशिष भारतात आला.आईवडीलांना भेटायला. त्याला आवडणार्‍या भारतातीलच मुलगी पण अमेरिकेत राहणारी.ओळखीच प्रेमात रूपांतर झाल नी त्याने भारतात रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल. आईवडीलांना वाटल.आता लग्न झाल्यावर हा इथेच राहील. पण लग्नानंतर थोड्याच दिवसांनी आशिष त्याच्या बायकोलाघेऊन पुन्हा अमेरिकेला गेला. परत आईवडीलएकटे पडले. आता त्यांचही वय झाल होत. आयुष्यभर कष्ट केले. ते दोघच होते. म्हणून एकमेकांची काळजी घेत.कारण काही झाल तरीमुलगा लांब होता. ते दोघे एकमेकांना आधारदेत होते. त्यांचे मित्र मैत्रिण यांच्यासोबत दिवस घालवत, काही झाल तर शेजारचे मदतीला येत.कारण माधवी आणि मनोहरांनी खुप लोकांना मदत केली होती. आशिषच संसार खुप आनंदात चाललाहोता. नोकरी चांगली चालू होती. तो फोन करायचा. आईवडील त्याच्या फोनची वाटबघायचे. दोन वर्षांनी आशिषला मुलगा होतो.तो त्याच्या आईबाबांना ही गोड आनंदाची बातमी देतो. त्यांना खुप आनंद होतो. आपल्याला नातु झाला. काय करू नि काय नको अस होत. ते दोघही आजी आजोबा झालो म्हणून आपल्यासर्व फ्रेंन्ड्स ला पार्टी देऊन भारतात आनंदसाजरा करतात. आशिष त्यांना बाळाला व्हीडीओकाॅल करून दाखवतो.त्यां ना अजुन आनंद होतो.त्याला भारतात लवकर ये सांगितल. वेळ भेटला की येतो अस सांगितल त्याने आईबाबांना. दिवस जात होते. तशी त्यांना आशिष आणि नातवाला पाहण्याची ओढ लागली. पण तो मात्र अमेरिकेत कामात व्यस्त. वर्ष झाल तरी आशिष आला नव्हता. माधवी मुलाचा खुप विचार करत होती. पण आशीषचा संसार चांगला चालू आहे याचा तिला आनंद झाला.


इकडे आईवडीलांचही वय झाल होत. वयोमानाप्रमाणे प्रकृतीच्या तक्रारी वाढत होत्या. पण ते एकमेकांच्याआधाराने दिवस काढत होते. दोघेही आशिषला कधी येशील भेटायला म्हणून सारख विचाराचे.आशिष दोन वर्षांनी भेटायला येणार म्हणून आईवडील खुप आनंदी होते. पण आशिषचे वडील अचानक गेले. आई एकटीच पडली. खुप रडत होती. तिला त्यांच्या अचानक जाण्याने धक्काच बसला. सगळे शेजारी, मित्र मैत्रीणी आले होते.सगळे माधवीला आधार देत होते. आशिष वीस बावीस तासांच्या प्रवासाने भारतात परतला.खुप वाईट वाटल त्याला... वडील असे अचानक जातील अस त्याला वाटल नव्हत. त्याच्या मुलालाही त्यांनी पाहील नव्हत. आईला आशिषला पाहूनखुप रडत होती. त्यालाही खुप दुःख झाले.बाबांचे सगळे विधी त्याने पार पाडले. त्याला आईबाबांचे कष्ट, मेहनत सगळ काही आठवत होत. आईला त्याने आधार दिला. तो काही बाबांचे सगळे विधी होईपर्यंत आईसोबत होता. त्याला आईची खुप काळजी वाईट वाटत होती. तो आईला अमेरिकेला घेऊन जाणार होता. पण आईने तिकडे यायला नकार दिला. पण भारतात आई एकटी कशी राहणार, तिच सगळ कोण बघणार, तिच वय पण झाल आहे. म्हणून आशीषच्या मित्रांनी आईला शहरातील प्रसिध्द सिनीअर सिटीजन होम्समध्ये तिची व्यवस्था करायची ठरवली. आईने विचार करून अखेर तिथे जायला होकार दिला. आशीषने आईला तिथे ठेवल. आईला बाबा सोडून गेल्याने तिला एकटी पडल्यासारख वाटत होत. पण जेव्हा तिला समजल की या सिनीअर होम्समध्ये ज्यांची मुले मुली परदेशात आहेत असेच लोक आहेत. तिथली महिन्याचे पैसे जास्त होते. पण व्यवस्था खुप छान होती. आशिषने आईसाठी वेळ काढला होता. तो थोडे दिवस भारतात होता. त्याला आईंनीही तिथे तिला आवडणार्‍या सिनीअर सिटीजन होममध्ये मला ठेव म्हणून सांगितलं. तिला ते ठिकाण खुप आवडल होत. ती आशिषसोबत बघून आली होती. तिथेच आशिषने तिच्या म्हणण्यानुसार व्यवस्था केली. थोडे दिवस तिच्यासोबत राहीला.


आईलाही आशिषचा संसार चांगला चालू आहे याचा आनंद होता. ती त्याला त्रास देऊ इच्छित नव्हती. आईनेही त्याच्या मुलाला पाहील. नातू दोन वर्षांचा झाला होता. त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आशीषची बायकोही आईची खुप काळजी घेत. विचारपूस करत. आईला आतामैत्रिणी मिळाल्या. त्या तिथे वेगवेगळ्याॲक्टीव्हीटीजमध्ये सहभागी होत. तिथला स्टाफ चांगला होता. खुप व्यवस्थित काळजी घेत.आई रमली हे पाहून त्याने आईला अमेरिकेला मी परत चाललोय हे सांगितल आईने त्याला एवढच सांगितल की जा पण मला फोन करत जा.दोन मिनीट तरी माझ्याशी बोलत जा. " तु मलाइथ ठेवल खुश आहे मी. माझी काळजी करू नको."फक्त तुझा थोडा वेळ देत जा बाकी मला काही नको. त्याचे डोळे पाणावले. आईने परत त्याला प्रेमाने जवळ घेऊन व्यवस्थित जा. खुश राहा सांगितलै. आशिषला त्याची चुक कळली होती.मी दोन वर्षांनी आलो तर बाबा मी यायच्या आत मला सोडून गेले.खरच पैसा हे सर्वस्व नाही. परत तीच नको व्हायला म्हणून तो स्वतः आईला भेटायला तिन महिन्यांनी यायचा. कधी काही झालं तर लगेच काॅल करा अस त्याने सिनीअर सिटिजन होमच्या स्टाफला बजावल होत.


तो आता भारतीय वेळेप्रमाणे आईला सकाळीच रोज आठवणीने काॅल करायचा. माधवी व्हीडीओ काॅल करून नातवाशी, सुनेशी गप्पा मारायची.ते दूर असून जवळ आहेत अस वाटायच तिला.खुप छान दिवस ती तिथे आनंदात घालवत होती.ते वृध्दाश्रम म्हणजेच तिच दुसर घर झाल होत.प्रत्येक दिवस तिचा छान आणि मजेत जात होता.  माधवी आता वृध्दाश्रमामध्ये छान जगत होती. समवयस्क मैत्रिणी भैटल्या होत्या. तिला आशिष अमेरिकेत बोलवत होता. पण तिला मात्र आपला भारतच छान वाटायचा... तिला आशीष आणि सूनबाई वेळ देते... फोन करतात... व्हीडीओकाॅल करतात... ती नातवांशी बोलते... तेवढंच तिला छान वाटतं... शेवटी वृद्ध व्यक्तींना तरी काय हवं असतं! त्यांना आपल्या माणसाने दोन मिनिटं प्रेमाने बोललं... थोडा वेळ काढला तरी ते खुश होऊन जातात... !


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy