Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gautam Jagtap

Inspirational

4.0  

Gautam Jagtap

Inspirational

ध्येयासाठी उंच शिखर गाठू

ध्येयासाठी उंच शिखर गाठू

3 mins
469


ध्येय गाठता पुनर्जन्म घेणे, म्हणजे आत्मविश्वास द्विगुणित जागवणे,ध्येयाच्या प्रतिबिंबातून प्रतिशब्द माझे....


आपल्या नशिबी भाग्य असेल, तेव्हाच आपण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. असं नाही हो काही ,भाग्य असेल, नसेल प्रत्येक क्षेत्रात प्रयत्नांनी यशस्वी होणे आपल्या हातात आहे. आपण जन्मापासून भाग्यविधाता आहोत, मग भाग्य असून दुर्भाग्य का समजतो? कारण हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. समजणारे मेंदू दुर्भाग्यालाही भाग्य समजतात, भाग्य विसरून अवघडात अवघड जो कोणी आपलं कार्य साध्य करू शकतो, तो ध्येयासाठी उंच शिखर जरूर गाठणार आणि बनणार तोच खरा भाग्यविधाता.


प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे असतात, कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, बिझनेस मॅन, साहित्यिक, कलाकार, अधिकारी,इ. होण्याचे स्वप्न बघतो स्वप्न कसे साकार करायचं हे काहींना अवगत नसतं, याच्यापुढे कोणाचं निश्चित नसतं किंवा वेगळ्या मार्गाने पायवाट काढणे हा लाचारीचा मार्ग निर्माण करणे होय. त्याच्यातून आपण पूर्णपणे खचतो आणि भरकटलेल्या अवस्थेत जगतो, असं न होता, जिद्दीने आपल्या स्वप्नांना उजाळा देणे स्वप्नातून ध्येया समोर लपणे हा भ्याकूडपणाचा वेंधळा विश्वास कधीच निर्माण करायचा नाही. 'ध्येयाप्रती आपला आत्मविश्वास जागवणे' "लाचार होऊन जगण्यापेक्षा ध्येयाप्रती झिजणं हे चंदनाप्रमाणे सुगंध देत रहाणं होय" अथक परिश्रमाने माणसाची नवनिर्मिती होते. आणि तो कोणत्याही संकटांना खचून जात नाही, व कुठल्या अस्मानी गोष्टींशी माघारी घेत नाही हा एकच ध्यास आहे. त्यात अनुभवाचा अभ्यास दडला आहे. ज्याला कोणाला खरोखर स्वप्न साकार करायचं असेल त्याला अनुभवाचा अभ्यास प्राप्त केल्याशिवाय 'उंच शिखर गाठता येणार नाही.


मी ध्येय गाठता गाठता संघर्षाच्या मैफिलीत यशस्वी जीवनाची वाट शोधत होतो. कधीकाळी शिखर वैभवाचा मीही मानकरी होणार हा आत्मविश्वास मला शाश्वत करत होता. की तू ध्येयासाठी इतका समरस झाला आहेस, एवढा दृढविश्वास असल्यावर मजबूत पंख ही तुझ्यात निर्माण होतील. आणि उंच नभाशी गवसणी घालण्यासाठी प्रवृत्त करतील, हीच ती संघर्षाची मैफिल ज्यात मी पुनश्च वाटचालीचा शुभारंभ करत आहे. कधीकाळी विचारांचे अथांग रूप मला उत्साहित करत असतात. अरे उठ ही संघर्षाची लढाई आहे. यात तुझा सामना बघायचा आहे. आम्हाला कधीकाळी शब्दांनाही वाट फुटते मी विचार केला वाक्य पूर्ण करण्यासाठी ते वाक्य होतं, सुख विलासात प्रयत्नांचा परमार्थ होत नाही, दुःखाच्या सान्निध्यात प्रयत्न रुपी परमार्थ होत असतो, "अमृताहुनी गोड दुःख आहे" असे समजणारे व्यक्ती कधीच निष्फळ होत नाही, सदैव सफलतेचा आजरामर सिद्धांत बनत असतो. जगाच्या अनेक क्षेत्रात तो ध्यासाचा प्रतिनिधी बनतो त्याला कोणीच रोखू शकत नाही. कारण त्याच्यात विचार अनुभवाचा संसार सुखाने नांदत आहे. तो कधीही दुःखी भावनेने कुणाशी वावगे बोलत नाही इतका दृढ संकल्प त्याच्या हृदयी वसलेला असतो. कधीकाळी भल्यासाठी सांगत असतो या भरकटलेल्या अवस्थेत वावरण्या पेक्षा तुमच्यासमोर समग्र ताकदीचा सवाल उभा आहे. अरे आजच्या युवकांनो ! तुम्ही महान आहात तुमच्यात अशक्य गोष्टी शक्य करण्याची महानशक्ती संचारत आहे. तरी ध्येयासाठी वंचित का?

असमर्थ तिथे वंचित गोष्टी घडत असतात. समर्थ तिथे संचित प्रारब्ध बदलू शकतात. वंचित गोष्टींवर मात करण्यास संचित होऊन पिचलेलं नशीब बदलू शकतो,

म्हणून भ्याकुड हृदय समर्थ बनवा, लुळे पाय मजबूत बनवा, बुद्धी आपली तिक्ष्ण बनवा, प्रचंड इच्छाशक्ती जागृत करा. की आपण ध्येयाप्रती वंचित होऊ शकत नाही हा संकल्प प्रत्येक युवकांसाठी गरजेचा आहे.

ध्येयासाठी शब्द प्रतिशब्द आत्मीयतेच्या संवादातून मिळतात.

"Where there is will, there is way" म्हणजे इच्छा तिथे मार्ग सापडतात

आपण ज्या गोष्टीची मनोमन इच्छा करतो. त्या गोष्टीसाठी मार्ग मोकळा होतो. प्रचंड इच्छाशक्ती ताकदीचा आव्हान एक ध्येयशील व्यक्तीच स्वीकारू शकतो.

मनात काही कवितेच्या ओळी आल्यात त्या ध्येयाप्रति समर्पित...

        अंगात तरारी घे उंच भरारी|

        शिखर गाठण्या यशांतरी||

        ध्येय तुझे घडव इतिहास|

        आर-पार खोलवर जागव आत्मविश्वास..!

        

 जितका खोलवर आत्मविश्वास जागवणार तेवढा ध्यास ध्येयासाठी उंच शिखर गाठणार

 ध्येय माझे गाठण्यासाठी|

         होईल सप्न साकार||

         खडतर असो चढण माझी|

         घेईल नवा आकार...

तुर्तास एवढेच


    


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational