Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Tragedy

3  

नासा येवतीकर

Tragedy

कुस्ती

कुस्ती

3 mins
1.4K



दरवर्षी रामनवमीला टाकळी येथे खूप मोठी जत्रा भरते. सुमारे नऊ दिवस येथे यात्रा भरविली जाते. अनेक लहान मोठे खेळणीचे दुकानं आणि विविध खेळ त्याठिकाणी आलेली असतात. आकाशपाळणा आणि तंबूमधील सिनेमा पाहण्याची मजा काही औरच असते. टाकळीच्या गावाची जत्रा म्हणजे आजूबाजूच्या लोकांसाठी एक पर्वणी असायची. टाकळी येथून दीड किमी अंतरावर असलेल्या गुजरी येथील बाबू त्या जत्रेत आपल्या मित्रांसोबत जातो. सर्व खेळ खेळून झाल्यावर रामनवमीच्या शेवटच्या दिवशी त्याठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. सायंकाळी सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळेत कुस्तीला प्रारंभ होते. बाबू आणि त्याचे मित्र कुस्ती पाहण्यासाठी जातात. बाबूला कुस्तीची थोडी ओळख असते आणि त्यात त्याला रस ही असते. मनात विचार करतो की आपण ही एक कुस्ती खेळावी. मग तो ही मैदानात उतरतो आणि एक कुस्ती खेळतो. कुस्तीचे एक-दोन डावपेच त्याला माहित असल्यामुळे समोरच्या पहिलवानाला क्षणात चित करतो, त्यात त्याला वीस रुपये मिळतात. हा खेळ चालू असताना तेथे टाकळी गावातील शाळेचा शिक्षक त्याचा खेळ पाहून आनंदित होतो. त्याच्याजवळ जाऊन त्याची चौकशी व विचारपूस करतो. तेंव्हा बाबू आपली पूर्ण माहिती सांगतो. त्याचे सातवी पर्यंतचे शिक्षण झाले असून पुढील वर्षी आठव्या वर्गात शिकण्यासाठी बाहेरगावी जायचे आहे असे सांगितले. त्यावर त्या गुरुजींनी त्याला पुढील वर्षी आठव्या वर्गात टाकळीच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी सांगतो. बाबू देखील आनंदात उड्या मारत घरी जातो. कुस्तीच्या स्पर्धेत वीस रुपये जिंकून आलो असे आपल्या आईला मोठ्या अभिमानाने सांगतो. आईला देखील बाबूच्या या कामाचे खूप कौतुक वाटते. जून महिना उजाडतो. तसा तो आपली टीसी आणि मार्कमेमो घेऊन टाकळीच्या शाळेत जातो. कुस्ती खेळतांना भेटलेले शिंदे सर तिथे होते. त्यांच्या मार्फत आठव्या वर्गात तो त्या शाळेत प्रवेश घेतो. शिंदे सर हे पिटी शिकविणारे असतात व ते खेळाचे शिक्षक असतात. त्यांनी बाबूला विविध खेळासोबत कुस्तीचे अनेक डावपेच शिकवितात. पावसाळी क्रीडा स्पर्धेत बाबू भाग घेतो आणि तालुका पासून ते जिल्ह्यास्तरावर आपली कामगिरी दाखवितो. कुस्तीच्या स्पर्धेत तो जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर येतो. त्यांच्या या खेळामुळे गावाचे आणि शाळेचे नाव जिल्ह्यात सर्वदूर पसरते. दहाव्या वर्गात शिकत असतांना कुस्ती स्पर्धेत त्याची विभागस्तरावर निवड होते. तेथे देखील कुस्तीच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे नाव कमावितो. हळूहळू त्याचे नाव विभागात सर्वदूर पसरते. पण त्याच्यासोबत एक वाईट घटना घडते ते म्हणजे तो दहावीच्या परीक्षेत नापास होतो. कुस्ती खेळण्याच्या नादात तो अभ्यासाकडे लक्षच देत नाही. सुरुवातीपासून त्याचे गणित आणि इंग्रजी हे विषय खूपच कच्चे होते. दोन-तीन वेळा परीक्षा देऊन पाहिला पण त्याला काही यश मिळाले नाही. येथूनच त्याच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. त्याला आता कोणत्याच शाळा महाविद्यालय मधून त्याला खेळायला मिळत नव्हते. आपली कुस्ती खेळण्याची भूक भागवावी म्हणून तो विविध गावात भरल्या जाणाऱ्या जत्रेच्या ठिकाणी खेळायला जाऊ लागला. टाकळी ची जत्रा त्याची घरची बनली होती. दरवर्षी पहिलं बक्षीस त्याच्याच नावाने ठरवलेलं असल्याचे. त्याची कुस्ती खेळण्याची पद्धत पाहून सारेच परेशान होत असे. त्या पंचक्रोशीत त्याला हरवणारा कोणी तयार झाला नव्हता. पण बोरगाव येथे दिवाळी निमित्ताने एक भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत राज्यातील अनेक मल्ल त्याठिकाणी आले होते. त्याठिकाणी बाबू कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो. त्या कुस्तीत त्याला दगा होते आणि समोरचा पहिलवान जास्तच हुशार आणि तगडा होता. कुस्ती खेळताना बाबूचे हात मोडले जाते. बाबू जोरजोरात ओरडतो लगेच तेथील पंच आणि इतर लोकं त्यांची सोडवणूक करतात. तेथून बाबूला दवाखान्यात नेतात. त्याच्या दोन्ही हाताला प्लॉस्टर बांधल्या जाते. डॉक्टर सक्त सूचना देतात की यापुढे कुस्ती खेळायचे नाही. याच ठिकाणी बाबूच्या मनातील सर्व स्वप्न संपून जातात. शिंदे सर त्याची दवाखान्यात जाऊन भेट घेतात. बाबूला अश्या अवस्थेत पाहून शिंदे सर खूप उदास होतात आणि तेथून निघून जातात. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy