Shrirang Dumane

Abstract Tragedy


3  

Shrirang Dumane

Abstract Tragedy


गरिबी हो

गरिबी हो

3 mins 8.9K 3 mins 8.9K

लई सहन केल हो त्यानि खुप वाईट काळ बगितला.स्वता मरमर करत जगले पन कधि पोराना कोनत्या गोष्टिचि कमि पडु दिलि नाय..बाबाना पेटि वाजवायचि खुपच सवय आनि वरुन थोडे पैसे पन मिळतिन यामुळे बाबा २-२ दिवस बाहेरच असायचे.माय माझि सकाळि सकाळि कन्याचा(भाताचा प्रकार) भात करुन आम्हा भावडांना ठेवुन सकाळिच मिरच्या तोडायला शेताकडे जात. मोठा भाऊ आम्हाला दिवसभर सभांळायचा.तसे आम्हि ५ भाऊ आनि ऐक बहिन असे सहाजन..दिवसभर थोडा थोडा भात खावुन आम्हि दिवस काढायचो..माय संध्याकाळि यायचि शेतावरनं . झडप्यात मिरच्या आनि तादुंळ घेवुन..परत रात्रि थोडा थोडा भात खावुन.सगळ्याना झोपु घालायचि.आनि ऊरलेलि आमचि ऊष्टि करपलेला बुडाचा काळा भात खायचि..मग बाबा आनि माय ऊद्याच्या दिवसाच्या जेवनाची कशी व्यवस्था करायचि यावर बोलायचे..माझा बाप खुपच धाडशी .बायको पोराबाळाना ऊपाशि जगु द्यायच नाहि म्हणुन रात्रंदिवस धडपड करायचा ..पन गाव खेड्यात मरमर करुन दिवसभर फक्त ५/१० रुपय हाती लागायचे.

गावापासुन लाबं नदिच्या पलिकडे जगंलात सागवनाची झाडे होती .गावातिल आमच्या घराच्या बाजुचि मडंळि रात्रि नदि पार करुन सागवनाचि झाडे तोडुन तिकेच कुठतरि बाजुच्या गावात विकायचि. त्यातन त्याचं कुटुबं चालायच पन कधि कधि चौकिदारात्या हाति लागल्यावर १० दिवस कोडुंन मार मिळायचा माझ्या बाबानि पन ठरवल कि गावातिल जत्रेच्या अगोदरच पैसे गोळा केले पाहिजे..एक रात्रि बाबा निघाला जगंलाकढे..हातात बिन दाड्यांचि कुर्हाड अर्धि भाकर त्यावर फकि मिरचु.आनि डोक्यात फक्त घरच्याचां विचार चेहर्यावर कसलीच भीती नाही ..रातकिड्याचा आवाज वाढत होता बाबा पटपट पावल टाकत जगंल गाठत होता. नदी पार करुन बाबानि जगंलात प्रवेश केला.चौकिदार येन्याच्या अगोदर काम आटपायला हव होत म्हणुन बाबा घाई करत होता..बाबानि झाड तोडायला सुरवात केलि.कुर्हाडिच्या घावाने व आवाजाने चिर्र चिर्र अस्सा अवाज घुमत होतालपाच सहा घावामधे.बाबानि झाड तोडुन टाकल व मोळि बनवलि आनि सकाळि पहाटे पहाटे पहाटे बाजुच्या गावात मोळि विकायचि म्हणुन हळु हळु पावले टाकित गावाच्या दिशेने सरकत होता.बाबाच्या मनातुन तुर्तास चौकिदाराचा विषय डोक्यातुन गेला होता..सोबत आनलेलि बिडि पेटवुन बाबा चालत होता.गावात्या वेशिवर येताच बाबा चौकिदाराच्या हाति लागला सकाळचे ४ वाजले असावित काळ्याकुट अधांरात चौकिदारान् बाबाची कॉलर धरली .कधिच न घाबरनारा माझा आता मात्र थरथर करायला लागला होता..पन बाबानि सयंम ठेवत डोक्यात भलताच विचीर करुन ठेवला.

चौकिदार थोड्या क्षनासाठि त्याच्या साथिदार येन्याचि वाट बघत होता..बाबाच्या डोक्यावर सागाचिं मोळि.चौरिदाराने बाबाचं कोलर घट्ट पकडलं होत आनि शिव्या देत होता.बाबान लगेच डोक्यावरचि मोळि चौकिदाराच्या हातावर टाकलि चौकिदाराचि पकड सैल झालि.बाबान स्वताला सोडवुन घेतल व जोरात आपल्या गावाच्या दिशेन पळत सुटला चौकिदार बाबाच्यां माग लागला पन बाबा पुढ चौकिदार टिकु शकला नाहि..बाबान चौकिदाराला माग टाकल होत..बाबानि आता नदि ओलाडंलि व गावात प्रवेश केला होता.पहाट झालि होति माय घरापुढ सडा टाकत होति..बाबा घरि आला बाबान काय घडल ते माईला सागिंतल.माय रडायला लागलि..माईने बाबाला परत कधि तिकड जायच नाहि म्हणुन सागिंतल पन बाबाच्या डोक्यात काय विचार होता ते बाबाच जाने.रात्र झालि आम्हि जेवन करुन झोपि गेलो.जत्रा तिन दिवसावर येवुन ठेपलि होति बाबाला माहिति होत कि आम्हि भावडं जत्रेसाठि बाबाला विचारनार ते..त्या रात्रि बाबा कोनालाच न सागंता परत जगंलात गेला.सकाळि माय ऊठुन बगते तर काय बाबा घरि नाहिच माईने बाबाला सगळिकडे शोधल बाबाचा काहि पता लागत नव्हता.रुकुमाय.शेशाबाय.मोठाबापु सगळ्याना विचारल पन बाबाला कोनिच बगितबगितल नव्हत..हळुहळु रात्र झालि बाबाचा काहिच पता नव्हता माय रडायला लागलि आम्हि भावंड रडायला लागलो..हळुहळु रात्र सपंलि दुसर्या दिवशि पन बाबाचा पता लागला नाहि..२ दिवसानि बाबा घरि आला आम्हा सगळ्या भावडांसाठि जत्रेसाठि नविन कपडे घेवुन..माईला बाबानि आपन परत जगंलात गेल्याचे सागिंतले..आपल्या जिवाचि कसलिच काळजि न करता बाबानि आमच्या सुखासाठि धडपड केलि होति.

दुसर्या दिवशी  आपली मुलं किती आनंदात आहेत हे पाहुन बाबा सुखाने हसत होता..आज पन बाबाला विचारल कि का इतकं  अवघड जगन का जगायचो आपन बाबा एकच उत्तर देतो..

"गरिबी हो "..


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design