आई ची गाथा
आई ची गाथा
देवाने घटविले चवऱ्यांशी लाख योनी ,
त्यात सर्वांचे पिता नवे व माता नवी ,
सर्वच्या जीवनाची निर्मिती झाली तीच्याने ,
म्हणून जग जननी म्हटलं तिला देवाने....
देवाची अमूल्य देणगी म्हणजे आई ,
पुण्य कर्माचे उत्तम् फळ म्हणजे आई ,
कष्ट , वेदना सहन करून करते मुला ला मोठे ,
आई सारखी अमूल्य भेट सर्वांना भेट .......
तिचे हृदय जसे प्रेमळ गुलाब ,
तिच्या सारखे नाही कोण्ही होऊ शकत ,
आई म्हणजे जशी एक तलवारी ची धाल ,
कुटुंबा साठी तिचे सैरक्षण ठरते सफळ .....
आई मुला ला अगदी सुखरूप जगवते ,
अश्या प्रकारे आई मुला चे जीवन सावरते ,
या प्रमाणे आई च्या प्रेमा ची ही गाथा ,
आईच्या जीवनाच्या अनमोल अश्या कथा.........
आई च्या प्रेमाला कितीही दाग- दागिने , सोने - चांदी
हिरे - मोत्या नी मोजले ना तरी ही आपण खरेदी करू
शकणार नाही . आईचे उपकार कधीच फिटू शकत नाही....
