STORYMIRROR

Shankar BHALERAO

Tragedy Inspirational Others

4  

Shankar BHALERAO

Tragedy Inspirational Others

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
192

नात्यांमध्ये खूप काही असते,

नात्यांना पण आयुष्य असतं बरं,

पण वाटत नाही आपुल्याला खरं         


एखादी ओळख होते, घट्ट होत जाते,

त्यांच्याविना आपले पानही हलणे अशक्य होते,


दिवसरात्र आपण संपर्कात येतो ज्याच्या,

कोणे दिवशी मात्र, सर्वांत दूर असतो त्याच्या,


हे कसे, आणि का होतं ते समजत नाही

पण कधी कधी मात्र, समजून वळत नाही,


राहतात मात्र, आठवणीच आठवणी,

येतं हसू ओठावर कधी, कधी मात्र पाणी,


समजत असतं आपल्याला सैल होताहेत गाठी,

का पण माणूस धडपडतो, त्या घट्ट करण्या पाठी,


जे झालं ते स्वीकारावं, तेच असतं शहाणपण,

नाहीतर आहेच नात्याची फरफट आणि वणवण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy