Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Latika Choudhary

Abstract Tragedy Others

2  

Latika Choudhary

Abstract Tragedy Others

बंदिस्त

बंदिस्त

1 min
6.7K


परंपरेची गुलाम होऊन

भोगवटा पदरी घेतेस ,

पंख कापल्यावरही ....

फडफडत 'बंदिस्त' हेच

जीवन स्विकारतेस !

सोन्याच्या पिंजऱ्यातला 

उसना श्वास....शान....

बेगडी प्रेमापुढे नाचत

राहते कठपुतळीसमान

जगाच्या तालावर !

साचा पक्काच पुरुषप्रधानतेचा ,

मारीत राहतो नित शिक्का गुलामीचा ,

जन्मजात सारे अधिकार 

गमावून बसलेली तू ...

फक्त ऊरतेस 

नर वसाहत म्हणून !

पूजली जाते देवी म्हणून

 स्वार्थ साधत होते शोषण

वारंवार...क्षणोक्षणी संपत राहते

तरी उरत राहते पानापानातुनी

इतिहासाच्या!

जन्मताच गाडते 'स्व' ला ,

उभारत राहते तुझ्यातला माणूस ,

धनाला वारस देत

नावागावासकट

मिटतेस !

फक्त आणि फक्त देण्यासाठीच

का जन्म तुझा? , अन होत

राहते दान तुझेच , उधळली जाते

वस्तू म्हणून डावावर

'महान योद्धा ' नावाच्या 

पुरुषाकडूनही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract