पहिल्या प्रेम दिवसाची
पहिल्या प्रेम दिवसाची
प्रेमाला दिशा मिळाली बालपणातच
पहिले प्रेम राहिले मनातच
वचनी होते, मायेचे होत आपलंच
रोजची नजर,रोजचा स्पर्श रोजच
धाडसाला धाडस येऊ लागलं
कारण वयात आलं वाटू लागलं
शहारा येताच जाणवू लागलं
प्रेम तिला पण कळू लागलं
प्रेम ओठांवर नव्हतं नकळत ह्रदयात होतं
वचनाच अरेंज संगनमत होतं
तरी मनाला स्वातंत्र नव्हतं
ओठांवर भीतीच कुणीतरी काही म्हणतील हे जाळ होतं
निसर्गाची ही चांगलीच धडपड होती
वार्षिक परीक्षेची उत्तर पत्रिका होती
आशिर्वादाची भरमसाठ नातीच होती
मंगळसुत्राची बांधलेली गाठच होती
तुझी माझी साथ होती प्रेमाची
प्रेम तपस्या होती एक विचाराची
प्रेमाची तू शाहीच निराळी
पहिल्या प्रेम दिवसाची तू नशाच वेगळी

