नजर
नजर
नजर.
प्रेमाचा हक्क गाजवणारी,
तुझी ती हुकमी नजर आठवली की आजही शहारतं माझं अंगांग
आणि अलगद खाली झुकतात माझ्या पापण्या
प्रेमशरण भावनेनी..
आणि लागते ओढ
तुझ्या बाहुपाशात विसावण्याची,
आपलं सर्वस्व तुझ्यावर
खुषीने उधळून टाकण्याची.
वाटते विरघळून जावे,
तुझ्या आश्वस्त आणि ऊबदार मिठीत
आणि ऐकत रहावी
तुझी हृत्स्पंदनं
माझ्या स्पर्शाने तीव्र झालेली.
आणि मिटून घ्यावेत डोळे
या अनामिक सुखानी भारावलेले.
जेव्हा तू अलगद टेकवतोस
तुझे उष्ण ओठ
हळूच माझ्या भाळावर
आणि ठेवून जातोस
एक सुंदर मखमली आठवण
पुढच्या भेटीच्या ओढीची..
ओंजळीतले मोती.

