ये तू परत
ये तू परत
थकले रे डोळे आता
ये ना तू परत ।
त्राण न उरले आता
दिवस आले भरत ।
पैसा पैसा करशील किती
आई बाबा आहेत झुरत ।
तुझ्याविना जगातील कसे
म्हातारपणही आलं सरत ।
तुझ्याविना कुणाचा आधार
तुला करे नाही कळत ।
नजर तुझ्याच रे वाटेवर
श्वासही नाही ढळत ।
ये रे ये तू परत आता
प्राणही आता नाही सुटत ।
