भारतीय नारी
भारतीय नारी
मला वाटतं तिचं माझं जमलंच नाही
तिचं मन माझ्यात कधी रमलेच नाही
तिच्या डोळ्यापुढे सनी आणि सलमान खान
मी आपला बिचारा आमिर खान
म्हणून मला वाटतं तीच माझं जमलंच नाही
तिच्या डोळ्या पुढे मोटार गाडी बंगला
माझा आपला घोड बंदरला
वन रूम किचन चांगला
तिला वाटतं असावी एअर कंडिशन गाडी
माझ्या दारात उभी स्कुटी आनाडी
तिच्यावरून कसा करायचा लांबचा दौरा
तिला वाटतं अगदीच अरसिक आपला नवरा
आकाशाला गवसणी घालण्याचा तिचा अट्टाहास
इतका महत्वकांक्षी स्वभाव माझा नाही खास
अजून पाहिजे अजून पाहिजे अशी तिची हाव
असेल त्यात आनंदी राहण्याचा माझा स्वभाव
एक दिवस विचार केला बंध केले मोकळे
जा मार भरारी तुझ्यासाठी आभाळ मोकळे
जर कधी वाटले तुला यावे फिरून
तर हे घरटे तुझ्यासाठी राहील उभे स्वागता करून
ती म्हणाले वेड्या हीच केलीस माझी किंमत
तुझ्या विना जगात मला काय किंमत
भरारी तर घ्यायची आहे पण तुला सवे घेऊन
स्वप्नपूर्ती तर करायचीय पण तुझ्या संगे राहून
काही झाले तरी मी भारतीय नारी
तुझ्या प्रेमाच्या बळावरच माझी उंच भरारी
तुझ्या कणखर आधारावर उभी मी रेलून
तुझ्या आभाळावर माझा चंद्र सोळा कळांनी फुलुन
मी आहे तर तू आहे आणि तुझ्यामुळे मी आहे
अखेर मी भारतीय नारी तुला घेऊनच माझी उंच भरारी
आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही
तिचं मन मला कधी कळलंच नाही