कातरवेळ...
कातरवेळ...
रात्रीच्या या कातरवेळी
निशिगंध दरवळला
लाज फुलली गाली तुझिया
जेव्हा अर्थ प्रेमाचा कळला
खुणवत होती तुझी नजर
ऊर मनी भरुन आला
यौवन भरुन आले सारे
स्पर्शाचा अर्थ कळून गेला...
लाज फुलली गाली तुझिया
जेव्हा अर्थ प्रेमाचा कळला...

