Mrs. Mangla Borkar

Tragedy

2  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

1 min
160


व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने शारीरिक क्षमता म्हणजे फक्त श्रम नव्हे, तर कोणत्याही व्यवसायात दीर्घाकाळपर्यंत कार्यरत राहण्याची क्षमता होय. व्यक्तीचे आरोग्यं चांगले असेल तरच हे शक्य होऊ शकते. याचाच अर्थ आरोग्य हा व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. चांगले आरोग्य म्हणजे कोणत्याही प्रसंगी व कोणत्याही वातावरणात न थकता दीर्घकाळ काम करण्याची क्षमता. हे काम शारीरिक किंवा बौद्धिक श्रमाचे असू शकते. विक्रेत्याला भरपूर फिरण्याकरिता शारीरिक क्षमतेची गरज असते, तर कार्यालयातील लेखापालकडे एका जागी बसून दीर्घकालापर्यंत श्रम करण्याची क्षमता असली पाहिजे.


चांगल्या शरीरयष्टीमुळे व्यक्तीचे बाह्यस्वरूपसुद्धा दिसते. चांगली शरीरयष्टीअसणाऱ्या व्यक्तीला कोणताही पोशाख चांगला दिसतो व समोरच्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडतो. नीटनेटका व चांगला पोशाख हा सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy