वृंदावन
वृंदावन
मीं ट्रेन मध्ये चढली आपल्या सीटवर बसणारा तेवढ्यात तहान लागली म्हणून...पाण्याची बॉटल हातात घेतली. आणि उघडून पाणी. पिणार. तेवढ्यात समोरच्या सीटवर बसलेल्या आजीनीं मला थोडस पाणी मागीतल.
काय झाल आजी? तुमच्या कडे पाणी नाहीं का?
मागवून घेऊ का?
छे!छे!माझ्या कडे प्रवासा पूरती पाणी आहॆ?
मग?
कशाला हवं?
माझ्या बाटलीतलं पाणी उष्ट आहॆ. नं.
तुझी नवीन पाण्याची बॉटल आहॆ नं
आणि वरती हात करून दाखवलं. बघ त्या पिशवीत तुळशीच छोटंसं रोपटं आहॆ.
त्याला पाणी घायलच.निघताना घाई घाई त राहून गेलं.
भिती वाटते ग! प्रवासात झाड सुखून गेलं तर?
मीं. लगेच...
बाटलीच्या छोट्याश्या झाकण्यांनी रोपट्याला पाणी दिल.
मीं ही विचारलं!कुठे घेउन चालय हया रोपट्याला?
प्रवासात!
तुम्ही जिथे जाल तिथे पण मिळेल नं तुळींशीच रोपटं. कशाला एवढं टेन्शन घेता.तुळसचं तर आहेना.
हो! हो! पण हें माझ्या तुळशी वृंदावनातल आहॆ.आजीनं लगेच उत्तर दिल.
"माझं तुळशी वृंदावन". आता कायमच मीं सोडून चालीय.
माझ्या सोबत आठवण म्हणून. माझी भक्ती आणि श्रद्धा असेल माझ्या संपूर्ण जीवनाचा साक्षीदार असलेलं.
मीं जिथे जाणार आहॆ तिथे माझं कोण तरी हवन. तिथे घेउन चालीये मीं!
मला बोलायला माझ्या मनातलं सांगायला.
मीं त्यांची काळजी घेणार, आणि माझी काळजी घेणार कोणी तरी हवन माझं.
म्हणून भिती वाटते. माझ्या अंगणातील तुळस तिच्या हया मंजिरा चं रोपटं.
माझी तुळसनं ना.माझ्या आठवणी जोडल्या आहॆ.त्या रोपट्या जवळ..आनंदाच्या, दुःखाच्या. साक्षीदार आहेत.. म्हणूच ..
मीं निघताना सगळ सोडून आली.कारण तिथे घेण्यासारखं, माझ्या कामाचं काहीच नव्हतं.. कारण आता माझ्या भौतिक गरजा ही संपल्या आहेत. गरज होती ती फक्त माणसांची. पण आता माणसांना माणसांची गरज उरली नाही.
फक्त हया तुळशी ला तेवढं सोबत घेतलं.
हो! तुला सांगायचं राहून गेलं. मीं कुठे चालीय.?
मीं शेल्टर होम मध्ये चालीय.
म्हणजे आजी?
मीं लगेच विचारलं :म्हणजे वृद्धाश्रमात!
आजी नीं लगेच हो म्हटलं.
तुमच्या सारखी आई मिळायला किती नशीब लागत ना.किती भाग्यवान असायला हवन. पण तो..
किती दुर्दैवी आहॆ नं तो.असं का?
नाहीं ग! त्यांचा संसार सुखाचं हो. त्यांच्या आयुष्यात सगळ सुख मिळो. मीं आई आहॆ त्यांची. त्याचं कधीच वाईट चिंतू शकत नाहीं.
माझ्या मुळे त्यांच्या संसारात कलह नको.
म्हणून मीं ही पण हा निर्णय घेतला.त्यांच्या सुखा साठी.
आजकाल नाती ही ओझं होऊ लागली..हया वयात आमच्या सारख्यानंच्या काही चं गरजा नाहीं फक्त एक "छत हवं."आपल् म्हणणार,कोणीतरी हवं.उरलेलं थोडं आयुष्य जगण्यासाठी. ते ही कस सहज निघून जातं.
बघना हया तुळशी नीं नं. मागता मला भरभरून दिल. नं. बोलता ही माझ्या मनातलं समजवून घेतलं. तिचं आणि माझं नातं माझ्या आईच्या अंगणापासून आहे.पुढेही तिची मला साथ राहणारचं.
आमच्या दोघीचं प्रामाणिक नातं आहॆ.
एवढं सोपं नसतं ग!एका अंगणातून दुसऱ्या अंगणात रुजायला. तिला पण तिथल्या मातीची, तिथल्या पाण्याची, वातावरणाची,सवय झाली असतें.
पण हळू हळू. वेळ गेला की सवय होते. नवीन हवा पाण्याची.रुजेल..ती..
माझ्या सारख्या अनेक लोकांची कथा वेगळी आहॆ. पण
व्यथा एक चं आहॆ.
.झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरे, मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही. थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते. पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊन ही तसेच खंबीरपणे उभे असते...मीं ही आज परत खंबीर आहॆ.
एकटं राहण्या पेक्षा. बर आहॆ.माझा परिवार नसेल. पण लोक तर असतील.
ज्यांना कोणीचं नाहीं त्यांच्या साठी ठीक आहॆ. पण ज्याचे असूनही त्यांना पण आश्रमाचा सहारा घ्यावा लागतो.किती दुर्दैवी गोष्ट आहॆ. मला पण पर्याय नाहीं दुसरा.
खरच सांगू का!मला माहेराचा उंबरठा ओलांडताना जेवढं दुःख नाहीं झाल.
तेवढाच सासरचा "उंबराठा 'ओलंडताना मला दुःख झाल. माझ्या वर अशी वेळ कधीच वाटल नव्हतं.
आणि परत एक तिसरा "उंबराठा "ओलांडायचाचं आहॆ.
तिथे स्वागताला घरचे कोणी आपले नसतील. पण त्यांना आता मला आपल्या करून घ्यायचं आहॆ. कायमच..
कोण्याच्या ही आयुष्यात हा तिसरा उंबराठा नको खूप त्रास दायक असतो. ग!
किती दुर्भाग्य आहॆ माझं.
खरच मीं एक आई असूनही मीं वांझ असल्याच वाटत मला. हया पेक्षा जगात कोणतंही मोठं दुःख नाहीं.
आजी :तुम्ही नका काळजी करू.
खरं तर म्हणतात माणूस गेला की श्राद्ध घालतात. इथे जिवंत असताना श्राद्ध घातलं.अशी अवस्था आहॆ माझी.
आता पुढे काय?.
दर महिन्याला काही पैसे पाठवून देने. म्हणजे सेवा नव्हे. ती पर्यायी व्यवस्था आहे .आपल्या जवाबदारीतून मुक्त होण्याची. माझ्या दैनिक गरजा भागवण्यासाठी.
पण माझ्या मनाचं काय?त्याला पैशाची नाहीं तर माणसाची गरज आहॆ.
हें कस कळणार?
ज्यानं कोणी नाहीं निराधार आहॆ. त्यांचा परिवार नाहीं.
वृद्धाश्रम हा मानवतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे वृद्धांना आदर, उदरनिर्वाह आणि आधार मिळतो. यामुळे समाजात समतोल आणि एकोपा कायम राहतो.
पण आज तिथे मी ही जाणार आहे .यापेक्षा दुर्देवी घटना अजून कोणती?
पण मीं जिथे जाईल तिथे "वृंदावन "उभ करेल.माझ्या सारख्या अनेक स्त्रियांना मीं आधार देईल.अनेकांना निराधार होण्या पासून वाचवली.
देवाची हीच इच्छा असेल. म्हणून माझ्यावर ही वेळ आली असेल. काहीतरी चांगल घडवण्यासाठी.
आजीच्या डोळ्यातले अश्रू आणि हलके स्वर. तिच्या वेदना नं बोलता ही खूप काही बोलून गेल्या.मनाला स्पर्श करून गेल्या.
मीं :आजींना आधार देत. त्याचं दुःख कमी करण्याची प्रयत्न करत होती.
चल मुली "मला पुढच्या स्टेशन ला उतरायचं आहॆ. माझ्या पुढच्या प्रवासाठी.मीं पण आजीला मद्दत केली उतरण्यासाठी तिची बॅग पकडली आणि हळूच ती प्लॅटफॉर्मवर उतरली . हातात बॅग दिली..
मी दारात उभ राहून शेवट पर्यंत पाहत होती. तिच्या हातातली बॅग, ते तुळशीची रोपटं हातात घट्ट पकडून होती.
जणू एका बाळाला कस आई धरून ठेवते एका हातात ने तसेच.ती केव्हा माझ्या डोळा समोर ओझळ झाली कळच नाहीं.
आजी!डोळ्या समोरून ओझळ झाली. पण मनाच्या विचारत आज ही आहॆ.असंख्य प्रश्न घेऊन. तिचे शब्दन शब्दन मनाला भेडसावतात.
माझा ही ट्रेन चा प्रवास संपला.गाडी थांबली.मी ही प्लॅटफॉर्मवर उतरली. सोबत आजीच्या अनेक चांगल्या गोष्टी मनात घेऊन तिचा विचार करत.. अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत .. आजही तिला आयुष्याच्या प्रवासात शोधत असते. तुळशी वृंदावनाच्या रूपात. प्रत्येक तुळशी मध्ये आजीचा वास वाटतो.
" खरंच तुळस म्हणजे पूर्वजांचा आशीर्वादच असतो ".
रोज अंगणातल्या तुळशीला पाणी घालणाऱ्या सुनेलाआणि मुलाला घराच्या अंगणातील तुळस समजली, पण जिने हया घराचं वृंदावन केल ती "तुळस" कधीच कळली नाहीं. आणि तिचं महत्व ही..
तुळस म्हणजे घरातली रोनकचं.तुळश म्हणजे आपली परंपरा गृहस्थाच्या अंगणात हवी. तुळशी वृंदावनाने घराला घरपण येतं
"तुळशी" च्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी तुळसीपत्र जवळ असेल तर व्यक्ती वैकुंठास जातो असे मानले जाते. इतके महत्त्व तुळसीला आपल्या संकृती मध्ये आहे.तुळशीशिवाय आपले घर व अंगण अगदी ओकेबोके, संस्कारहीन वाटते. तुळस घरादारातील वातावरण पवित्र करते.
प्रत्येक घरात तुळस किती महत्वाची आहॆ.म्हणूच प्रत्येक घरात तिची जागा कायमच ठरलेली असते.
पण जिच्या आशीर्वादाने आणि तिच्या सेवेन जेवढं पुण्य मिळते.ती "आई "आपल्या घरातील तुलस.
ती आज घरातली ती तुळस आता सुखत चालली आहे. हें कस लक्षात येत नाहीं.
तुळस म्हणजे तुलना रहित जिची कोणाशीच तुलना करता येत नाही ती तुळस. हिलाच सुरसा म्हणजे रस उपयोगी वा देवतांना वाहण्यासाठी वापरतात.
गणातील" तुळस "कधीच सुकू नये म्हणून जेवढी काळजी घेतो..त्याचं घरातील ती स्त्री..
आई घराचा प्रकाश आहे. तिच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होते.
घरातल्या प्रत्येक सुखाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आई. घराच्या सर्व दिशांना प्रकाश आणि आनंदाचे स्रोत आहेत. आईचे प्रेम, वात्सल्य आणि आधार यामुळेच घरात सुख-सौख्य टिकून राहते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळेच कुटुंबातील सर्व सदस्य समाधानी आणि आनंदी राहतात. आईच्या काळजीने आणि प्रेमानेच घरातील प्रत्येक गोष्टीला चैतन्य आणि स्थिरता प्राप्त होते.
त्यांच्याशिवाय घर अपूर्ण वाटतं. आईचे प्रेम आणि आधार प्रत्येकाच्या दारात आपले स्वागत करते. तिच्या तिच्या प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे.
आईचा हात नेहमीच आधार आणि आशीर्वाद देतो. तिचं प्रेम आपल्याला नेहमीच साथ देते आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि शक्ती देते.
कुटुंबाला एकत्र ठेवते , ती सर्वांची काळजी घेण्यातच कायम मग्न असतो, जी स्वतःबद्दल बेफिकीर असतो, जो
आपल्या चुकांवर तिला वेळोवेळी कडू-गोड फटकारून आपल्याला सल्ला देतो,
अनेक कथा सांगून आपल्याला प्रेरणा देते आपल्या... चंद्र आणि परी, गोड लोरी गुणगुणणारी आणि स्वप्नांच्या रंगीबेरंगी दुनियेत आपल्याला आनंदाने झोपवणारी, हाताच्या जादूने साध्या जेवणात चव वाढवणारी, पदार्थ नसतानाही पटकन स्वादिष्ट पदार्थ शिजवणारी. स्वयंपाकघरात., हाताच्या स्पर्शाने जुन्या वस्तूंना नवा लूक देणारी, आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी स्वतःची साठवलेली पुंजी अर्पण करणारी, प्रत्येक अनोळखी माणसाला हसून मिठी मारणारी आई .
जिथे आई आहे , तिथे.प्रत्येक घरात आणि कुटुंबात वैभव आहे!
पण आजकाल त्याच कुटुंबाचं वैभव आता कुटुंबांपासून दूर एकाकी आयुष्य का जगायला भाग पाडलं जातंय आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव नसलेली मुलं, मानवी मूल्यं आणि संवेदनांच्या एका वेगळ्याच जगात वावरत आहेत, हे कळत नाही.त्यांना काठी ची नाहीं तर कुटुंबाची गरज असतें उतार वयात.
कुटुंब हीच ज्येष्ठांची काठी असते. कुटूंबासाठी किती खस्ता घेतात. संघर्ष करतात.हें विसरून चालणार नाहीं.
पण आजकाल त्यांची अडचण वाटू लागली.अंगणातील तुळस हवी पण घरातील तुळस नको आहॆ.संस्कार आणि सं्कृती चे धडे येणारया पिढीला कसे शिकवणार?
कारणचं तसेच आहे. आजकाल सगळ्यांना न्यूक्लियर फॅमिली.हवी. कोणाची रोक टोक नको. तर कोणाची बंधिशे. स्वतंत्र जीवन हवं आहॆ. त्यांना जबाबदारीचे ओझ नकोय.
आजकालच्या पिढीचा दुर्दैव आहे. घरातली खूप मोठी शक्ती . सगळ्यांना संरक्षण देणारी संस्कार जपणारी. आणि कायम घराला आशीर्वाद देणारी .आपल्यापासून दूर करत आहॆ.
आणि नात्यांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व देणारी पिढी, ज्यांच्यासाठी हे ग्लॅमर ओझ्याशिवाय काहीच नाही.
तेव्हा अजून वेळ आहे, आपल्या घरातील देवी-देवतांची पूजा अवश्य करा.तुळशी वृंदावनातील तुळशीची पूजा जरूर करा..
पण-आईच्या रूपाने मिळालेल्या दैवी च्या आशीर्वादाने घरातील तुळस जी लक्ष्मी चं रूप आहॆ. तिची पूजा नका करू पण तुळशी प्रमाणे आपल्या घरात जागा दया.त्या नात्याचं पावित्र जपा. वातावरण शुद्ध आणि कायम आनंदी राहील तिच्या आशीर्वादान.
ज्या घरात जेष्ठाना मान सन्मान मिळतो. त्यांचा धाक असतो. त्यांच्या हसण्या खिदलण्याचा आवाज असतो.
"ते घर वृंदावन असतं "तिथे कायम भक्तीचा वास असतो.
तिथे कोणत्याही दुर्दैवी शक्तीचा वास नसतो.
आजही ती कुटुंबे खरोखरच भाग्यवान आहेत जिथे त्याचं घर आनंदाने भरलेले आहे..त्यांच्या आपल्या लोकांन मुळे..
आपल्या घरातील तुळस त्यांनी खूप मायेनी जपली आहॆ. खूप प्रेमानी जोपासली आहॆ.तिची काळजी घेणारे कधीच आयुष्यात दुःखी होणार नाहीं. कायम आनंदी आणि समाधानी राहतील.चांगल्या कामाची फळ कधीच वाया जातं नाहीं. कोणत्या नं कोणत्या रूपात नेहमी समोर येतात.
"ज्या घरी तुलसी वृंदावन नसे ते स्मशानवत भासे"
"ज्या घरात आपल्या जन्म दात्यांना जागा नाहीं ते घर पण स्म्शान भूमि पेक्षा कमी नाहीं."
जन्मदातांना दुःखी करून तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही हे सत्य आहे.
