STORYMIRROR

Trupti Deo

Inspirational

3  

Trupti Deo

Inspirational

एक महागड लग्न

एक महागड लग्न

3 mins
43

तू येशील नं ग! अग कशाला? अग डान्स प्रक्टिस करायला!म्हणजे अग लग्नात संगीत चा प्रोग्राम आहॆ.

माझ्या जवळचे परिचित गर्भ श्रीमंत,त्यांच्या मुलीचं लग्न.... डान्स शिकण्यासाठी मला हीं बोलवण होत.


आठ ते दहा दिवस रोज संध्याकाळी कोरोग्राफर येणार, प्रशिक्षण दयायला.पूर्ण कुटुंब आणि जवळचे नातेवाईकांना नृत्य आणि गाणी शिकणार आहॆ.तू पण ये.

अग मला डान्स येतच नाही. अग येथे कोणाला येतो. थोडी प्रॅक्टिस झाली येईल. गाण्यावर नाचायचं.लग्न रिसॉर्ट मध्ये तिकडे. म्युझिक सिस्टम बाकी सगळे आहॆ.

फक्त सगळ्यांनी एक सारखं ड्रेस घालायचं. (लहंगे )


स्त्रियांन साठी स्पेशल.तुमच्या कडे नसेल तर भाड्यानी मागवा नाहीतर विकत आणायचा.


संगीत साठी. तो हीं महागडा.कारण प्रशिक्षण देणारा कोरोग्राफर हीं महागडा.


लग्न हीं महागडे रिसॉर्ट मध्ये...च.  

.आता पहिले सारखे विवाह हॉल मध्ये नाही, दोन दिवस आधीच रिसॉर्ट बुक होतात, तिकडेच सगळे शिफ्ट होतात. पाहुणे तिथेच येतात आणि तिकडून निघून जातात.


तिथेच मेहंदी, हळद, संगीत.

प्रत्येक फन्शन साठी, वेगवेगळे कपडे.

पहिले मेहंदी मग सगळ्यांनी हिरव्या रंगाचे कपडे घालून यायचे.

मेहंदी डिझाईनर. ची व्यवस्था सगळ्यां लेडीज साठी असतेच. सोबत महागडी ब्युटी पार्लर वाली.

असतेच.


नंतर हळद. हळदीसाठी परत वेगळा पोशाख. सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे नवरी मुलीचे वेगळे दागिने हळदीचे.सगळ्यांना कंपल्सरी एकाने वेगळं राहून कस चालणार? सगळ्यांना बंधनकारक .


नाहीतर आपण त्यांच्या श्रेणीत बसत नाही  


नंतर संगीत वेगवेगळ्या गाण्यावर होणारे डान्स, गाणे महागडे बुफे. वेलकम साठी केलेला भारी डेकोरेशन. लन्च.

लग्ना मध्ये परंपरेला तर उधाणच येतं. टोपी फेटे शिवाय अक्षदा पडतच नाही.


 रिसेप्शन. मग त्यांची एंट्री फिल्मी शैलीत स्लो मोशन मध्ये. त्यांच्या मागे पळणारे फोटोग्राफर, बनावट सजावट .वेगवेगळे इंटरनॅशनल cuisine काउंटर . पासून ज्वारीच भाकरी पर्यत.


रिसॉर्ट मध्ये पाहुण्यांनासाठी अरेंज केलेला रूम तिथून बाहेर येण्यासाठी e riksha.लागते. दूर दूर असेल्या पाहुण्यांच्या रूम मध्ये मोबाईल नीं कॉल केउन बोलवलं जातं..

गरिबांकडून मोलभाव करणारे किती सहजतेने लग्नाच्या मिरवणुकीत पैशाची उधळपट्टी करतात .


आपली हौस पूर्ण करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणारी हीं नवीन संस्कृती. सगळ्यांनाच नाही झेपत. कारण सगळे श्रीमंत नसतात.


कर्ज काढून अनुकरण करायचं मेहनत करून कमवलेला पैसा दोन दिवसात खर्च करायचा. कितपत योग्य?


आता लग्न म्हणजे संस्कार नाही. तर इव्हेंट झाला. श्रीमंतीचा देखावा झाला. हळूहळू कार्यालयात होणारे लग्न लुप्त होणार.आपुलकीचे भावना असेलला सोहळा आता हरवणार.आणि आता..

Pre wedding photo shoot आणि ते photos चे लग्नाच्या दिवशी exhibition अजून एक fad तिथेच intimate pics काढायचे आणि लग्ना नंतरची सगळी नवलाई घालवून टाकायची


हा नवीन ट्रेंड ' दिखाऊपणाचा हा सामाजिक रोग केवळ उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित राहू दया!


एखाद साधं लग्न ज्यांच्यात ग्रँड सोहळा नसेल तर नाव ठेवण्यापेक्षा कौतुक करा.त्या साधेपणात हीं श्रीमंती ओळखता आली पाहिजे. क्षमतेनुसार केलेला खर्च. दुसऱ्याच अनुकरण करण्या पेक्षा केव्हाही "स्वाभिमानच" दाखवितो.एक आदर्श म्हणून हीं...


तृप्ती देव

भिलाई छत्तीसगड

फोटो माझा वैयक्तिक.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational