वर्गणी
वर्गणी
"काय हो कशाला बोलवली आहे मीटिंग "
"मला पण माहित नाही हो बोलावणं आलं म्हूणन आलो"
"बरं बघूया सेक्रेटरी साहेब काय म्हणतात ते "
"हो हा बघा आला आपला सेक्रेटरी "
"नमस्कार आणि धन्यवाद सगळ्यांनी माझ्या एका फोन वर इथे हजर राहिल्या बदल सोशल डिस्टनासिन्ग पाळून आम्ही हि मीटिंग करणार आहोत तुम्ही पाहत असाल कि बसण्याची व्यवस्था सुद्धा अंतर ठेऊन केलेली आहे या वर्षी आपल्या सोसायटी चा गणेशोस्तव आपण कोरोना मुळे अकरा दिवसाचा दीड दिवसावर साजरा केला. गणेशाच्या कृपेने आपण पुढच्या वर्षी नक्की दिमाखात हा उत्सव साजरा करू, ह्या वर्षी आम्ही वर्गणी गोळा केली नाही दीड दिवसाच्या उत्सवाला गेल्या वर्षीची बाकी रकम वापरण्यात आली तर सांगण्याचा मुद्दा हा कि माझं असा विचार आहे कि आपण ह्या वर्षी वर्गणी गोळा न केल्याने आपण ह्या वर्षी देणगी गोळा करणार आहोत "
"देणगी ती कशासाठी आणि का ?"
"देशपांडे सांगतो मी जरा शांत राहा "
"हे बघा मी जे आता सांगणार आहे ते माझे मत आहे ह्या वर्षी आपण कोरोनामुळे आपला सोसाटीचा गणपती उत्सव दीड दिवसासाठी साजरा केला कोरोनामुळे सगळयांची अर्थव्यवस्था ठासलेली आहे तरी गणेशाच्या कृप
ेने आपण सुरक्षित आहोत पण जे सुरक्षित नाहीत त्याच काय ह्या समाजाचा एक घटक म्हूणन आपण त्या गरजवंतांना आपल्यापरीने फुल नाही तरी पाकळी देऊन मदत करावी अशी माझी इच्छा आहे आणि आपल्या ह्या चागंल्या कार्याला गणरायाचा सुद्धा आशीर्वाद असेल गणरायाची आपण अकरा दिवस मनोभावे पूजा करत असू ह्या वेळी आपण जनसेवा करू "
"अहो सेक्रेटरी साहेब लॉक डाऊन मुळे आम्हीच गरजवंत झालो आहोत आम्ही काय दुसऱ्यांना मदत करणार "
"मान्य आहे तुमचं म्हणणे पण आपल्या डोकयावर छत आणि दोन वेळचे आपण पोटभर जेवतो ना... भारी नसेल जेवण पण साधं तरी असत विचार करा ज्याच्याकडे हे दोन्ही नाही त्याच काय "
"तुमचं काय म्हणणं आहे आपण जनसेवा सुरु करावी "
"माझं म्हणे तसे नाही पण गणपती असला तर आपण आशीर्वाद चागला मिळवा, म्हूणन पेढे लाडू ठेवतो तेव्हा काही मिळवण्यसाठी ना अहो देव कधी सांगत नाही आपलाल्या ह्या गोष्टी पाहिजे म्हूणन.. निस्वार्थी मनाने केलेला नमस्कार देवाला पावतो मी माझं मत ठेवलं.. तुम्हला जर पटलं असेल तर समोरच्या पेटीत मदत टाका, नसेल पटत तर तुमची मर्जी. मी माझ्या वाटेची पाकळी त्यात टाकतो आणि एवढे बोलून हि सभा संपवतो धन्यवाद .