*विषय:- संभ्रम*
*विषय:- संभ्रम*
आज कित्येक वर्षे झाले ती अजूनही तो क्षण विसरू शकत नव्हती. तिला लागोपाठ दोन मुली झाल्याने पाप करतात त्यांनाच मुली होतं म्हणून मोठ्या जेठाने हिणवलेलं. सासूलाही नातीचं मुखदर्शन करण्याला जेठाणीनं केलेला मज्जाव. तर कधी मुलींना मरण नसतं म्हणून काळजावर घातलेले घाव! आज त्याच व्यक्ती जेव्हा आपल्या लग्न झालेल्या मुलीशी मनसोक्तपणे बोलतांना एवढंच नव्हे तर मुलाच्या मुलीचं कोडकौतुक करतांना पाहून तिला त्यांचा अपमान करावा का बदललेल्या दृष्टीकोनाचे स्वागत करावं ह्याच संभ्रमात ती होती.
लागोपाठ दोनदा मुलीच झाल्यावर एका सुशिक्षित स्रीला सासरच्यांनी अपमानास्पद वागणूक देऊन तीच गोष्ट स्वत:च्या संदर्भात अभिमानाने मिरवतांना पाहून त्या लोकांशी आता कसं वागावं हा निर्माण झालेला संभ्रम तिनं या छोट्या गोष्टीतनं वर्णन केला आहे.
