वेताळ आणि अंजलीचे प्रेम भाग ३
वेताळ आणि अंजलीचे प्रेम भाग ३
टपोरी मुल सोडली तर तिला त्रास देणार असे कोणीच नव्हते. अंजलीने बऱ्याच वेळा त्यांची तक्रार करायचे ठरवले पण ते होत नव्हते. कारण तिची भीती तिला काहीच करू देत नव्हते. तिच्या काही मैत्रिणी तिला सल्ला द्यायचे की, काहीतरी कर नाहीतर तुलाच महागात पडेल. पण तिला भीती वाटायची. महेश आणि विकी ही दोन मुलं खूप टपोरी होती. उर्मिला आणि अंजली ह्या दोघी त्यांच्या शिकार होत्या.
महेश :- हे स्विटी, कशी आहेस ?
उर्मिला :- तोंड सांभाळून बोल. कोणाला स्विटी बोलतोस ?
विकी :- बाबू, तुलाच आणि माझ्या पिल्ल्याला मी बाबू बोलेन.
उर्मिला :- कोण आता ही बाबू ?
विकी :- यार, अंजली आहे.
अंजली :- तोंड सांभाळ विकी. मला काही ही बोलू नकोस.
विकी :- तू माझ्याजवळ येत का नाहीस ?
अंजली :- तुझी लायकी तरी आहे का ?
विकी :- तुझ्या तर माझी लायकी काढते का ?
उर्मिला :- काय चुकीचं बोलली ती ?
विकी :- जास्त आले आहे तुम्हाला.
अंजली :- नाही, तुलाच जास्त बोलायला सुचते आहे.
महेश :- जाऊ दे. ह्यांच्या नादी नको लागायला.
महेश आणि विकी तिथून निघून गेले होते. आज अंजली आणि उर्मिलाने खूप चांगले तोंड दिले होते. पण हे रोजच झालं होत. ते दोघे रोजच त्यांना त्रास देऊ लागले होते. अमन हा दिसायला सुंदर जरी असला तरी त्याला मुलींमध्ये रस न ठेवणारा होता.
पण अमन हा त्यांना होणारा त्रास रोज पाहत होता. त्यामुळे अमन एकदा त्यांच्या मध्ये पडला.
महेश :- स्विटी, माझी राणी कशी आहेस ?
उर्मिला :- तुला बोलले मी माझ्या पाठी येऊ नकोस.
महेश :- काय करणार ? मला आवडतेस ना !
अमन :- थांबा काय चालू आहे ?
विकी :- दिसत नाही का ? आम्ही ह्या दोन मुलींशी बोलतोय.
अमन :- हो, पण का ? त्या बोलत आहे की, त्यांना त्रास होतोय तुमचा मग का पाठी लागला आहात ?
विकी :- आम्ही काही पण करू तुला काय जातेय ?
अमन :- अच्छा ! ठीक आहे.
त्यांना कल्पना नव्हती की, अमन एक वेताळ होता. कारण अमनला स्वतः लाच हे माहीत नव्हते. पण आपल्याकडे काहीतरी शक्ती आहेत हे त्याला जाणवले होते. पण त्याचा वापर कसा करायचा याची त्याला माहिती नव्हती. आता त्या शक्तीचा वापर करायची वेळ आली होती.
आता पुढे काय होईल ? अमन त्या दोघांना धडा शिकवेल की, नाही ? पाहुया पुढील भागात........


