Sunita madhukar patil

Inspirational Others

4.5  

Sunita madhukar patil

Inspirational Others

वांझ

वांझ

1 min
436


सुगंधा आपल्या सुनेला तेजश्रीला घेऊन "मातोश्री" अनाथाश्रमात आली. 

"आई आपण इथे का आलोय?" तेजश्रीने विचारलं. आपण बाळ दत्तक घेतोय. मी काल तुझं आणि विक्रांतच बोलणं ऐकलंय, खूप झाला त्याचा स्वतःच बाळ असण्याचा हट्ट, एक बाईच्या वेदना ह्या पुरुषांना कधी कळणारच नाहीत.

 "तेजश्री सासुकडे आश्चर्याने पाहत होती. अगं अशी काय पाहतेस, वांझ हा शब्द किती लागतो, आतून तोडतो हे माझ्याशिवाय जास्त कोणाला कळणार. बाईच्या मनाचा विचार इथे करतोच कोण? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का एका इवल्याश्या शरीराची उब? तिलाही पान्हा फुटावा वाटत असेलच ना? पण जाऊदे... थोड्या वर्षांनी का होईना पण माझी कूस उजवली अन विक्रांत जन्मला पण तुला या मातृत्वाच्या सुखापासून मी वंचित राहू देणार नाही. 

सासुचं बोलणं ऐकताच तेजश्रीने त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू राहू लागले.


© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational