उंच माझा झोका
उंच माझा झोका


उंच माझा झोका गेला आभाळात।
जेंव्हा समजले गेले धरेवर आपटून।।
मानव जीवनाची अविरत यात्रा या जन्मात जीवन आणि मृत्यु यांच्या भोवती झुलतांना पहिले पोटपाण्याचा विचार मनात असतो. प्रत्येक जण उंच माझा झोका गेला पाहिजे हाच विचार करतो.
लहानपण हे अगदी बि नधास्त असते पण मोठे झाल्यावर अनेक जवाबदा-या पेलंताना ह्रदयाचा चुराडा होत असतो. या पथावर अनेक रुपे आपल्या समोर असतात, त्यांच्या साठी काही कराव किंवा करता यावे म्हणून जीवाची धडपड होत असते.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्यात स्त्रीयांचे जीवन अधिक कष्टमय दिसून येते, त्या महिलांनी जर उंच माझा झोका नभांगणी गेला पाहिजे म्हंटल तर त्यांच्या जीवनात असंख्य अफलातून वादळ निर्मान होतांना दिसतात,आणि त्या जागेवर बसतात.
यातूनही काही एक महिलाच आपले नाव करतात, महिलांना जागोजागी अपमान झेलावा लागतो. कित्येक महिलांनी शिखर गाठलेले आहेत पण त्यांना असहनिय त्रास भोगावा लागला.
भारत स्वतंत्र करण्या करीता कित्येक महिलांनी आपल योगदान दिलेले आहे, त्यात राणी लक्ष्मीबाई सोबत अनेक महिलांनी स्वर्णक्षरात आपले नाव नोंदवले होते. तेंव्हा त्यांनी साहस करुन महिलांना प्रेरणा दिली होती. त्या सर्व शहिद झाल्या होत्या.
त्यात मुख्यत: चेन्नमां, बुलूनचियार, झलकारी, मै.भीकाजी कामां, मैनावती,अरुणा आसफ अली. 14 वर्षीय सुनिती चौधरी, सरला देवी,राजेंद्र कुमारी नर्तकी,डॉ.लक्ष्मी सहगल, काशीबाई, लक्षमां, राजमां,बबाई लक्ष्मण विरांगना, शामबाई, पासनी,अनुसुया, सिंधु देशपांडे,प्रभा साठे, शांता नायक या सर्व महिलांच अद्भूत,अद्वितीय योगदान त्या काळात मिळाले, पण त्यांना कधी स्वता:साठी जगता आलेल नाही. त्या जीवंत असतांना त्यानां हा सन्मान मिळालेला नाही, म्हणजे उंच भरारी घेण्या करिता जीवनाची आहूती देणे गरजेचे आहे.