शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

उज्ज्वल यशाला दुःखाची किनार

उज्ज्वल यशाला दुःखाची किनार

3 mins
187


     माणसाच जीवनात अनेक दुःख येतात. देव एखाद्या माणसाची खुप परीक्षा घेतो. काहिंच्या मागे संकट आली की सतत हात धुवून मागे लागतात. त्याही दुःखातुन बिचारे कसेबसे सावरतात. आपल जीवन जगतात. दुःख बाजूला सारून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा कठीण परीस्थितीत दुःखातुन सावरून यश संपादन करणार्‍या जान्हवीची ही कहानी.       


जान्हवी एका छोट्या खेड्यात आपल्या आईबाबा आणि तीच्या दोन मोठ्या बहिणींसोबत राहत होती. भाऊ नव्हता पण वडील आपल्या मुलींवर खूप खुश होते. जान्हवी तर लहान होते. तिचा आई बाबा दोघेही खुप लाड करायचे. आई आणि बाबा दोघेही कष्ट करून आपल्या मुलींसोबत आनंदात राहत होते. सगळ छान चाललेल होत. अचानक एक दिवस कामावरच जान्हवीच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच ते जागीच गेले. आई खुप खचली. तेव्हा जान्हवी शाळेत पहिलीला जात होती. तिच्या दोन मोठ्या बहीणी कळत्या होत्या. त्यांनी आईला धीर दिला. आपल्या पतीच्या अचानक जाण्याने जान्हवीची आई खुप खचुन गेली. दुःखाचा डोंगर कोसळला हसत्या खेळत्या कुटुंबावर. त्यांच्यात जगण्याची उमेदच नाही राहीली. अर्ध्या वाटेत पतीने अशी साथ सोडली त्यात तीन मुली कस होणार आपल ? जान्हवी खुप रडत होती. तेव्हा आईने आपल्या तिन्ही मुलींच कस होणार ? आपण कसा विचार करत होतो. मुलींच्या काळजीने त्या दुःखातुन सावरल्या नि काम करून आपल्या मुलींना सांभाळू लागल्या. त्यांना कधीही वडीलांची उणीव भासली नाही पाहीजे. त्यांचही मुलींवर खुप जीव होता. त्यांनी तिन्ही मुलींना शिक्षण दिल. मोठ्या मुली आईला हातभार ही लावत होत्या. मुलींकडे बघुन त्या जगत होत्या. दोन्ही मुलींना शिकवून त्यांना चांगल घरदार बघून त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत लग्न लावून दिल.      


दोन मुलींची लग्न झाली. एक आई म्हणून राधाबाई मुलींच सगळ करत होत्या. मुलीही खुप समजदार होत्या. छान सासर मिळाल होत दोघींना. त्यांचा संसार मजेत चाललेला पाहून राधाबाईंना समाधान वाटे. आता राहिली होती त्यांची लहान मुलगी जान्हवी आणि राधाबाई दोघीही मस्त आलेला दिवस आनंदात जगत होत्या. जान्हवी या वर्षी दहावीला होती. तिनेही वेळ पडेल तेव्हा आईला मदत करायची. शेतात काम करून आपल्या आईला हातभार लावायची. आईची इच्छा होती की जान्हवीने खुप शिकाव आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभ राहाव. जान्हवीला ही आपल्या आईची खुप काळजी वाटे. आपण जर लग्न करुन सासरी गेलो तर आईला कोण सांभाळेल ? अस तिला वाटायच म्हणून तिने ठरवल होत की काही झाल तरी खुप शिकायच आणि स्वतःच्या पायावर ऊभ राहायच. ती रात्रंदिवस मेहनत घेत होती. दहावीच वर्ष होत मन लावून अभ्यास करत होती. राधाबाई तर जान्हवी वर खुप खुश होत्या. ती अभ्यास करायची तेव्हा त्या आपल्या लेकीकडे पाहत असायच्या. जान्हवी ही अभ्यासात हुशार होती. आपल्या लेकीच कौतुक त्या कामावर आपल्या मैत्रीणींना सांगायच्या. सगळे म्हणायचे " तुझी जान्हवी एक दिवस लय मोठी हुईल बघ... " तेव्हा राधाबाईंच्या चेहर्‍यावरचा आनंद शब्दांत

व्यक्त करण्यापलीकडील असायचा. खुप अभिमान वाटायचा त्यांना आपल्या लेकीचा. तिच्या बहीणीने खुप सपोर्ट करायचे तिला म्हणुन या वर्षी जान्हवीने जिद्दीने अभ्यास करून दहावीची परीक्षा दिली.     


सगळं छान दिवस चालले होते. त्यात ही कोरोना विषाणूची साथ आली. सगळी परिस्थितीच बदलली. तरी मायलेकी खचल्या नाहीत त्या शेतात काम करायच्या. जान्हवीही आता सुट्टी मिळाली असल्याने आईसोबत काम करायची. ति आईला खुप जपायची. काळजी घ्यायला सांगायची. पण व्हायचं

तेच झालं. राधाबाई अचानक आजारी पडल्या. जान्हवी खुप घाबरली. तिने बहीणींना काॅल केले. आईला हाॅस्पिटलमध्ये तिने दाखल केले. तिची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली. तिच्यावर उपचार सूरू होते. मुलींनी आपल्या आईसाठी खुप खर्च केला, पण त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांनी आपला प्राण गमावला. कोरोनाने जान्हवीला आईवीना पोरक केल. तिघी ही बहीणींवर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या जाण्याने ती खुप खचली. सगळे तिला आधार देत होते. सांत्वन्न करत होते. रोजचा दिवसच काळरात्र ठरली होती. आपल्या आईला गमावल्यानंतर दुसर्‍या दिवशीच तिचा दहावीचा रीझल्ट लागला. तीच आणि आईच स्वप्न पूर्ण झाल होत. जान्हवीला 94 % दहावीच्या परिक्षेत गुण मिळाले होते. पण तिच्या यशाच कौतुक करायला, पाठीवर शाबासकी द्यायला आई मात्र राहीली नव्हती. जान्हवीला तिची मावशी घेऊन गेली तिच्या घरी. आईच जान्हवीच जग होती. आता पुन्हा एकदा तिच्यावर

दुःखाचा डोंगर कोसळला. जान्हवीने ठरवलय आई तर गेली आता पण तिच स्वप्न मी नक्की पूर्ण करेन.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy