तुझ्यासवे
तुझ्यासवे
“मौनात मी,
निशब्द तु,
सांग ह्या अबोल्याची
भाषांतरे कशी करू?????”
“काय होतयं काय मॅडम??कसला अबोला ? आपण बोलतोय की रोज !”
“ते आता सुचलय म्हणुन रे ,पणबघ आता तुच मला काय होतयं ते,मी का सांगु??”
“सांग की काय होतय??? अचानक मुड चेंज झालाय म्हणुन विचारलं !”
“तु ना खरं खरं माठ आहेस ,सगळ सांगितलच पाहिजे का ???तुही ओळखत जा की कधीतरी”
“अाता मी कसं ओळखु ???तु इतक्यात बाहेरून आलीस आणि थेट कवितेत बोलायला लागलीस ,तुला रस्त्यात कुत्र जरी दिसल तरी तुझा मुड बदलतो .....मग मी काय अाणि किती कारण गेस करणार ??”
“ए कुत्र काय? पपी असतात रे एवढे क्युट अस कुत्र म्हणु नको!”
“बरं तेच ते पपी! आता सांग काय एवढ अचानक रोमॅन्टिक वगैरे ??”
“अरे बाहेर बघ कसलं आभाळ भरून आलयं,आता मस्त पाऊस येणार ..मज्जाच मज्जा !”
“सानवी त्यात कसली आलीये मज्जा ?? आणि ते काही नाही हा मी येणार नाही पावसात भिजायला बिजायला !”
“बरं राहिलं ...भिजु नको पण फिरायला सोबत तर येशील ??? मी भिजेन तु बघ मला !”
“हमम,बघु कसं जमतयं ते”
“निरंजन बघायच वगैरे काही नाही ,लास्ट टाईम पण तु एेन वेळी टांग दिलीस ,मला तु ह्यावेळी सोबत हवा आहेस !”
“बरं” इतकच बोलुन तो रूम मधे गेला .
मला माहित्ये तुला का यायच नाही ते ,पण ह्यावेळी तुला मी नेणार आणि पावसात भिजवणार सुद्धा .....एकदाच वाहुन जाऊ देत सगळचं पावसासोबत !!
************************
“निरू,,,ए निरंजन उठ ना !”
“काय गं झोपु दे की ? एक सुट्टीचा दिवस त्यात पण काय तुझ??”
“अरे तु विसरलास का ?? आज आपण जातोय फिरायला ते ??”
“नाही ...पण तु जा ना तुझ्या ग्रुपसोबत मला खरच नाही यायचं !”
“ते आता नको सांगु आपण जातोय म्हणजे जातोय ,,तुला निहारीका ची शपथ उठ आणि आवर ,मी चहा करते”
हे एेकल्यावर मात्र निरंजन लगेच उठुन आवरायला गेला ,सानवीला ठाऊक होतं त्याच्यासाठी कोणती मात्रा लागु पडते ते !
सानवी निरंजन सरदेसाई पुण्यातली नावाजलेली मानसोपचारतज्ञ,आयुष्य भरभरून जगणारी,सतत चेहरा हसरा.....हिचे निम्मे पेशंट तिचं हसणं पाहुनच स्ट्रेसफ्री व्हायचे....भटकायची आवड,गपिष्ट असल्यामुळे गोतावळा तसा मोठा ..मग प्रत्येक बरोबर हिंडण्यातच हिचे रविवार संपुन जायचे ,मात्र ह्याच्या अगदी उलट निरंजन ,निरंजन विश्वनाथ सरदेसाई सिव्हिल इंजिनियर स्वत:चा कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय,सतत कामात मग्न ....हसण बोलण सगळ मोजुन मापुन ....फार कुणी मित्र नाही ...भटकायची आवड तर त्याहुनच नाही .......तर असे हे दोन ध्रुवावरचे प्राणी एकमेकांची स्पेस जपत संसार करत होते .
सानवीला अाज त्यांची पहिली भेट आठवली ,
जुलै महिना ,बाहेर मुसळधार पाऊस चालु होता ,ती क्लिनिकमधे पेशंटचे सेशन घेण्यात बिझी होती एवढ्यात बाहेरून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला ,तशी ती बाहेर पळत आली .
डाॅ.प्रधान आणि सोबत एक उंचपुरा,देखणा मुलगा हातावरचं पावसाच पाणी पाहुन ओरडत होता,डाॅ.नी पाणी पुसल तरी ओरडण चालुच होत,ते हरप्रकारे त्याला शांत करत होते ...आणि आता त्यांच्या मदतीला सानवीसुद्धा त्याला शांत करत होती.
तिच्या पेशंटच सेशन तिने तिच्या असिस्टंटला चालु ठेवायला लावलं आणि ती डाॅ.प्रधानांच्या मदतीने निरंजनला शांत करत होती,पावसाचा जरा जोर कमी झाला तसं निरंजनच ओरडणही कमी झालं.
तो बराचसा सावरला होता,डाॅ.प्रधान आणि सानवीची माफी मागुन तो ड्रायव्हर सोबत घरी गेला.
“सर काय होतं हे ??? कोण होता हा ?”
“निरंजन सरदेसाई विश्वनाथ कन्स्ट्रक्शन चे मालक,तुझ्याशी मागे एकदा बोललो होतो ह्यांच्याविषयी,आज खरतर त्याच संदर्भात बोलायच होत म्हणुन म्हटलं तुला थेट डेमो द्यावा”
“पण सर इतक्या यंग माणसाच हे असं पावसाच्या थेंबावरून बिथरणं, काहीतरी मेजर रिझन असेल ना ?”
“हो,निरंजनची बायको निहारिका तिच्याशी रिलेटेड आहे सगळं ,ती दोन वर्षापुर्वी गेली बस त्यानंतर हा असा वागतोय ,एरवी प्रमाण कमी असत मात्र पाऊस आला की हे अस दिवसाआड घडतच !”
“फक्त पावसामुळे अस का ?? म्हणजे त्यांच्या बायकोला पाऊस आवडायचा किंवा त्यांच्या काही आठवणी त्यामुळे की अजुन काही ?”
“सानवी अॅक्च्युली त्याची बायको पावसाळ्यात फिरायला गेली असताना वाहुन गेली,तिची बाॅडी शोधताना हा खुप फिरला मात्र प्रयत्न करूनही नाही सापडली तेव्हा त्याला मानसिक धक्का बसलाय सो हे जे तु आता पाहिलस हा त्याचाच परिणाम !”
“ओह,सो सॅड !”
“तर सानवी माझी इच्छा आहे की निरंजनची केस तु हॅन्डल करावीस,कारण मलाही काही महिने बेंगलोर ला जाव लागतयं तर तो पर्यंत तु पाहावस अशी माझी इच्छा आहे .”
“ओके सर मी पाहते,केस डिटेल्स मात्र मला लागतील ,थोड अवघड आहे ,बट आय विल ट्राय माय बेस्ट”
“येस ,तुला सगळे नोटस आणि डिटेल्स घरी पाठवतो तु स्टडी करून उद्यापासुन सेशन चालु कर ,काही अडचण आलीच तर मला काॅल कर ..लेट्स होप फाॅर द बेस्ट !”
“येस सर ,थॅंक्यु माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात त्याकरता !”
“तु आहेसच विश्वास दाखवावा अशी ,आॅल द बेस्ट ,आता मी निघतो”
“ओके ,बाय सर !”
“बाय टेक केअर” सर गेले सानवी मात्र अजुनही निरंजनच ओरडण आठवत होती ....हा धक्का नाही हे काहीतरी वेगळं आहे ,पावसावरचा राग तिच्या जाण्यामुळे ?? नाही देअर इज समथिंग ......मला निरंजन कडुन हे वदवुन घ्यायला वेळ लागेल पण मी घेईन !!
“सानु ......अग सानु.......सानवी !”
“अं ??? काय ??”
“अग कुठे हरवलीस ? चहा जळाला बघ सगळा ? लक्ष कुठय तुझं ??” निरंजन सानवीचे खांदे धरून विचारत होता .
“ओह शिट ,साॅरी ....थांब मी बनवते परत चहा”
“नको राहु देत वाटेत घेऊयात आपण ....चल तु निघायच आता ?? नाहीतर परत ट्रॅफिक लागतं”
“हममम चला ....पण मी ड्राईव्ह करणार ??”
“आज तुम्ही म्हणाल तसं ...चल आता”
आज निरंजन बर्याच वर्षांनी पावसात फिरायला म्हणुन बाहेर निघाला होता ,त्यामुळे सानवीन त्याची सगळी औषधही पर्स मधे घेतली होती ....कारण त्याच्या जखमांवरची खपली केव्हाही निघाली तर तो पुन्हा तसच वागेल .
“सानु ???”
“बोल ना !”
“खर सांग कसल्या विचारात होतीस ?”
“कसल्याच नाही रे ...असच विचार करत होते .”
“तेच कसला विचार करत होतीस ??”
“खरं सांगु की खोट ?”
“खर खर सांग !”
“गुजर गए साल
फिर भी वो मुलाकात याद है....
भीगीसी मिट्टी की खुशबु
वो पेहला पेहला सावन याद है!!” काही आठवलं का मि.सरदेसाई ??
“हममम पावसातच पहिल्यांदा भेटलो होतो ...”
“नाही ..बाहेर पाऊस होता अन आपण माझ्या क्लिनिक मधे भेटलो होतो ....”
“लोकांच्या पहिल्या भेटी किती रोमॅन्टिक असतात ..नाहीतर आपण...मेंटल पेशंट.. शहाणी डाॅक्टर....एक पावसापासुन पळणार ..दुसरा पाऊस कवेत घ्यायला धावणार ...आपलं सगळच जगावेगळ आहे नाही ??”
“हम ..पण मला ठाऊक होत मला प्रेम असच सापडणार ....अजब गजब ,ते समजुतदार वगैरे नकोच वाटायच रे .....मला अजु आठवतयं दुसर्या दिवशी तु क्लिनिक ला आलास ते पहिलं सेशन !” सानवी पुन्हा आठवणीत हरवली.
“आत येऊ?”
“ओह ,मि.सरदेसाई या या बसा”
“काॅल मी निरंजन ,सरदेसाई वगैरे एेकल की मोठ झाल्यासारख वाटतं !”
“ओके ,निरंजन...मग कसे आहात ??”
“मी ठीक ,साॅरी कालसाठी ..मला पावसाचा थेंबही सहन होत नाही...बट मी ट्राय करतोय .”
“रिलॅक्स निरंजन ....बर चहा घेणार की काॅफी ??”
“चहा चालेल”
“ओके सांगते”
रिसेप्शनवर चहाच सांगुन सानवी पुन्हा निरंजन कडे वळाली .
“तर निरंजन ,आपण सेशन सुरू करण्यापुर्वी थोडी ओळख करून घेतली तर मला वाटतं फायदा होईल ...काय आहे डाॅक्टर म्हणुन बोलण्यापेक्षा मैत्रिण म्हणुन बोलले तर खुप काही सहज होईल नाही का ??”
“ हम ..हो !” तो थोडसं हसुन म्हणाला.
“अरेच्चा हसता येत की तुम्हाला ???”
“अं ?” तिचा रोख न समजुन निरंजन म्हणाला.
“अहो म्हणजे हसत जा .....बर असत ते ......घ्या चहा पण आलाच .....आता मजा येईल जरा “
“तुम्ही नेहमीच अशा असता की ? मला बर वाटाव म्हणुन ?” चहाचा कप घेता घेता तो म्हणाला.
“अशी म्हणजे ?”
“सतत हसत....बोलतं !”
“हो ..माझ्या प्रोफेशनची गरज म्हणुन नाही बर का ! मी लहानपणापासुन अशीच आहे...कपभर चहात पण मजा असते फक्त ती कशी घ्यायची..घ्यायची की नाही ते आपल्यावर !” ती हसत हसत बोलत होती आणि तिच्या हसण्यात निरंजन पुर्ण अडकला होता......
“सानु ...थांब ना चहा घेऊ....तिथे बघ चहाची टपरी !” निरंजन च्या आवाजाने ती भानावर आली .
“हमम “ म्हणत तिने गाडी बाजुला घेतली .
दोघेही गाडीतुन खाली उतरून टपरीजवळ गेले ....मस्त गरमागरम चहा घेत ती आजुबाजुला बघत होती ...अजुन पाऊस सुरू झाला नव्हता पण ढग दाटुन आले होते ..सगळीकडे हिरवळ ...कुंद हवा ....अगदी माहौल वातावरण होतं !!
“ सानु काय गं कसला विचार करतीयेस ??”
“काही नाही रे सेशनचे दिवस आठवले एकदम .....पहिल्या तीन-चार सेशन मधे तु फार काही बोलायचा नाहीस .....तेव्हा वाटायचं तुझ्या मनातलं सगळ जाणुन घेता येईल का ?? कधीतरी तु नाॅर्मल होशील का ? खरं सांगु निरंजन तर तु पहिली केस होतास जिथे माझा काॅन्फिडन्स हलत होता ....आय वाॅस नाॅट शुअर अबाऊट फायनल चेंज .....पण शेवटी तो चेंज झालाच !”
“अच्छा म्हणजे सकाळ पासुन आठवणीत हरवलीयेस तर ???”
“हो .....” ती आभाळाकडे पाहत म्हणाली .
“वेडी...असं हरवुन गाडी चालवली तर धडकु आपण ..तेव्हा मी गाडी चालवतो ....तु मस्त आपले सेशन मला एेकव .....तु रेकाॅर्ड करतेस ना तुझे सगळे सेशन ??”
“हो...का रे ?”गाडीची किल्ली त्याच्या हातात देता देता ती म्हणाली.
“माझे सेशन आहेत आत्ता फोन वर किंवा ड्राईव वर ??”
“ड्राईव वर अाहेत”
“चल बस गाडीत प्रवासात सगळे सेशन एेकुयात ??”
“आर यु शुअर ? नाही म्हणजे पुन्हा तुला त्रास होईल ते सगळ एेकुन !” सानवी चाचरत म्हणाली.
“नाही होणार ......तु आहेस ना सोबत .....मग तर नाहीच होणार .....बघ सत्य पाऊस पण पडायला लागला !” तो उत्साहाने म्हणाला तसं सानवीनं चौथ्या सेशन पासुन रेकॉर्डिंग सुरू केलं.
*************************
“सो निरंजन ...रेडी आहेस ???”
“येस...”
“बरं आता मला सांग मागचे तीन दिवस तुला कसं वाटलं ???”
“ फार काही वेगळं वाटलं नाही ...पण थोडं फ्रेश वाटलं ...”
“ओके ......बर आता थोड रिलॅक्स हो ...मी काही प्रश्न तुला विचारेन त्यांची उत्तर तु मला द्यायचीस ...अर्थात तुला नसतील द्यायची तरी माझी हरकत नाही मात्र तु ती दिलीस तरच मी तुला ह्या त्रासातुन सोडवु शकेन हो की नाही ??”
“हममम.....मी प्रयत्न करेल !”
“गुड ....तु कविता वगैरे करतोस...मलाही एेकव की एखादी कविता !”
“काय ? तुम्ही प्रश्न विचारणार होतात ? मधेच कविता काय ??”
“अरे निरंजन काल काय ठरलय ...?? तु मला सानवी म्हणणार होतास ना ? बरं ते जाऊ दे एेकव की कविता मग प्रश्न विचारते ..पण कविता पावसावरची हवी ....”
“पावसावर कविता करत नाही मी ...केलीही नाही “ निरंजन जरा चिडुनच बोलला.”
“चिडु नको रे ...मी वाचलाय ब्लाॅग तुझा ....सो एेकव ना ...प्लीज”
“तु असं प्लीज वगैरे म्हणु नकोस ......एेकवतो मी .”
“हमम गुड बाॅय ...एेकव”
“छेडला जो तिने
तो धुंद मारवा होता,,,
सांग नेमका हा
अधीर ऋतु कोणता होता??
सजली होती पहाट चांदण फुलांनी
ऐन ग्रीष्मातही बघ बाहवा
सुखावला होता,,
बहुदा पाउस वळवाचा
आज वळचणीला तिला भेटला होता!!!”
“वाह .....मस्तच रे ! बरं पण कुणाला भेटला होता पाऊस वळचणीला ??”
“निहारिकाला !!” त्याच्या तोंडुन नकळत नाव निघालं .
“ओह .....तर निहारिकाला तु आणि पाऊस दोघेही वळचणीला भेटलात तर !”
“नाही ......नाही !” तो अजुनही जरा त्याच फ्लोमधे बोलत होता .
“मग कुठे भेटलास ???”
“डाॅ.प्रधानांच्या घरी ,ती त्यांची मुलगी ....पप्पा आणि डाॅ मित्र आहेत ...त्यांनीच ठरवलं आमचं लग्न ....त्यामुळे पहिली भेट त्यांच्या घरीच ...प्राॅपर कांदेपोहे वगैरे झाले ....खर तर मला लग्न करायच नव्हत ...पण निहारिका ला पाहुन विचार बदलला....
तिचे कुरळे केस .....गुलाबी रंग ....गालावरच्या खळ्या.....प
हिल्याच भेटीत मी क्लीनबोल्ड ....त्यामुळे झटकीपट साखरपुडा मग लग्न केलं .....त्यामुळे वेगळं अस भेटण झालच नाही !” तो जणु निहारिका समोर बसलीये अस बोलत होता.
“मग लग्नानंतर ???” सानवीनं हळुच विचारलं .
“नंतर ? नंतर सगळच ......” निरंजन मधेच थांबला .
“काय रे काय झालं ??”
“ काही नाही .....मला नाही बोलायच ह्याविषयावर” निरंजन चा मुड खराब झाला होता .
“ओके ....नो प्राॅब्लेम ...तु रिलॅक्स हो ....सेशन थांबवु आज ठीके .....?”
“हमम ...”
“बरं तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस तुच पाहतोस की पपा पण आहेत मदतीला ?”
“पपा फार लक्ष देत नाहीत ...पण माझा हा असा मुड असला की त्यांना द्याव लागतं लक्ष” तो पुटपुटला.
“अच्छा ....बर मी काय म्हणते ...उद्याच सेशन परवा घेतलं तर चालेल का ??”
“का गं ?? म्हणजे चालेल ....पण !”
“अरे अॅक्च्युली पाहुणे येणार आहेत पाहायला सो ...एकदम शेवटच्या क्षणी सांगते आई ...त्यामुळे बाकी सेशन असिसटन्ट पाहिल पण तुझ कॅन्सलच करावं लागेल ..किंवा मग लवकर घेऊयात सकाळी ....!” सानवी त्याचा अंदाज घेत म्हणाली.
“नाही नको ...परवा चालेल ....आणि आॅल द बेस्ट ..फार आॅकवर्ड असतात हे कांद्यापोह्यांचे कार्यक्रम !”
“या आय नो ...पण करावच लागतं ...थॅक्यु....!” सानवी हसत म्हणाली
“हम ..चल मी येतो ...परवा भेटुयात”
“बाय ..टेक केअर”
************************
“किती फाॅर्मल बोलायचो ग सानु मी ?” निरंजनच्या ह्या वाक्याने सानवी भानावर आली .
“हो कारण तेव्हा आपण माझे पेशंट होतात ...”
“हो ...ए पण बरं झालं हा प्रधानांनी माझी केस तुझ्यावर सोपवली ....”
“कारे ??”
“अग मग तु कशी भेटली असतीस मला ????”
“हमम तेही खरचं ....”
“आज हा प्रवास संपुच नये अस वाटतयं गं मला !”
“ हो का ??? तु रे केव्हापासुन रोमॅन्टिक झालास एवढा ??”
“तुला भेटल्यापासुन” मोठ्याने हसत तो उत्तरला.
“बरं एेक ...पुढे एक मस्त स्पाॅट आहे ....जुनं महादेवाचं मंदिर आणि नदी आहे बाजुला ....तिथे गाडी घे ...आज पुढे नको जाऊयात ....तिथेच थांबु !”
“ओके बाॅस ....बर पुढच रेकाॅर्डिंग लाव की ...”
“नको आत्ता नको ...तिथे गेल्यावर लावते ...पाच-दहा मिनिटत येईल बघ स्पाॅट .......ते समोर कमान आहे बघ ..बस त्या कमानीतुन फर्स्ट राईट घे आणि मंदिर दिसेपर्यंत सरळ चल !” एका दमात सगळ्या सुचना देऊन ती बाहेर पाहायला लागली.
सहा-सात मिनिटात ते मंदिराजवळ पोहचले .
“वाॅव .....भारीये ग स्पाॅट ......तु केव्हा येऊन गेलीस इकडे ??”
“अरे खुप वेळा आलीये ...मस्त वाटतं इथे !”
“ हम ...चल मंदिरात जाऊन येऊ !”
“थांब लगेच नको ....पाचव्या सेशनच रेकाॅर्डिंग एेकुन जाऊयात !”
“ओके ...कर प्ले”
***********************
“सानवी ....परवा खरतर मी चिडायला नको होतं ...पण आज तस होणार नाही तु विचार प्रश्न मी देईन उत्तर ,नो चिडचिड आय प्राॅमिस !”
“इट्स ओके .....बर आज तुला फिरवुन फिरवुन प्रश्न नाही विचारणार मी ....कारण माझ्या एक लक्षात आलय ...निहारिकाच्या जाण्याचा परिणाम नाहीये हा .....”
“सानवी ....”
“बरेबर बोलतीये ना मी ??? मला माहित नाही प्रधान सरांना का लक्षात आलं नाही ते ...पणतुझा परवाचा पाॅझ मला खुप काही सांगुन गेला ......तस तुझ्याविषयी मला फार माहित नाही ...पण जे माहित केलय त्यावरून बोलतीये मी !”
“म्हणजे ?”
“इफ आय अॅम नाॅट राॅंग .....चार वर्षापुर्वी तुझी मोठी बहिण गेली ...पावसात फिरून आल्यानंतर आजारी पडली ....तिचं ते आजारपण संपलच नाही .....दहा दिवसात गेली ती .....आॅगस्ट महिना होता तो .....बरोबर ??? मग तेव्हा तर तुला पावसावर राग आला नाही ???? दिदी तर तुझ सर्वस्व होतीम....तिच्याशिवाय तु एकही डिसिजन घ्यायचा नाहीस ....ती बहिणीपेक्षाही बेस्ट फ्रेन्ड होती . मग तिच्याही जाण्याच निमित्त पाऊस असुन तुझ वागण बदलल नाही ??? पण सहा महिन्यांपुर्वी बायको म्हणुन आलेल्या मुलीच जाण तुला इतकं बिथरवु शकतं ???”
“ तु बरोबर आहेस सानवी ......पण मी तुला सत्य सांगु शकत नाही ......कुणालाही ते सहन होणार नाही .....”
“कुणाला म्हणजे डाॅ.प्रधानांना ?? डोन्टवरी मी सरांना काहीच सांगणार नाही.....पण मला हे माहित आहे आज तु बोललास तर आणि तरच तु नाॅर्मल होशील .....आणि तुला व्हायचय ना नार्मल ??”
“हो ....पण.....”
“निरंजन मला माहित नाही की काय आहे जे तुला थांबवतय खर सांगण्यापासुन ....पण एक लक्षात घे .....तुझ्यामुळे तुझ्या घरचे सफर होतायेत ....त्यांनी दिदी ला गमावलय ..आणि सध्या तु असुनही त्यांचा नाहीयेस ...सो काॅल तुझा आहे की तुला काय हवयं ???? तु माझ्यावर विश्वास ठेऊन बघ तरी .”
“ओके ...पण प्लीज हे कुणाला सांगु नकोस कधीच ...मला खर तर कळत नाहीये की मला तुलाच हे का सांगाव वाटतयं कारण ह्या दोन वर्षात मलाच मोकळ व्हाव वाटल नाही ...पण तु बोललीस तेव्हा वाटलं की तुला सांगाव ....कारण आता नाही सहन होत मलासुद्धा हे !”
“गुड बोल मग ...हे डाॅ.म्हणुन नाही तर मैत्रिण म्हणुन सांगतीये !”
“तुला मी परवाच सांगितल की आमच अरेंज मॅरेज ...सो सुरवातीला तिचं कमी बोलण मला टाळण ..मला विचित्र नाही वाटलं .....कारण आॅकवर्डनेस मुळे होतं अस असच मी गृहित धरून चाललो होतो .....पण हळुहळु उलगडत गेलं की तिला हे लग्न करायचच नव्हतं ..तस तिनेच मला बोलुन दाखवलं ....मला वाटलं की हळुहळु ती करेल मला अॅक्सेप्ट पण सगळ उलटच झालं ......ती सतत तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर रहायची खुपदा ड्रिंक पण करायची ......समजावुन पण फायदा व्हायचा नाही ...तेवढ्यापुरती मग जवळ यायची .......सगळ उधळुन टाकायची माझ्यावर ...मला वाटायच की आता ती मला स्वीकारतीये ......मात्र नंतर नंतर त्या संबंधामध्ये फक्त शारिरिक गरज आहे हे जाणवायला लागल्यावर मीच जरा स्वतावर ताबा मिळवला .....पण सानवी शारिरिक भावना कंट्रोल झाल्या तरी त्या काही महिन्यात मानसिक रित्या मी पुरता बुडालो गं तिच्यात .....सतत दिवसरात्र तिचे ते मखमली स्पर्श....तिचा तो गंध आजुबाजुला दरवळायचा ....तिचा हसरा चेहरा पाहिला ना की मीच पाघळायचो .....नाॅर्मल नसलं तरी बर चालल होत आयुष्य ......पण....” हे बोलताना त्याचा कंठ दाटुन आला .....तरीही स्वत:ला सावरत त्याने परत बोलायला सुरवात केली.
“पण शेवटी जे नको होतं ते घडलचं ......ति मित्र मैत्रिणींसोबत ट्रिपला जातीये असं सांगुन बाहेर पडली ......साधारण दोन तासांनी मला अननोन नंबर वरून फोन आला की तुमच्या मिसेस पाण्यात वाहुन गेल्यात ताबडतोब निघुन या .पोलिस अग्निशमन दलाला काॅल केलाय आता फक्त तुम्ही या ...कुणालाच नकळवता सोबत न घेता मी निघालो त्या माणसाने पाठवलेल्या लोकेशनवर......तिथे पोहचलो तर निहारिका आणि एक मुलगा दोघेपण तिथेच उभे होते .
“थॅंक गाॅड निहु....तु ठीक आहेस .....मी खुप घाबरलो होतो यार !”
“ए....हात काढ अंगावरचा ....” ती रागानं बोलली
“काय झालं निहु ?? कशीकाय पाण्यात पडली होतीस ?? चल हाॅस्पिटलला जाऊ.”
“तु मंद आहेस कारे ???” तुला समजत नाहीये का ?? मी पाण्यात वगैरे नव्हते बुडाले ....दिसतयं का कुठे तुला ??? मुर्खा तुला इथे बोलवण्यासाठीचा हा प्लान होता .....एेक हा नकुल देशमुख ...प्रेम आहे आमचं ....मी आज ह्याच्यासोबत निघुन जातीये ....आता तु घरी जाऊन सगळ्यांना हे सांगायचस की मी वाहुन गेले ...शोधलं पण सापडले नाही .....अगदी छान रडुन सांग पटलं पाहिजे सगळ्यांना !!!”
“तु काय बोलतीये निहु?????? तुला कळतयं तरी का ?? आणि ह्याच्यावर प्रेम होतं तर माझ्यासोबत लग्नच का केल ? आणि त्यानंतर जे झाल होतयं त्याच काय ???? तेही जाऊ देत तु मला डिव्होर्स देऊन हव ते कर मी अडवणार नाही .”
“ए....मी काय करायचं ते तु सांगु नकोस ,आणि मी सांगितलं तसच व्हायला पाहिजे!”
“नाही करणार काय वाटतयं ते कर तु .....मी तुझ एेकणार नाहीये निहारिका !”
“नकुल हा असा एेकणार नाही ......पकड त्याला !”
नकुलची माझ्यावरची पकड घट्ट होत गेली . त्यांनी तिथुन मला त्याच्या फार्म हाऊसवर नेलं....दोन दिवस भर पावसात बांधुन ठेवलं ......शेवटी मी हरून ती म्हणेल ते करायला तयार झालो ...तेव्हा मला सोडलं !”
“पण निहारिका तुला घटस्फोट का देत नव्हती ??”
“तिला तिच्या पप्पाच्यी नजरेत पडायचं नव्हतं ....ती म्हणाली तिला हे अस साधसुधं आयुष्य नाही जगायचं ....तिची कारण मला न पटण्यासारखी होती मात्र एेकण्याशिवाय गत्यंतर नव्हत ..परत आल्यावर विचार केला की पोलिसात जावं मात्र माझी इच्छाच गेली गं .....खरतर मी त्यांचा प्रतिकार करू शकत होतो ...पण तिच्या डोळ्यातला तिरस्कार ....मी त्याच क्षणी संपलो......खुप मनापासुन प्रेम केलं होतं ग तिच्यावर ....
अजुनही करतो ......पण हा पाऊस अंगावर पडला की वाटतं पेटते निखारे पडतायेत .....त्या दोन दिवसात पावसाची भयानकता मला समजली .....माणसांची सुद्धा !” बोलताना त्याच्या आवाजात सुक्ष्मकंप होता .
“निरंजन .........जे झालं ते वाईट निश्चित होतं पण त्याचा इतका परिणाम आजही जाणवावा इतकही नाही ....तुझ्या मनातला निहारिकावरचा राग तु स्वत:वर काढतोय ....तसं करू नकोस ...स्वत:ला आणि आयुष्याला एक चान्स दे ....बाय द वे कालच्या मुलाला मी नकार दिलाय ....सो मलाही चान्स दिलास तर हरकत नाही हा !!”
“काय ????” निरंजन चमकुन म्हणाला .
“अरे रे घाबरू नको ....कसला चेहरा झालाय तुझा ???? वेडा ....फ्लर्ट करतीये मी..सो चिल !”
“ओह ....” म्हणत तोही हसला .
“बर सरदेसाई साहेब मला वाटतं आजच्या पुरतं खुप झालं ....उद्या बाकी बोलुयात .”
“ओके ....थँक्यु ...बर वाटतयं बोलुन ....येतो .....बाय !”
“हम बाय टेक केअर !”
****************
“सानु ???”
“काय ??”
“किती सहज बाहेर काढलस गं मला ??”
“मी बाहेर नाही रे काढलं ...मी निमित्तमात्र होते ...प्रधानसरांजवळ तुला बोलता येत नव्हत एवढच म्हणुन वेळ लागला जरा !”
“बरं ....तस तर तसं .....पण आज तु हा सगळा विचार का करत होतीस ?”
“कारण पावसावरचा राग रूसवा दुर झालाय तुझा .....पण मनातुन निहारिका दुर नाही झालीये आजही ......बाहेर मुसळधार पाऊस असतो तेव्हा आजही तुझ्या स्वप्नात येते ती ......तु बरळतोस झोपेत तिचं नाव कित्येकदा ....”
“सानु ???? अग मग हे तु लगेच का सांगत नाहीस मला ???”
“सांगुन काय करू निरंजन ....अरे पाचव्या सेशनला मला खरं सांगणारा निरंजन .....त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये माझ्या मनात ठसत गेलेला निरंजन ........खुप खुप भिती वाटते मला त्या निरंजन ला गमवायची ..,,,तुझा पास्ट माहित असुन तुझ्याशी लग्न केलं ....तुझ्यावर प्रेम केलं कारण तु खुप निरागस सरळ आहेस रे ...वाटलं माझ्यावरही तु तितकचं प्रेम करशील ....पण ....!” तिनं कसंबसे अश्रु थोपवले.
“सानवी माझं प्रेम आहे ग तुझ्यावर .....कसं पटवुन देऊ तुला ?? सॉरी कळत नकळत हर्ट करतोय तुला मी !”
“खरच प्रेम करतोस ???”
“हो ...खुप करतो !”
“मग चल आज तुही माझ्यासोबत चिंब भिजायचं ....मला आज निहारिकावर प्रेम करणारा पावसावर रागवणारा निरंजन नकोय ...मला माझ्यावर प्रेम करणारा ....चिंब पावसात भिजणारा ......निरंजन हवाय .....मलाही आणि आपल्या बाळालाही !”
“काय ???? काय बोललीस तु ??”
“जे तुम्ही एेकलत मि.सरदेसाई” तिने अलगद त्याचा हात स्वता:च्या पोटावर ठेवला .
“मी किती खुश आहे सानु ....यार .....मला तर सुचतच नाहीये ...काय रिअॅक्ट करू ...बस मी खुश आहे !”
“चल मग पावसात सेलिब्रेट करूयात आपल्या प्रेमाची....आयुष्याची ही नवी सुरवात ,हा नवा आनंद .....चल!”
“चला मिसेस सरदेसाई ....आज मलाच नाचायचच ह्या पावसात तुमच्यासोबत .....आजपासुन सगळ बदलेल आय प्राॅमिस !”
“गंधाळली होती मातीही आज,,,,
नभ होते झाकोळलेले,,
सख्या तुझ्यासवे आज
पावसाचेही येणे झाले!!!!” सानवी त्याच्याकडे बघत म्हणाली.
“ धुके साचले जरासे,,
काजळी बघ नभावर आली,,,,
चिंब मी होताना
लकाकी बघ तुझ्यावर आली!!!!“ त्याने सुद्धातिला कवितेतच उत्तर दिलं
“गालावरचं आभाळ घे ओठांनी टिपुन,,,,,
दिवस पावसाळी सख्या,
आता तरी मिठीत घे लपेटुन!!”
म्हणत सानवी निरंजनच्या कुशीत शिरली.
दोघेही पावसात अगदी चिंब झाले ..... निरंजनमनापासुन पावसाला कवेत घेत होता ..
त्याच्या मनातल आज निहारिकाच मळभ आज दुर झालं ..
तर सानवीच्या आयुष्यात श्रावणसरींच बरसणं नुकतच सुरू झालं होतं...कधीच न संपण्याकरिता !”