Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Priyanka Kute

Horror

3  

Priyanka Kute

Horror

टाईपरायटर एक भयकथा

टाईपरायटर एक भयकथा

6 mins
259


दिनकर काका धापा टाकतच आत आले... व जोरात दरवाजा बडवू लागले..... श्री शांत आपल्या खोलीत झोपला होता.... दरवाजा बडवण्याच्या आवाजाने तो खाडकन उठून बसला आणि दरवाजा उघडून घामाने चिंब भिजलेल्या दिनकर काकांकडे आ वासून बघत राहिला.... काकांच्या तोडूंन शब्द निघत नव्हता जणू काही खूप भयंकर घडले होते... ते सारखे पुटपुटत होते साहेब सोडून दया सगळं...


साधारण तिशीतला तरुण श्री आपल्या एका कामानिमित्त दूर एका ठिकाणी राहिला गेला असतो... जिथे भयंकर शांतता असते... दिवसा ढवळ्या तिथे जायला थरकाप होत असतो तिथे श्री त्याच्या घरातील जूने गडीकाम करणाऱ्या दिनकर काकांसोबत राहत असतो.... आज 3 महीने होत आले असतात श्री ला या वाड्यात येऊन आणि हा वाडा कुख्यात असतो त्यात घडलेल्या घटनांसाठी.... 


20 वर्षांपूर्वी

वाड्यात भाऊसाहेब पाटील पंचक्रोशीतील जाणते व्यक्तीमत्व आपल्या दोन मुले आणि पत्नी सोबत आनंदाने राहत असतात... त्यांना कुठल्याही प्रकारची कमी पडू नये यावर भाऊसाहेब जातीने लक्ष घालत असतात.... पण भाऊसाहेबांचे धाकटे चिरंजीव हे वाईट मार्गाला लागलेले असतात आणि या सगळ्यात कनिष्क मामा अर्थात भाऊसाहेबांचे मेहूणे यांचा मोठा वाटा असतो.... पार्वतीबाईंमुळे अर्थात आपल्या पत्नीमुळे भाऊसाहेब कनिष्क मामांना सहन करून घेत असतात.... धाकटे चिरंजीव रोज काही न काही तक्रारी वाड्या पर्यंत आणत असतात.... भाऊसाहेब काही न बोलता सगळं काही पाहत असतात... त्यांना एकच भीती असते की चिरंजीव भलत काही करू नयेत... अशीच सूट मिळत राहिल्यामुळे प्रतापराव पूर्णपणे वाईट मार्गाच्या स्वाधिन झालेले असतात...


प्रमिला तिच्या अंगणात सारवत असते.. रूपवान अशी लावण्यावती असते जिला पाहताच प्रतापराव यांची नियत बिघडते.. सतत तिच्या मागेपुढे असतात... ती या गोष्टीची तक्रार भाऊसाहेबांना करते त्यानंतर काही दिवस तिला कुठलाही त्रास होत नाही... आणि अचानक एक दिवस तिचे प्रेत जंगलात सापडते... तिच्या मृत्यू नंतर अख्ख्या वाडयावर वाईट सावली पडते आणि सर्वनाश होतो....


आज

दिनकर काका गावात एका इसमाचा खून बघून येतात आणि तो खून तसाच झालेला असतो जसा श्री ने त्याच्या कथेमध्ये टाईप केले असत त्याच्या टाईपरायटर मध्ये.... ३ रा खून असतो जो कथेप्रमाणे झालेला असतो... 


दुसऱ्या दिवशी सकाळी पंचनामा करण्यासाठी पोलिस समरच्या घरासमोर येतात... समर म्हणजे कनिष्क मामाचा मुलगा... दिनकर काकांनी कनिष्क मामाचा खून होताना पाहिला असतो... अगदी श्री ने उल्लेख केल्याप्रमाणे.... 


१ ला खून 

श्री बराच वेळ कंटाळून बसला असतो... त्याला कथेसाठी काही विषय मिळत नसतो.... तो गुगल काकांच्या मदतीने काही शांत ठिकाणांचे शोध घेत असतो.... जिथे त्याला कथा सुचतील... दिनकर काका जेवणासाठी बोलवायला येतात... तेव्हा श्री त्यांना वि४तो "काका ,काही दिवस जाऊयात का कुठे बाहेर ! मी काही ठिकाणं शोधतोय... तेवढाच हवापालट..."

काका म्हणतात. "तुम्ही म्हणाल तस धाकल मालक.... "


श्री ला बऱ्याच वेळाने एक वाडा सापडला... हिरव्यागार झाडांनी नटलेला... दिसायला खूपच मोहक असा वाडा होता... त्याने लगोलग दिलेल्या नंबरवर कॉल केला... समर ने कॉल घेतला व श्री ला काही दिवसांसाठी वाडा देऊ केला... 


वाड्यात आल्यावर श्री ला प्रसन्न वातावरणाची साथ मिळाली.. व त्याला एक भन्नाट कथा सुचली... त्याने त्याचा टाईपरायटर त्याच्या सोबत घेतला होता... श्री ने टाईप करायला सुरुवात केली.. तसे वाडयाचे वातावरण बदलू लागले... आणि श्री ची बोटं जणू कोणाच्या तरी ईशाऱ्यावर चालू लागली... आपसूकच.... काही वेळातच एक अख्खं पान लिहून झाले... श्री ला अचानक कुणीतरी संमोहित केल्यासारखे जाणवले... तो शुद्धीवर येताच त्याला दरदरून घाम फुटला... कारण त्याच्या कथेच्या वेगळा आशय टाईप झाला होता ते ही त्याच्या नकळत... 


दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतापरावांचा खून झालेला असतो... खूप छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडलेला असतो... वाड्यात आईच्या आणि भाऊसाहेबांच्या मरणानंतर तो वाडा सोडून प्रतापराव दुसऱ्या ठिकाणी राहत असतात... पण आज श्री च्या येणाने वाडा उघडतो... आणि प्रतापरावांवर मरण कोसळते...


श्रीने वर्णन केल्याप्रमाणे खून झाला असतो... पण ते कस शक्य होत... कोण लिहून घेत श्री कडून

किती दिस राहील झाकून

कळणार ते समद्यासनी....

मरण आलय दारी

दार उघडलय परक्यासनी.....


श्री ने वाडा उघडल्यानंतर वाड्यात असलेली शक्ती जागृत झाली जिने त्याच्याकडून तो आशय श्री कडून टाईप करून घेतलेला असतो.... ज्यामध्ये प्रतापरावांचा झालेला खून अगदी घडल्याप्रमाणे वर्णन केलेला असतो.... आणि ती शक्ती म्हणजे प्रमिला असते... जिला प्रतापराव आणि त्यांचे साथीदार यांनी अब्रू लूटून मारलेले असते.. या कटात कनिष्क मामा पण सामील असतात.... आणि प्रमिला आता प्रत्येकाचा सूड उगवायला तयार असते...


२ रा खून

श्री आज प्रसन्न मनाने टाईपरायटर काढून बसतो... त्याची कथा बऱ्यापैकी टाईप करून होते... अचानक दिवे बंद चालू होऊ लागतात.... श्री ला घाम फुटतो.. त्याला मागची वेळ आठवते... काही वेळाने श्री स्तब्ध होतो.. आणि कुणीतरी हात धरल्यासारखे तो टाईप करत राहतो.... केशवराव गावचे पोलिस पाटील हे प्रतापरावांसोबत प्रमिला च्या खूनामध्ये सहभागी असतात... आणि आज त्यांच्या खूनाबद्दल प्रमिलाने श्री कडून टाईप करवून घेतले असते त्याच्या टाईपरायटरवर.... केशवराव आपल्या पाटीलकी मधून निवृत्त होऊन शेत सांभाळत असतात.. पण त्यांची नियत बदलेली नसते... प्रत्येक बाईकडे नखशिखांत बघायची त्यांना सवय असते... ईतक्यात एक चाहूल त्यांना जाणवते... जणू कोणी स्त्री त्यांना बोलावत आहे... ते ही उत्तेजीत होऊन त्या आवाजाच्या दिशेने जातात.... तिथे एक लावण्यवती त्यांना जवळ येण्यासाठी खुनावत असते.... काही वेळानंतर ती गायब होते... आणि अचानक प्रमिला त्यांच्यासमोर येते... त्यांना काय करावे सुचत नाही... देवाचा धावा करण्याशिवाय त्यांना काही करता येत नव्हते.. प्रमिला चे पाय धरून ते याचना करू लागले.. यावर प्रमिला बोलली... "मी ही त्या दिवशी ,आशीच याचना करत होते". पण तुम्हा नराधमांना माझी दया आली नाही... मग मी का दया दाखवू केशव पाटील... अशी गर्जना करून प्रमिला ने केशवरावांकडे एक दोरखंड भिरकावला... आणि एका झाडाला त्यांना गळफास देऊन मुक्त केले... एक आनंदाने हंबरडा फोडून प्रमिला तिथून गायब झाली....

आपला घेण्यास आलीय सूड

मरण असणार आता गूढ

तिने दिला टोला त्याचा

जमल तर त्यातून वाचा....


खून ३रा

कनिष्क मामा भल्या पहाटे शेतावर जातात.... कापणी व पावसाचे दिवस असल्याने ते जरा घाईघाईत असतात.... पहाटेची वेळ असल्याने बऱ्यापैकी काळोख असतो..... अशातच मामांना आवाज येऊ लागतात.... कुणीतरी दुखाःने विव्हळत असल्याचे.. 


इकडे श्री उठून बसलेला असतो आणि समोर टाईपरायटर असतो... तो त्यावर प्रमिला च्या संमोहनात येऊन टाईप करत असतो.. कनिष्क मामांचा खून... शेतात नांगराखाली चिरडून दुदैवी मृत्यू लिहिला जातो... आणि त्याच पध्दतीने मामांचा खून होतो... दिनकर काका पहाटे फेरफटका मारायला रोज जात असतात... आजही ते घरी येत असताना श्री ची चाहूल जाणवते... ते पाहयाला येईपर्यंत श्री त्याच्या खोलीमध्ये जात असतो... काकांचे लक्ष सहजच टाईपरायटर कडे व तिथल्या आणखी दोन पानांकडे जाते.... त्यांना ते वाचल्यावर दरदरून घाम फुटतो... ते श्री च्या खोलीमध्ये डोकावतात... श्री शांत झोपलेला असतो... थोड्या वेळाने काका न्याहारी ची तयारी करून जेवणासाठी च्या भाज्या आणण्यासाठी बाहेर पडतात आणि त्यांना मामांचे प्रेत दिसतं... ते नांगराखाली चिरडलेले अगदी कथेत वर्णन केल्याप्रमाणे..... काका तसेच घराकडे धापा टाकत निघतात... श्री ला सगळी हकीकत समजते... आपण टाईप केल्याप्रमाणे हे सगळ घडतय हे त्याच्या लक्षात येते.... तो बराच वेळ शुन्यात नजर लावून बसलेला असतो... आणि अचानक मोठ्याने ओरडून बोलतो, "हे सगळ काय आहे , कस शक्य आहे हे"... तेव्हा एक धूसर आकृती प्रकट होते... जिच्याकडे श्री आणि काका अचंबित होऊन पाहत असतात.... ती प्रमिला च असते... जी श्री ला तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगयाला आलेली असते.... तिच्या सोबत झालेल्या अत्याचाराची सगळी कहाणी ती श्री ला सांगते आणि अजून २ जण आहेत ज्यांना मला शिक्षा दयायची आहे...


प्रमिलाकडून सगळं कळल्यानंतर श्री अस्वस्थ होतो... त्यालाही प्रमिला ची सहानुभूती वाटते... आणि प्रतापरावांचा राग ही येतो...

आता अजून दोघे कोण या विचारात असताना प्रमिला तिथे येते व श्री ला टाईपरायटर समोर बसायला सांगते... यावेळेस २न्ही खून एकत्र करायचे असतात तिला... ते म्हणजे संपतराव आणि त्याची बायको... हे दोघे प्रतापरावांचे बहीण आणि तिचा नवरा ज्यांनी प्रमिला ला धोक्याने शेतावर आणले असते... ज्यांच्यामुळे प्रमिला चा बळी जातो.... 

आज येणार त्यांस्नी मराण

ज्यांनी मला दिलतं मराण

कुणीबी नाय राहणार

आज सूड माझा पूर्ण व्हणार...

तुझ्या मुळं शक्य व्हतय सारं...

मुक्त झाल्यावर करीन तुझ सोनं....


श्री टाईपरायटर वर बसतो.... तो अख्खं पान टाईप करतो ज्यात त्या दोघांचा दुदैवी मृत्यू लिहलेला असतो.... प्रमिला त्यांच्या घराजवळ जाते... दोघेही नवरा बायको घरात बसले असता त्यांना अचानक एक आवाज येतो.... अटळ आहे मराण.... दोघेही घाबरून ईकडे तिकडे बघू लागतात.... तेवढ्यात एक प्रतिमा त्यांच्या सामोरी येते.... आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळते.... ती प्रमिला असते तिला पाहून प्रतापरावांची बहिण एकदम झटका लागून जागीच कोसळते आणि तिचा नवरा बधिर होऊन उभा असतो... तेवढयात प्रमिला त्यांच्यासमोर येते आणि तिने हात लावताच प्रतापरावांची बहिण खाली कोसळते.... कारण प्रमिला ला पाहूनच तिला ह्दयविकाराचा झटका येतो आणि ती मरण पावते.... तर तिचा नवरा मात्र प्रमिला च्या हातून मरतो.... एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे त्याच्या देहाची चिरफाड होते..... आता प्रमिलाचा सूड पूर्ण होतो....


प्रमिला श्री कडे येऊन त्याचे आभार मानते... आणि त्याची क्षमा ही मागते... त्याच्या मनाविरुद्ध त्याचा टाईपरायटर वापरण्यासाठी नंतर अनंतात विलीन होते.... श्री ला खूप हलके आणि छान वाटते.... तो खूप आनंदाने प्रमिलावर कथा लिहतो त्याच्या कथेला खूप छान प्रतिसाद मिळतो..


Rate this content
Log in

More marathi story from Priyanka Kute

Similar marathi story from Horror