Priyanka Kute

Horror Thriller

4.5  

Priyanka Kute

Horror Thriller

रती

रती

15 mins
405


नमस्कार मित्रांनो,

आजची कथा एका स्त्रीच्या भोवती फिरणारी आहे...

आई अग किती वेळ , चल ना लवकर, उशीर झाल्यावर सगळा कार्यक्रम संपून जाईल... रती तिच्या शाळेच्या निरोप समारमंभासाठी तयार होऊन बसलेली असते.. आणि आईला लवकर चल म्हणून सांगत होती..... तिचा ही गायनाच्या स्पर्धेत भाग असतो... आई पदर सावरत बाहेर येते... जवळजवळ धावतच मायलेकी घराबाहेर पडल्या... शाळा तशी १० मिनिटांच्या अंतरावर होती... पण उशीर होत असल्याने दोघींनी रिक्षा करण्यात पुढाकार घेतला.. रतीच्या गाण्याची घोषणा होते... तशीच ती धावत पळत मंचावर जाते... धाप लागलेली असते... थोडा वेळ माईक पकडून शांत उभी राहते आणि मग तिने निवडलेले गाणे ती गाऊ लागते....

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा

सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा

शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा , चिमणपाखरा

ज्ञान मंदिरा …सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा

विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यासनाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा

ज्ञान मंदिरा …सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा

होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धीमंत

कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा

ज्ञान मंदिरा …सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा

तिचा आवाज अगदी कोकीळा कोकते असा असतो... तपकिरी कलरचा गाऊन तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत असतो... गाताना ही चेहऱ्यावर चे भाव अगदी जपून येत असतात... गाण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट होतो... रती ला खूप आनंद होतो.. ती खाली उतरून आईला मिठी मारते... तिची आई निशीगंधा बाई एक प्रख्यात वकील असतात.... आजही एक केस असते.. पण मुलीसाठी शाळेत येणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते.... रतीला नेहमीच गाण्यामध्ये पारितोषिक मिळत असते... तिला यावेळीही विशेष पारितोषिकाने सन्मानित केले जाते... ती आणि तिची आई प्रसन्न मनाने घरी येतात.... काही तरी गोडधोडाचे बनवू या वि४त आई किचन मध्ये जाते... रतीला तिची जीवाभावाची मैत्रीण सोनल आवाज देते... आईला वि४न रती सोनल सोबत बाहेर जाते... आई स्वयंपाक घरात असल्याने आतूनच हो सांगते... रती सोनल दोघीही घराबाहेर पडतात.. तेव्हाच एक सावली रतीच्या घरावर पडते... 

रती अग आलीस का??? निशीगंधा बाई रतीला आवाज देत किचन मधून बाहेर येतात... रती अजून आलेली नसते... जास्त वि४ न करता निशीगंधा बाई घरातून बाहेर पडतात... बाहेर पडताच त्यांचं लक्ष त्या सावलीवर जाते... ती न माणसाची असते न जनावराची आणि स्तब्ध उभी रतीचे घर न्हायळत असते.... निशीगंधा बाईंच्या अंगावर काटा येतो... तेवढ्यात रती तिथे येते.. तिचा हात खांद्यावर पडताच त्या दचकून मागे बघतात... घामाने ओल्याचिंब झालेल्या आपल्या आईला बघून रती बोलते... काय ग आई अशी घाबरलीस का??? तोंडून शब्द बाहेर पडत नसल्याने रती आईला घेऊन घरात जाते आणि पाणी प्यायला देते.. .निशीगंधा बाई अजूनही घाबरलेल्या अवस्थेत असतात... आई, काय झाले बोलना कशामुळे घाबरली आहेस एवढी... रती निशीगंधा बाईंना वि४ते.. निशीगंधा बाई आता बऱ्याच सावरलेल्या असतात... त्या रतीला सांगतात की त्यांनी एक खूप भयानक सावली पाहिली जी माणसापेक्षा किंवा प्राण्यापेक्षा खूप वेगळी होती... रतीला ही आईकडून ते वर्णन ऐकून भीती वाटली... दोघी थोडा वेळ शांत होत्या... अचानक एका आवाजाने दोघीही भानावर आल्या... निशीगंधा बाई थोड्या पुढे होत डोकावून पाहू लागल्या... एक काळ मांजर खूप वेगाने आत शिरलं... आज तीच पुनरावृति होतेय... असे पुसटसे शब्द निशीगंधा बाईच्या तोंडून बाहेर पडले...

***

या कथेत थोडे मागे जाऊ...

शिरिश जोशी म्हणजे रतीचे वडील आणि निशीगंधा बाईंचे पती हे एक नामवंत बांधकाम उद्योजक असतात , दिसायला देखणे एकाद्या राजकुमाराप्रमाणे.. .. बांधकाम उद्योजक असल्या कारणाने त्यांचे बांधकामाच्या ठिकाणी जाणे होत असते... असेच एकदा नागपूर मध्ये असताना त्यांच्यावर एक प्रसंग ओढवतो... एका २० मजली इमारतीचे काम चालू असते एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये. शिरिश एक उत्तम अभियंता पण असतात... निशीगंधा आणि शिरीश नुकतेच विवाहबद्ध झालेले असतात.... शिरीश खूप खूष असतात... निशीगंधा बायको म्हणून मिळाल्याने.. ते तिची खूप काळजी घेत असतात... साधारण लग्नाच्या १ महिन्यानंतर शिरीश नागपूरला जातात... तिथे त्या क्षेत्रातील लोक शिरीशना भेटायला येतात... त्यांना शिरीश इथे येऊन बांधकाम हातात घेतायत हे आवडलेले नसते... ते त्याच कामासाठी तिथे आलेले असतात... त्यांचा म्होरक्या असतो नटुऱ्या नावाचा अगदी विरुद्ध म्हणजे अतिशय भयानक असा असतो... तो येऊन थेट शिरीश ची कॉलर पकडतो...शिरीश खूप घाबरलेले असतात.. त्यांना अश्या प्रसंगाची सवय नसते... शिरीश स्वतःला थोडे सावरून हिंमत करून त्याला वि४तात.. कोण आपण?? असे अचानक इथे कसे आले... त्यावर तो नटुऱ्या बोलतो.. तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन काम करण्याची हा आमचा इलाका आहे... इथे कोणी यायचे हे आम्ही ठरवणार.... निघून जा इथून नाही तर परिणाम वाईट होतील.. शिरीश न जुमानता बोलतात... काय करायचे ते कर मी हे काम सोडणार नाही... नटुऱ्या परत कॉलर धरायला वाकतो.. तेव्हाच एक मंजूळ आवाज येतो... ती अप्सरेची दुसरी व्याख्या म्हणजे दिक्षा असते... ती नटुऱ्या ने पळवून आणली असते... ती नटुऱ्या ला "थांब," असा आवाज देते... नटुऱ्या तिला पाहून खवळतो आणि गाल लाल होईस्तोवर मारतो... शिरीश त्याला अडवायला जातात पण तो त्यांना धक्का देऊन पाडतो... तितक्यात पोलीस सायरन आवाज देत शिरीश च्या बंगल्याच्या आवारात थांबतो... त्या आवाजाने नटुऱ्या पळ काढायचा प्रयत्न करतो पण तो असफल होतो... दिक्षा तिथेच शुद्ध हरपून कोसळते... शिरीश लगेच डॉक्टर बोलवून तिच्यावर उपचार करून घेतात... तिला आता बाहेर पाठवणे त्यांना धोक्याचै वाटते... दिक्षा बरेच दिवस शिरीश सोबत असते... तिला त्याची सवय होऊ लागते.. पण तिला एक दिवशी शिरीश विवाहित असल्याचे समजते.. आणि ती पूर्णपणे विखुरते...

दिक्षा ला शिरीश विवाहित असल्याचे समजते... तिला दु्ःखाचा डोंगर कोसळल्या प्रमाणे जाणवते... शिरीश ला तिच्या भावनांची काहीच माहिती नसते... त्याचे काम झाल्यावर तो त्याच्या घरी निघत असतो... तेव्हा दिक्षा त्याला अडवते आणि बोलते की," तू मला सोडून जाऊ शकत नाहीस".. शिरीश अस ऐकून क्षणभर गोंधळतो... तो बोलतो " माझी बायको वाट बघतेय माझी, तुझे हे खेळ आपण नंतर खेळू... " यावर दिक्षा त्याला धमकीवजा स्वरात बोलते... " तू गेलास तर मी जीव देईन आणि त्याला जबाबदार तू असशील..." शिरीश तिचे ऐकू न घेता तिथून निघतो.. त्यालाही तिचा राग आलेला असतो... ती अडवत असते पण शिरीश ठाम असतो.... दिक्षा शिरीश च्या मागे जाते हर प्रयत्न करून दमते... शिरीश त्याची गाडी घेऊन निघून जातो.. तेव्हा दिक्षा मागून मोठ्या आवाजात बोलते, शिरीश तूला सोडणार नाही मी, तू माझा आहेस.. शिरीश गेल्यानंतर बया एकटीच असल्याने भयंकर काळोखाच्या मार्गाला जाते... आणि त्यातच तिचा घात होतो....

ईकडे शिरीश निशीगंधा त्यांच्या आयुष्यात सुखी असतात.. त्यातच त्यांना बाळाची चाहूल लागते... दोघेही आनंदात बाळाच्या आगमनाचा वि४ करत असतात... निशीगंधा अशीच एक वेळ वि४त असताना एक भयंकर प्रकार घडतो... एक काळीकुट्ट सावली घरावर पडते.. शिरीश ही घरात नसतो... निशीगंधा ला काहीच कळत नसते काय होतय ते...ती सावली माणूस आणि जनावरांच्या सावलीपेक्षा ही वेगळी असते... निशीगंधा खूप घाबरलेली असते... ती देवाची आराधना करत बसते... डोळे मिटल्यावर तिला एक द्रश्य दिसते की रक्ताताच्या थारोळ्यात शिरीश पडला आहे...तिला दरदरून घाम फुटतो... ती रात्रभर नामजप करत असते एक काळं मांजर पटकन तेव्हा तिच्या जवळून निघून जाते... सकाळ होताच तिला टेलिफोन येतो... समोरच्याचे शब्द ऐकून तिचे अवसान गळते... ती आहे तशीच ६ महिन्यांचे पोट घेऊन रस्त्यावर धावते.. शिरीश ला अश्या अवस्थेत बघून हंबरडा फोडते... तिथेच निशीगंधा ची शुद्ध हरपते... तिला जवळच्या इस्पितळात नेतात... दुसऱ्या दिवशी निशीगंधा शुद्धिवर येते... आणि कालची घटना आठवून पुन्हा रडू लागते... तेवढ्यात तिथे एक सफेद रंगाची सावली येते... आणि निशीगंधा ला बोलते की , "मी माझा शिरीश मिळवला आणि लवकरच तूझे मूल पण घेऊन जाईन"... फक्त १६ वर्षे........ खिइइईईईईईईई...... 

आजचा दिवस..

निशीगंधा बाईना भूतकाळ आठवत होता.. त्यांना आठवणींनी भरून आले... त्यांनी मागे वळून पाहिले तर रती तिथे नव्हती.. त्या क्षणभर घाबरल्या रतीला आवाज देऊ लागल्या... पण रतीकडून काहीच आवाज आला नाही... अरे देवा, कुठे गेली ही मुलगी कुठे शोधू हिला, एक तर ते मांजर पण घरात शिरलय, निशीगंधा बाई..

तितक्यात एक घोगरा आवाज निशीगंधा बाईंच्या कानी पडला... शिरीश ला नेले तसे तुझ्या लेकीला पण नेणार आहे मी, लक्षात आहे न १६ वर्षे पूर्ण झाली आहेत ते... खिइइइइइइइईईईई.... ती बया रती च्या शरीरात प्रवेश करून बोलत होती.. रतीला साधन बनवले होते तिने... निशीगंधा बाईंना फक्त आवाज येत होता.... त्या हळूच घरात येऊन हॉलच्या दिशेने आल्या.... तरीही त्यांना काहीही दिसले नाही... त्या मधोमध उभ्या असताना एक चिकट द्रव त्यांच्या हातावर पडला... तसे त्यांनी दचकून वर पाहिले.. आणि एक मोठी किंकाळी त्यांच्या तोंडून बाहेर पडली....त्यांच्या डोक्यावर झुंबराला उलटी लटकून रती होती... जिचे केस पिंजारलेले.. डोळे खोबणीसारखे ज्यात दाट काळोख पसरलेला होता..... तिच्या एका हातातून रक्त सांडत होते जे निशीगंधा बाईंच्या हातावर पडले होते... तिची जीभ दुभंगलेली होती... आणि दातांचा कडकड आवाज करत ती निशीगंधा बाईंना पहात होती.. आपल्या लेकीची अशी अवस्था पाहून निशीगंधा बाई रडू लागल्या...

रती हळूहळू खाली येऊ लागली... तश्या निशीगंधा बाई माघारी जाऊ लागल्या... "थांब", एकाद्या गर्जनेप्रमाने तिने आवाज दिला... आणि घोगऱ्या आवाजात ती पुढे बोलू लागली... "शिरीश ला मी घेऊन गेले, तशी पोरीला पण घेऊन जाणार तुझ्या समोर.." असे म्हणून ती रतीला चाकूने वार करू लागली... निशीगंधा बाईंना ते बघवले नाही. त्या जोरात ओरडल्या, " रती बाळा शुध्दीवर ये, तिच्यापासून सोडव स्वतःला.... आईची हाक ऐकून रतीने विरोध केला तिच्यातल्या दिक्षाला तिने बाहेर काढून टाकले... त्याच क्षणी निशीगंधा बाईंनी तिच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ टाकली... दिक्षाचा वार चुकला...

ती प्रचंड रागावैतागात दात ओठ खात होती.... रती ची अवस्था खूप बिकट होती... डोळ्याभोवती काळी वर्तुळं झालेली... तिने झटकन मान सोडून दिली... निशीगंधा बाई तिला सावरू लागल्या... रती बराच वेळ बेशुध्द होती... बेशुध्द असताना तिला तिच्या बाबांची आकृती दिसली... तिने पहिल्यांदाच बाबांना पाहिले होते... ती झोपेतच रडू लागली... एकाद्या चलचित्रासारखं तिला बाबांसोबत झालेल्या घटना दिसू लागल्या...।

नमस्कार मित्रांनो,

रतीला पडलेल्या स्वप्नात तिला सारे काही समजले होते... शेवटी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबांना बघून रतीला रडू कोसळले... काही वेळाने शांत झाल्यावर रतीला आईचे शब्द आठवले... न माणूस न प्राणी अशी ज्याची सावली... काय असू शकत ते... अगदी बाबांच्या अपघात झाल्या दिवशी ती सावली नजरेस पडली होती... रती निशीगंधा बाईंना वि४ते , " आई, तुला एक वेगळीच सावली दिसून आली होती ना आज पण आणि बाबांच्या अपघातावेळी पण... तुला काय वाटते काय असेल ते... "मला एवढी कल्पना नाही बाळा, पण तो एक भयंकर प्रकार आहे , एवढेच सांगू शकते तुला मी...

एक सफेद रंगाची सावली दोघींच्या समोर येते.. दोघीही आधी घाबरतात... पण सावली जवळ आल्यावर दोघीही रडू लागतात.. कारण ते रतीचे बाबा शिरीश जोशी असतात... " बाळ, तुला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे.. मी जे सांगतोय ते नीट ऐक...

मी जेव्हा नागपूर वरून परत आलो.. तेव्हापासूनच मी आजारी पडू लागलो... मला खूप निराश वाटू लागयाचे... तुझ्या आईलाही मी आनंदाचे क्षण देण्यात कमी पडलो... असे म्हणून शिरीश हुंदका देऊन रडू लागले... कारण त्या चांडाळणीने काळोखाचा आधार घेऊन मला त्यात कैद केले होते.. जे आजतागायत कायम आहे...


नमस्कार मित्रांनो,

रतीचे बाबा शिरीश जोशी रतीला आणि निशीगंधा बाईंना दिक्षाने त्यांच्याभोवती पसरवलेल्या काळोखाच्या साम्राज्याबद्दल सांगत होते... रती, दिक्षाला मी एक चांगली मैत्रीण म्हणून मदत केली नेहमीच.. पण तिच्या मनात काही वेगळच होते... तिला माझ्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाली होती... आणि ती सूडापर्यंत पोहचली... ज्या दिवशी मी घरी यायला निघालो.. त्या दिवशी तिने मला हर तऱ्हेने थांबवयाचा प्रयत्न केला... तू माझ्या शिवाय कोणाचा नाही.. अशी मोठ्याने आरोळी तिने फोडली... मी दुर्लक्ष करून तिथून निघून आलो... पण इथे आल्यावर मला अस्वस्थ वाटू लागले... आपल्या माणसात परकं वाटू लागले होते... रात्रीच्या वेळी भयंकर स्वप्न पडू लागली होती... ज्यात दिक्षा मला मारून टाकायला येते असे दिसायचे... तिचे ते भयंकर रूप पाहून मला दरदरून घाम फुटायचा... असे रोजच झाले होते... एक दिवस मी मंदिरात गेलो बैचेन झाल्यामुळे मी शांतीसाठी बसलो होतो... तिथे एक साधू बसले होते... त्यांनी मला पाहून माझ्या जवळ आले... माझ्या डोक्यावर हात ठेवून ते मला सांगू लागले की तुझ्यावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे.. तुझे प्राण घेऊन पण ती शांत बसणार नाही.. तिने त्या सैतानाला जागे केलय तुझ्या विनाशासाठी... जो जनावर आणि माणसाचे मिलनातून जन्मला आहे...

रतीचे बाबा सांगतच होते तितक्यात तिथे एक काळी सावली तिथे आली... जिचे सोनेरी चेटकीनीसारखे केस आणि उलटे हात पाय होते... जी काटकोनात आडवी होऊन दात विचकत सगळ्यांना पाहत होती... ती दिक्षा होती... रतीला आणि शिरीशला डोळे फाडून पाहत होती... खिईईईईईइइ.. तिच्या हसण्याच्या आवाजाने सगळे शहारले... ती रतीच्या दिशेने धावतच पुढे आली... रतीच्या गळ्यातल्या रूद्राक्ष मुळे तिच्या हाताला झटका लागला... तिचा तो हात वितळू लागल्यासारखा झाला... तेवढ्यात तिथे ती सावली पुन्हा दिसू लागली... जी निशीगंधा ला दोनदा दिसली होती.. त्या सावलीच्या येण्याने दिक्षाचा जळालेला हात पूर्ववत झाला.. एक भयंकर निराशा पसरली... त्या क्षणाला काही समजण कठीणच.... रती रूद्राक्ष असल्यामुळे थोडी शांत होती.. तिची इंद्रिये तिच्या सोबत होती... ती जनावर माणूस मिलनाची सावली पुढे पुढे येऊ लागली... दिक्षा दात विचकटत हसायला लागली.. रतीने शंकराची आराधना सुरु केली.. ती मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागली... त्या मंत्राच्या प्रभावाने ती बया आणि ते भलतच भयानक दानव जोरजोरात किंचाळू लागले... रती ने मंत्र थांबवले नाही.. .. ती तशीच बोलत राहिली... तिचा आवाज इतका प्रचंड होता.. जणू देवांना ही तो ऐकू जावा... काही वेळाने दोघांचेही किंचाळणे बंद झाले.. आणि ते तिथून नाहिसे झाले...

सगळीकडे एक भयंकर शांतता पसरली होती... रती उठून देवघरात गेली... तिथे एक पिंड होती.. आणि पिढ्यानपिढ्या पूजलेले देवाच्या प्रतिमा होत्या... रतीने स्वच्छ पूसून प्रत्येक दैवतेला कुंकू आणि हळद कुंकू लावले....आणि तूपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून रती तिथून बाहेर आली... अगरबत्तीची राख जमा होत होती... ज्यासाठी रतीने छोटी बशी त्या खाली ठेवली होती.... बाबा , तुम्हाला त्या दानवाबद्दल जी माहिती आहे ती मला सांगा.. त्याचा विनाश केल्या शिवाय मी शांत बसणार नाही... रती शिरीश ला बोलते.. तेव्हा शिरीश रतीला सांगतात की महाराजांची भेट घ्यावी लागेल... पण इतक्या वर्षांनी ते कुठे आहेत कसे आहेत हे पण माहित करावे लागेल...

शिरीश च्या सांगण्यावरून रती त्या महाराजांच्या शोधात बाहेर पडते.. तिला शिरीश ने सांगितले तसे ती मंदिरात आली... तिथे एक पुजारी बाबांना रती साधू बाबांबद्दल वि४ते ... साधारण ३० वर्षांपूर्वी एक दिव्य साधूबाबा इथे येत असत... त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का?? ते कुठे आहेत सध्या... रतीने त्यांचे नाव काढताच पुजारी बाबा रडू लागले... थोडे सावरुन पुजारी बाबा सांगू लागले.. पोरी साधू बाबा आता या जगात नाहीत... त्यांना जाऊन १२ वर्षे झाली... त्यानंतर काही माहिती नाही आम्हाला... रतीला थोडे हरल्यासारखे वाटले... शंकराचे नामस्मरण करून तिने डोळे बंद केले.. आणि तिच्या तोंडून पटकन निघाले.. पुजारी बाबा साधू बाबा कुठे राहायचे मला त्यांचा पत्ता द्या... पुजारी बाबांनी तिला एक चिट्ठी लिहून दिली आणि बोलले पोरी तिथे कोणी नाही आता... तुझा जाऊन उपयोग नाही... रती मागे हटणारी नव्हती.. तिने पुजारी बाबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या वाटचालीला सुरवात केली.. तिच्या कडे असणारा पत्ता हा २ शहर पुढचा होता.. तिला तिथपर्यंत जाण्यासाठी वाहनाची गरज लागणार होती.. अडचणीच्या वेळी मदत करणारी एकमेव मैत्रीण सोनल तिला आठवली.. तिच्या बाबांची चार चाकी होती... तिने लगेच तिला कॉल केला... रतीचे नशीब चांगले होते की सोनल ने २ दिवसांची सुट्टी टाकली होती... सोनल लगेच तिला घेण्यासाठी मंदिराच्या दिशेने निघाली... तिला माहिती होते की रती रस्ताभर तिला सगळी कहाणी सांगणार.. सोनल ला पाहून रतीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.. तिने पटकन जाऊन कारमध्ये बसून घेतले... रती थांब, आधी मेण रोडला लागू मग तू सगळं काही सांग... रतीने खूप गंभीर परिस्थिती असल्याचे सोनल ला सांगितले.. तिने अगदी पहिल्या पासून आतापर्यंत सगळं काही तिला स्पष्ट करून सांगितले.. आणि आता आपण कुठे आणि का जातोय हे सुध्दा सांगितले.. रतीची जुनी आणि चांगली मैत्रीण असल्याने जराही शंका न दाखवता सोनल तिच्या सोबत निघाली...

अखेरीस रती सोनल त्या पत्त्यावर पोहचल्या.. मेन रोड पासून दूर नसल्याने त्यांना जास्त शोधावे लागले नाही... तिथे येताच त्यांची नजर एका अवाढव्य महालाकडे गेली... त्याच्या चारही बाजूंनी हिरवे कुंपण होते.. आणि एकाद्या महालाप्रमाणे तो बंगला तिथे स्थित होता... त्याच्या ठेवणी वरून तरी बंगला रिकामा नसल्याचे वाटत होते.. बाहेर ही बरेच द्वारपाल होते... रती पुढे जाऊन एका ला वि४ते.. दादा, सध्या इथे कोण राहते". त्यावर तो म्हणाला, " इथे साधू ज्ञानर्षी चे पुत्र राजर्षी राहतात... जे लोकांचे दुःख हरून त्यांना सुखी समाधानी जीवन देतात... पण आपण कोण म्हणायचं.. त्यावर रती बोलते... मला राजर्षी ना भेटायचे आहे खूप महत्त्वाचे काम आहे.. अवं पण ते असे भेटती न्हाय.. त्यांचा येळ घ्यावा लागतो... अहो आम्ही खूप संकटात आहोत, प्लीज आम्हाला जाऊद्यात.. रती आणि द्वारपाल बराच वेळ असे बोलत असतात.. तेवढ्यात मागून आवाज येतो.. श्यामराव येऊद्या त्यांना अडवू नका.. त्यांची निकड आम्हाला कळाली आहे...

इकडे निशीगंधा बाई घरात एकट्या असतात... त्यांना काल झालेल्या प्रकारामुळे काही सुधरत नसते... अचानक ती महाभयंकर सावली त्यांच्या घरावर पडते...

निशीगंधा बाईंना ती भयानक सावली त्यांच्या घराबाहेर दिसली.. जी ना माणसात होती ना जनावरात... ते भयावह त्यांच्या अगदी समोर आले.. आणि चक्क बोलू लागले... तुझ्या सगळ्या कुटुंबाचा मी नाश करणार आहे... तसा शापच आहे तुम्हाला... म्हणजे तिने दिलाय.. खिईईईईईईईईईई.... एक वेगळं भयानक हसू अख्ख्या घरात घूमू लागले.... त्या हिंस्र भयावह सावलीने सांगण्यास सुरुवात केली... तुझा नवरा तुझ्याकडे आल्यावर त्या बयेने माझे ध्यान केले... मी म्हणजे सैतानी शक्ती जन्माला आलेला भ्याड माझी सावली माझी ओळख... एखाद्या कुटुंबाच्या नाश करण्यासाठी माझे ध्यान करतात... आणि त्या नाश करण्यासाठी मला त्या व्यक्तीचे रक्त लागते जो माझे ध्यान करतो... अस म्हणून तो जोरात हसू लागला... निशीगंधा बाई सगळे ऐकून हैराण होत होत्या... कोणी इतकी नीच पातळी गाठू शकते.. याचाच वि४ त्या करत होत्या... तेवढ्यात ती सावली त्यांच्या खूप जवळ आली... आणि त्यांच्याकडे हात वाढवू लागली तिचे ते टोकदार काळी नखं पाहून निशीगंधा बाई खूप घाबरल्या.. त्यांनी भितीने डोळे बंद करून घेतले... आणि आश्चर्य म्हणजे एखादा झटका लागावा तशी ती सावली मागे पडली आणि क्षणात अदृश्य झाली...

इकडे राजर्षी च्या बंगल्यावर रती सोनल एका यज्ञासमोर बसलेल्या असतात... राजर्षी ना संकटाची चाहूल लागलेली असते म्हणून ते यज्ञाला सुरुवात करतात.. आणि त्याच्या प्रभावामुळे निशीगंधा बाई सुरक्षित राहतात... राजर्षी यज्ञ संपन्न करून शेवटची आहूती देतात... आणि रतीच्या हातात पंचामृताचा आणि आहूतीसाठी वापरलेल्या सप्तनद्यांच्या पाण्याचा कलश देतात... आणि कधी कसा वापरायचा हे सांगतात... ती अगदी लक्षपूर्वक सगळे ऐकत असते... मग त्या तिथून राजर्षी चा आशीर्वाद घेऊन निघतात... राजर्षी रतीला जपून राहण्यास सांगतात आणि रूद्राक्ष कधीच स्वतः पासून लांब होऊ देऊ नकोस असे बजावतात... रती पुन्हा एकदा नमस्कार करून तिच्या दिशेने निघते...

निशीगंधा बाईंना तो वाईट अनुभव आल्यापासून त्यांच्या डोळ्यात झोप नसते... त्या गाडीच्या आवाजाने बाहेर येतात ,रती आणि सोनल आलेल्या असतात... आईला अश्या परिस्थितीत बघून रती धावतच निशीगंधा बाईंकडे जाते... रती आईला घरात घेऊन जाते शांत करून पाणी देते... आई , काय झालं तू एवढी का घाबरली आहेस... रती निशीगंधा बाईंना वि४ते...तू गेल्यानंतर ती सावली आली होती पुन्हा... त्याची ओळख त्याने मला सांगितली... तो खूप भयंकर आहे... निशीगंधा बाई रतीशी आहे ते बोलतात... बोलताना त्या किती घाबरल्या आहेत हे ही लक्षात येत होते... सोनल आईची काळजी घे सांगून तिच्या घरी निघते... रती ही तिला आल्याबद्दल तिचे आभार मानते... सोनल तिचा कान पकडून तिला बोलते की असच बोलायचे असेल तर मी पुढच्या वेळेस येणार नाही... रती तिला बोलते, बरं बाई नाही बोलणार असे बोलते.. सोनल निघून गेल्यावर अचानक दिक्षा तिथे येते.. तिने निशीगंधा बाईंवर वार केलेला असतो.... रती जवळजवळ ओरडतच त्यांच्या जवळ पोहचते... दिक्षा तिच्या घोगऱ्या आवाजात रतीला बोलते, आज अमावस्या आहे, आज तुमच्या दोघींचे मी प्राण घेणार .... हिइइइइईईईईई..... तिचा तो आवाज थरकाप उडवणारा होता... रतीला ही काही सुचत नव्हतं.. अचानक तिला पवित्र जल आणि पंचामृताची आठवण झाली... पण ...... ते तर सोनलच्या कार मध्ये राहिले... आता.....?????? तिला फोन करणेही अवघड होते.. कारण दिक्षा समोरच होती....

सोनल घराजवळ आली.. गाडी लावल्यानंतर सहज म्हणून तिने डिक्कीत पाहिले.. तर तिला ते २ कलश दिसले.... अरे देवा, हे तर इथेच आहेत, काकींनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा काही घडले तर... मला हे रतीपर्यंत पोहचवले पाहिजे... सोनल पुन्हा रतीच्या घराच्या दिशेने निघाली.... तिनं समोरच्या सीटवर दोन्ही कलश ठेवले... तिने गाडी बऱ्याच वेगाने नेली... रतीच्या घरासमोर तिने करकचून ब्रेक दाबला... आत प्रवेश करताच रती आणि निशीगंधा बाई एका कोपऱ्यात तिला दिसल्या... रतीला तिला पाहून १०० हत्तींचे बळ आल्यासारखे वाटले.... सोनल ने कलश लपवून आणले होते पण त्यांचे अस्तित्व तिला लपवता आले नाही..तिच्या येण्याने दिक्षा अस्वस्थ होऊ लागली... ती भयावह भ्याड सावली ही तिथे आली...ती ही तळमळत होती... दैवी अस्तित्व दोघांनी ही गुदमरून टाकत होते.... रतीच्या लक्षात यायला वेळ.लागला नाही... तिने राजर्षी नी सांगितल्याप्रमाणे मंत्रजापाची सुरुवात केली...

गायत्री मंत्र

ॐ भूर्भुवः स्वः

तत्सवितुर्वरेण्यं

भर्गो देवस्य धीमहि

धियो यो नः प्रचोदयात्

 हा मंत्रजाप आणि श्री शंकर भगवानाची आराधना करून हळूहळू सप्तनद्यांच्या पाण्याचा शिपका मारून त्या दोन दृष्ट आत्म्यांना नरकसदनी पोहचवण्याचा काम चालू केले... ते दोघेही भयंकर रित्या किंचाळत होते... कानाचे पडदे फाटावे अशी अवस्था होती तिथे... रतीचे बळ कमी फडू लागले ती आता डगमगू लागली...

एक कुंकवाचा शिपका थेट दिक्षाच्या दिशेने उडाला. ते अभिमंत्रित कुंकू होते.. तिने पेट घेण्यास सुरुवात केली... राजर्षि स्वतः रतीच्या मदतीला धावून आले होते.... त्यांनी पंचामृताचा ही शिपका दिक्षावर टाकला... हा घात दिक्षा सहन नाही करु शकली.. आणि तिची तिथेच राख झाली... दिक्षाचा अंत झाल्यावर ते भ्याड ही खाली कोसळले... तेव्हा राजर्षी नी पुढील हालचालीसाठी रतीला उठण्यासाठी सांगितले... रती हातात पंचामृताचा कलश घेऊन त्या सावलीच्या दिशेने निघाली.... तिने संततधार धरून त्या सावलीचा नाश केला... ती सावली तळमळत होती ओरडत होती.. पण अखेरीस ती तिच्या नरकसदनी पोहोचली... आणि त्याच क्षणी रतीचे बाबा शिरीश जोशी ही मुक्त होतात... रतीला भरपूर आशीर्वाद आणि निशीगंधा बाईंना आसवे देऊन अनंतात विलीन होतात.. रती राजर्षी चे मनापासून आभार मानते.. आणि ते ही कधीही मदत लागली तर सांग असे म्हणून प्रस्थान करतात..

पहाटे चे ४ वाजले होते... पक्षांच्या किलबिलाटाने सगळं प्रसन्न वाटू लागले.... रती तिच्या आईसोबत आणि बाबांच्या आठवणीं सोबतपुन्हा जगू लागली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror