तोडलेली कळी
तोडलेली कळी
आज जेव्हा मी गाडीत बसले ड्रयव्हरने ठिकाण विचारले तेव्हा म्हटले गांधीनगर झोपडपट्टी गल्ली नं.२ तेथे आठवते ती झोपडी ग्यानबा जाऊन २० वर्ष झाली. त्यानेच मला मरताना सांगितलेलं तू मला कचरापेटीत सापडली कुणाच पाप टाकलं पण मला पुण्यानं मिळाल. मी भीक मागून वाढवलं. मरताना मला पोलिसांनी घेतलं. अनाथआश्रमात वाढव शाळा शिकली प्रत्येक क्षणी समाजाच्या नजरा 'अवहेलना' शाप. वनवास, जुनी कपडे वापरून दिवस काढले. लज्जा झाकण्यासाठी लाज वाटेल इतके शब्द झेलले. आश्रमात अनेक नजरा कळी चुरगळण्याचा प्रयत्न केला मात्र कोणी पाप म्हणून तोडलेली कळी मात्र उमलण्याचा प्रयत्न करत होती. संघर्ष करत जगत होती.
या रामराज्यात सीतेला कशा परीक्षा द्याव्या लागल्या. ते स्वतः अनुभवलं ज्याला राम म्हणून बघावं तो रावण निघायचा. शेवटी आज ही कळी कोमेजून का होईना थोडी उमलली होती. एका तालुक्याची कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीत बसून माझ्या देवाचे ग्यानबाचे दर्शन घेण्यासाठी... माझ्या जन्मभूमीचे दर्शनासाठी आले. याची कल्पना फक्त मलाच होती. या २० वर्षात झाडावरून तोडून फेकलेली कळी कधी उमलतच नाही. मात्र सुदैवाने या कळीचे फूल झाले होते. पण ते मी माझ्या देवाला. जन्मभूमीला नाही वाहू शकत, कारण या देव लोकांत रामराज्यात देवाला वाहिलेली फुले फक्त गटारातच टाकली जातात. मात्र एक न वाहिलेली कळी मी या सीतेसाठी नक्कीच समाजासाठी अर्पण करीन. सीता मातेसाठी फुलांच्या कळ्यांपासून फुले व त्यांच्या माळा कर्तव्यदक्ष नारी त्या गुंफल्याशिवाय, ही तोडलेली कळी नक्कीच फुलल्याशिवाय, सुगंध दिल्याशिवाय, वाळणार नाही.
🌷🌷🌹🌹💐💐
