ती जरा वेगळी....
ती जरा वेगळी....
ती जरा वेगळी... ती तशी चारचौघांसारखी अजिबात नव्हती, ती जरा वेगळीच होती इतरांपेक्षा पण ती घरात असो वा बाहेर सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त तिच्यावर खिळलेल्या असायच्या. तिचं हसणं-दिसणं जरा हटके होतं,तिचं बोलणं तर त्याहूनही वेगळंच होतं. तिला ना चारचौघात हातात हात घालून चालायला आवडायचं...
एवढंच काय...! घट्ट मिठी मारायलाही तिला लाजायला नाही व्हायचं. कधी-कधी खुप हट्ट करायची कोणत्याही गोष्टीचा,पार ओक्साबोक्शी रडायची.
ती माझ्यासाठी माझा जीव की प्राण होती, तस तीच माझ्याशिवाय पान हलत नसायचं. प्रत्येक गोष्टीसाठी तिला मीच हवी असायची. मला दुःख नव्हतं तीच असं "स्पेशल चाईल्ड" असण्याचं उलट अभिमान होता तिच्यातल्या स्पेशलपणाचा.
खरं तर ती इतर नॉर्मल माणसांपेक्षा शहाणी आणि गुणी होती...
