आपण का जगतो...
आपण का जगतो...
आपण का जगतो...खरचं जगतो का आपण? मला तर हाच प्रश्नच पडलाय.....? मला हे हवं ते हवं ,याच्या सारखं हवं त्याच्या सारखं हवं,कधी-कधी तर इतरांपेक्षा लई भारी,वेगळं हवं,सगळ्यांनी आपली वाह वा करावी असं काहीतरी करावं.... यासगळ्यात खरचं जगतो का आपण? ना आई-वडील मुलाबाळांना नीट वेळ देता येतो,ना आपल्या थकलेल्या आई-वडिलांना,ना जवळच्या माणसांना. हे सगळं मिळवण्यात सारं तारुण्य तर हातचं निसटून चाललेलं असतं....
खरं तर आयुष्यातले पहिले 25 वर्षच जगायचे असतात(कित्येकजणांना माझा हा मुद्दा पटणार नाही.तुम्हीच सांगा सगळं मिळवे पर्यंत माणूस रिटायरमेंट ला येतो.मग सगळी सुख असून ही उपभोग असा नीटसा घेता येत नाही,तो पर्यत एखादया तरी रोगाने डोके वर काढलेले असते. उतारवयात गंमत अशी असते की आपण बोललेलं ऐकायला कोणाला इंटरेस्ट नसतो;आणि ते बोललेलं आपल्याला नीटसं ऐकू येत नसतं.कित्येकदा छोट्यामोठ्या गोष्टींचा विसर पडायला लागतो.
सांगा ना मग तुम्ही आपण का जगतो...? एखादया बैलाच्या शिंगाला जसा बेगडचा मुलामा चढवतो अगदी तसं दिखाऊ.....(खटकलं ना...!) खरं तर आपण सारे खुप भ्रमात जगत असतो.हा माझा,तो माझा,याच माझ्याशिवाय पानाचं हलत नाही वैगेरे-वैगेरे. असतं का हो असं?तर त्याचं उत्तर आहे "नाही".(जरा खटकेल मनाला मान्य करायला ,पण हेच अंतिम सत्य आहे).
आपण का जगतो......?कारण मायेच्या माणसांसाठी,निस्वार्थी नात्यांसाठी तिथं जगताना आपल्याला कधीचं पैसा-अडका,प्रसिद्धी,किंवा बडेपणाचा बागुलबुवा करावा लागत नाही. तिथं फक्त आणि फक्त आपापसांत पूर्णपणे विश्वास आणि नितांत वाहणारा प्रेमाचा झरा. बस्स एवढं पुरे आहे आपण जगण्याला......
