Trupti Thorat- Kalse

Others

3  

Trupti Thorat- Kalse

Others

जाणीव...

जाणीव...

1 min
231


     मदत करणारा मदत करतो...अमाप संपत्ती आहे म्हणून नाही...तर त्याच्यातली अजूनही "माणुसकी" जीवंत आहे म्हणून...घेणाऱ्याने पण पुन्हा परतफेड करावी जाणीव "उपकाराची" म्हणून...

आपल्या पडत्या काळात जो आपल्याला आधार देतो

तोच खरा आपला हितचिंतक असतो,जो फक्त पैशाने नाही तर मानसिकरित्या ही भक्कम आधार देतो.

पण,जो सुखाच्या क्षणी उपस्थित अन् दुःखाच्या

क्षणी,वाईट परिस्थिती तोंड लपवतो,साधी ओळखही 

दाखवत नाही तो आपल्याला हितचिंतक कसा बरं होवू शकेल....?

कोणत्याच बिकट प्रसंगी सावरत नसतो तर सावरण्याच फक्त नाटक करत असतो आपण कसे जास्त अडचणीत येवू याची व्यवसाय मात्र करत असतो.वरवर खूप वाईट वाटत रे तुझं असे म्हणतो....

पण मनातल्या मनात आपली तारांबळ कशी उडते हे पाहून मात्र जाम खुश असतो...

म्हणून वेळीच "सावध" व्हा आणि "सावज" होण्यापासून वाचा.आपली माणसं वेळीच ओळखायला शिका वेळ निघून हाती उरतो फक्त आणि फक्त पश्र्चाताप....

आपल्याला मदत करणारे साथ देणारे आणि कधी-कधी ओरडणारे आपल्याला चुकीचं वागल्यावर खवळणारे,नेहमी आपलं भलचं चिंतत असतात त्यामुळे एखाद्या छोट्याश्या गैरसमजामुळे नात्यात कटुता आणू नका....

माणूस महत्त्वाचं आहे तर त्याच कडू बोलणं औषध म्हणून गिळून टाका...

हे लक्षात घ्या बाबांनो आपलं चांगलं व्हावं असं वाटणारी माणसं खूप कमी असतात त्यांना जपा...

ती जर हातातून निसटली ना तर आपली गत मांज्या कापलेल्या पतंगा सारखी होईल उंचच-उंच दिशाहीन होऊन उडेल पण नंतर कुठेतरी अडकून पार फाटून जाईल...

वेळीच स्वतःला आणि आपल्या नात्याला सावरा नाहीतर सगळचं आवरण अशक्य होवून जाईल...

शेवटी इतकंच सांगेल....


"जाणीव उपकराची ठेवा त्याने नात्यांची उणीव कधीच भासणार नाही"...


एखाद्याने मदत केली

कदर माणुसकीची...

तुम्ही ही परतफेड करा

जाणीव उपकाराची...


Rate this content
Log in