Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

2  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

कन्यादान.....

कन्यादान.....

2 mins
128


एखादी गोष्ट दान करायची म्हणजे ती पुन्हा मागायची नसते. मग सांगा ना ज्या लेकीला आई-वडिलांनी लाडात अगदी तळहाताच्या फोडासारखं लहानाचं मोठं करायचं....... आणि मग एका वळणावर तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं अन तेही कायमचं.......किती यातना होतं असतील त्या आईबापाला ;काळजाचं नुसतं पाणी-पाणी होत हो........ कeळजाचाचं तुकडा असा दुसऱ्याला सोपवायचा म्हणजे.......


चांगल्या घरात गेली तर ठीक,नाहीतर त्यांना मरेपर्यंत जीवाला नुसता घोर.कन्यादान करताना बाप तर एखादया लहान मुलांसारखा ढसा ढसा रडतो,व्याही लोकांना हात जोडून विनंती करतो......लेक चुकली तर सांभाळून घ्या तिला....


ती तर बाबांची परी,आईची सावली तर लहान बहीण-भावांची लाडकी ताई असते; त्यांच्या प्रत्येक "प्रॉब्लेमची" ती "सोल्युशन" असते आणि कायम राहते.घराण्याची "ती" तर आण, बाण आणि शान ही असते.आई नंतर घरात प्रत्येकाला जीव लावणारी तिचं तर असते.जेवढी हट्टी असते ना तेवढीच ती समजुदार असते.......,


कित्येकदा आई सोबत बाबासाठी वादही घालते.ती साऱ्या घरादाराची शोभा असते.माहेरच्या "अंगणातली तुळस" असते,तर सासरची साक्षात "लक्ष्मी " असते.ती माहेर व सासर यांच्यातला दुवा असते ;दोन्ही कडील मान-मर्यादा सांभाळण्यासाठी ती जीवाचं रान करते.कितीतरी गोष्टी ती निमूटपणे सहन करते, संसार करताना तारेवरची कसरत करून दोन्ही बाजू सांभाळुन घेते


कित्येकदा स्वतः अपमानित होते पण घराचा मान अभाधित ठेवते.खुपदा मानसिक-शारीरिक अत्याचार ती सहन करते,कधी बळी पडते आणि एखादीने केला अन्यायाला प्रतिकार तर ती कुलटा ठरते.


कदाचित.........

"ती" कन्यादानात "दान" म्हणून मिळते म्हणून तिची किंमत कोणालाच नसते.

ती मात्र "सासर "आणि "माहेर "या दोन्ही उबऱ्यांत आयुष्यभर अडकलेली असते,

आणि दोन्ही उंबरे तिला "परक्याचं धन" म्हणून मोकळं होतातं..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy