Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

2  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

कमावलेली नाती....

कमावलेली नाती....

1 min
178


हीच कमावलेली नाती भक्कम आधार असतात आपला. आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचे सोबतीही असतात आणि साक्षीदारही. हीच नाती फक्त आपला जाता तोल सावरतात आपली चूक झाली तर कान धरून खडसावतात. आपल्या दुःखात हिरमुसतात आणि हीच नाती आपल्या सुखात आनंदाने हुरळून पण जातात.अपयशात आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि हीच नाती यशात आपल्या पाठीवर शाब्बासकीची थाप ही देतात. हीच कमावलेली नाती आपली प्रगती पाहून तोंडभरून कायम सुखी रहा असा आशीर्वाद ही देतात.


      खरं तर आयुष्यात हीच जिवाभावाची कमावलेली नाती आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत, परिपूर्ण आणि समृद्ध करतात. ह्या कमावलेल्या नात्यांमुळेच आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यांच्याशी दोन हात करण्याचं बळ आणि आयुष्य जगण्याची स्फुर्ती कायम मिळत असते. ही नाती फालतू गैरसमजामुळे कधीच गमावू नका... कारण आयुष्यातील छोट्या-मोठ्या उणीवा भरून निघण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी फक्त आणि फक्त आपली,जिवाभावाची कमावलेली नातीच हवी असतात...


     मग तिथे पैसा, श्रीमंती, रूबाब कधीच कमी येत नाहीत... तिथे फक्त कमावलेली नातीच पुरून उरतात... आणि मी ह्या बाबतीत खरचं भाग्यवान आहे,ह्या कमावलेल्या नात्यांनी मी श्रीमंत, परिपूर्ण आणि समृद्ध आहे... म्हणून कायम आपली माणसं जपा....आपली कमावलेली नाती जपा...😊👍🙏


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy