जाण...
जाण...
जर स्वामींच्या नावाची फोनवर रिंगटोन ठेवून आणि स्वामींची स्टेस्ट्स ठेवून स्वामी भक्त होता आलं असतं तर अहो भाग्यच समजायचं ना त्या जातकाचा... एखादी वस्तू,गोष्ट,ऐश्वर्य वा व्यक्ती कष्ट न करता सहज मिळते ना तेव्हा त्याची कदर करायला शिका... कारण चांगलं मिळालं काही म्हणून सौभाग्य मानून नुसता उपयोग नाही,तर ते टिकवून पण ठेवता आलं पाहिजे तेवढी आपली कुवत वाढवा. नाहीतर छोट्याश्या कारणाने ते कायमचच गमवावं लागेल हे लक्षात ठेवा.
तो जगनिर्माता पालनहार सर्वांवर लक्ष ठेवून असतो, जे योग्य तेच आपल्या झोळीत देतो,पण आपण जर आपल्या अहंकारी पणाने वागून आपली झोळीच जर विरून ठेवली तर तो तरी काय करेल आपली झोळी फाटली तर...? म्हणून कोणी देवदेव करत असेल, व्रतवैकल्य करत असेल, कोणी गोरगरीबांची सेवा करत असेल,कोणी मुक्या जीवांना प्राणी-पक्षांना खाऊ घालत असेल, कोणी त्याच आवडणार काम तन्मयतेने करत असेल तर त्याला हसू नका किंवा त्याला नाव ठेवू नका, त्याचा दुस्वास करू नका... ती त्या व्यक्तीची अतूट श्रद्धा असते... असं कराल तर लक्षात ठेवा स्वामींना हे कधीच आवडलं नव्हत आवडणार नाही... यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त पापाचे भागीदार होणार आहात....
स्वतःच्या बुद्धीचा कस लावा एखादी गोष्ट समजून घेताना....नाही की कोणाचे फुकटचे सल्ले... लक्षात घ्या जे कराल ते स्वामी पहायला समर्थ आहेत... म्हणूनच योग्य मार्ग निवडा जे चांगलं मिळालंय ते कायम टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या पात्र बना...त्यापासून कारणे सांगून लांब पळाले तर विनाश नक्कीच....कारण स्वामी सांगतात,
"भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे"
पण कोणाच्या जे थोरामोठ्यांचा मान ठेवतात, गरिबांची जाण ठेवतात, कधीच कोणत्या गोष्टीचा माज करत नाही, योग्य सत्कर्म करून, योग्य मार्गाने जात असतो त्यांच्या आणि फक्त त्यांच्याच पाठीशी स्वामी असतात... बाकी आता आपण सारे सुज्ञ आहातच...
।।श्री स्वामी समर्थ।।
