dhanashri kaje

Horror Thriller

3.1  

dhanashri kaje

Horror Thriller

ती... एक ट्रिप

ती... एक ट्रिप

3 mins
256


वर्तमान काळात... 


"कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, आपल्याला समजतच नाही जे समोर घडतय ते खर आहे की एक भास."


"नमस्कार माझ नाव प्रतीक आणि ही कथा माझी आहे."


"मला तो दिवस आज ही आठवतो. आम्ही चार मित्र. मी, तुषार, आरव, आणि विहंग चौघांना ही अडव्हेन्चर ट्रिपची खूप आवड. कुणाला ही एखाद्या ठिकाणाची माहिती मिळाली की लगेच ट्रीपला निघायचो पण या वेळी का कुणास ठाऊक मला माझ मन जाऊ नकोस अस सांगत होत. आणि आता मला कळतय मी आपल्या मनाच तेव्हा ऐकल असत तर..."


पण म्हणतात न. "प्रत्येक गोष्ट वेळ आली कीच होत असते. वेळेच्या आधी कुणाला काहीच मिळत नाही."


भूतकाळात... 


आजचा दिवस...

वेळ सकाळी 10 वाजताची...

प्रतीकच घर...


"प्रत्या ए प्रत्या चल लवकर आवरल का तुझ आम्ही आलोय. (मनात बोलत ) छायला या प्रतीकला मुलींपेक्षा ही जास्त वेळ लागतो. ए चल न यार लवकर बरच लांब जायचय अजून."


हॉर्न वाजवत तुषार प्रतीकला आवाज देत होता. कारण यावेळेसची ट्रिप त्याने प्लॅन केली होती. आणि आता त्याला तीथे लवकरात लवकर पोहोचायचं होत. तुषार ने ही ट्रिप प्लॅन करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. खूप शोधा शोध केल्या नंतर त्याला ते ठिकाण मिळाल होत. आणि आता चार ही जण ट्रीपला निघाले होते.


पण त्यांना काय माहित होत पुढ एक मोठ संकट आधीच त्यांच्या स्वागतासाठी उभ आहे.


प्रतीक आपल आवरून गाडीत बसतो आणि गाडी सुसाट आपल्या रस्त्याने धावू लागते. चौघ ही खुशीत असतात. गाणी गुणगुणत त्यांचा प्रवास सुरु असतो. तस मध्येच विहंग त्याला विचारतो.


"यार, तुषार आता तरी सांग आपण नेमक कुठे जातोय. तुझ न कायम हे असच असत बघ शेवट पर्यंत सांगत नाहीस आणि पोहोचल्यावर समजत ती जागा भूतीया आहे म्हणून. यावेळेस अस काही नाही न." विहंग


"तु चिल कर रे, मला एक सांगा तुम्ही आज पर्यंत मी एखादी ट्रिप प्लॅन केलीये आणि ती तुम्ही एन्जॉय करू शकला नाहीत अस कधी झालय का? माझ्या प्लॅनिंग मुळे तुम्हाला कधी कसला त्रास झाला का?" तुषार


"नाही कधी कसला त्रास तर नाही झाला. पण मनात एक भीती तर असतेच न. त्यातून तुला भूतीया जागा जास्त आवडतात. म्हणून विचारलं बस." विहंग


"छायला, विहंग तु न घाबरटचा घाबरटच राहशील बघ. थोड धीट बन आणि हो ही जागा भूतीया नाहीये बर का काळजी करू नकोस. पण हो तुम्ही ही सुद्धा ट्रिप पहिल्या ट्रिप्स सारखीच एन्जॉय कराल एवढ नक्की." तुषार


चार ही मित्र आपापसात गप्पा मारत प्रवास करत असतात. होता होता रात्र होते. तस तुषारने बुक केलेलं हॉटेल येत.


वेळ रात्रीची...

बरोबर 9 वाजता...

हॉटेल ब्लु डायमंड...

रिसेप्शनवर...


"हाय, मी तुषार आमची आजची बुकिंग होती." तुषार


"तुषार कारखानीस का?" रिसेप्शनीस्ट


"हो, मीच तो." तुषार


रिसेप्शनीस्ट त्याला चावी देतो. चौघ चावी घेतात आणि आपापल्या रूमकडे निघून जातात.


काही वेळा नंतर...


प्रतीकच्या रूममध्ये...


प्रवास करून प्रतीक खूपच थकलेला असतो. तो रूमच दार उघडतो आपली बॅग ठेवतो आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. तो फ्रेशच होत असतो तोच त्याला आरशात आपल्या मागे कुणी तरी उभ असल्याचा भास होतो.


विस्कटलेले केस काळीकूट्ट सावली त्याच्या कडे नजर रोखून बघतीये अस त्याला जाणवत ते बघून तो अचानक मागे वळून बघतो तर तीथे कुणीच नसत ते बघून त्याला दर्दरून घाम फुटतो. आणि तो फ्रेश न होताच बाहेर येतो.


इकडे...


तुषारच्या खोलीत...


तुषार आपल आवरण्यात मग्न असतो. तेवढ्यात त्याला एक मुलगी आवाज देते. तो आवाज ऐकून तो मागे वळून बघतो तर तीथे कुणीच नसत. असतो फक्त हसण्याचा भयानक आवाज ते हसणं ऐकून तुषारची परिस्थिती देखील प्रतीक सारखीच होते. तो भयानक आवाज ऐकून तुषार प्रचंड घाबरलेला असतो. आणि बॅग न उघडताच खोली बाहेर येतो.


इकडे...


विहंग आणि आरवला देखील कुणी तरी आपले पाय खेचत असल्याचा अनुभव येतो आणि म्हणून भीतीने या हॉटेलमध्ये काही तरी गडबड आहे असा विचार करून दोघ ही खोली बाहेर येतात. विहंग प्रतीक आणि आरव तुषार ची वाटच पहात असतात तोच तुषार खोलीतून बाहेर येतो व सगळे धीर गंभीर होऊन एकमेकांकडे बघु लागतात. आणि हॉटेलवर न थांबण्याचा निर्णय घेऊन आपल्या बॅगा घेऊन हॉटेल बाहेर पडतात.


दुसऱ्या दिवशी...

वेळ सकाळी 7 वाजताची...

प्रतीकच घर...


प्रतीक चहा घेत घेत पेपर वाचत असतो. आणि पहिलीच बातमी असते.


"ब्लु डायमंड हॉटेलला आग लागून रिसेप्शनीस्ट सह आठ जण ठार."


वर्तमान काळात...


"त्या दिवशी आम्ही अजून थोड्या वेळ थांबलो असतो तर आम्ही चौघ वर आकाशात कुठे असतो माहित नाही पण या जगात नक्कीच नसतो. ते नेमक काय होत आणि आम्हालाच हा अनुभव का आला माहित नाही. पण या घटनेने एक गोष्ट मात्र केली आणि ती म्हणजे आमच्या वरच एडव्हेन्चर ट्रिपच भूत घालवल. आता आम्ही चौघ ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत." प्रतीक 



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror