dhanashri kaje

Inspirational

4  

dhanashri kaje

Inspirational

तुळजा

तुळजा

4 mins
262


एक तुळजा नावाची विधवा स्त्री असते. तिला ओंकार आणि गणेश नावाचे दोन मुलं असतात. तुळजा परिस्थितीने गरीब असते आणि आशिक्षितही असते. तिच्या नवऱ्याने बऱ्याच जणांकडून कर्ज काढलेलं असत. आणि ते कर्ज फेडता न आल्याने तो आत्महत्या करतो. आणि म्हणून कर्जदारांचे कर्ज फेडण्याची तसेच आपल्या दोन मुलांची जबाबदारी तुळजावर येऊन पडते.

अशातच तिला समजत आपल्या मोठ्या मुलाला एक असाध्य आजार झाला आहे. हे ऐकून तुळजा कोलमडून पडते तिचा धीर सुटतो. तिचं मन अस्वस्थ होत. "आता पुढे काय करायचं? आपली परिस्थिती गरीब आहे. त्यातुन आपण अशिक्षित आणि आता आपल्यावर आपली मुलं आणि आपल्यावरच कर्ज फेडण्याची जबाबदारी देखील आली आहे. हे काय कमी होत कि, आपल्या ओंकारला मधुमेह झाला आहे." तुळजा विचारमग्न असते तेवढ्यात तिच्याकडे आपले पैसे वसुल करायला काही लोक येतात आणि तिला आवाज देतात. "वहिनी..ओ.. वहिनी कुणी हाय का घरात?" तुळजा लगेच दारात येते आणि आपले हात पुसत त्यांना विचारते. "काय काम काढलं जी? बर हाय न सगळं" त्या माणसांपैकी एकजण बोलतो. "तुळजा अजुन किती दिस अस चालणार हाय? किती दिस झाले हायसा आमचा पैका कदी मिळणार हाय? तुझा धनी तुझ्यावर कर्ज करून गेला अन आता तुबी असच करतीयास." विनवणी करत तुळजा बोलते. "इतक्या दिस थांबलेसा थोडं आणखी काही दिस थांबा की, मी तुमचे पैन पै चुकते करन." ती लोक हे ऐकल्यावर तिथुन निघुन जातात. आणि ही विचारात पडते. खुप विचार केल्या नंतर तुळजा अचानक उठते आणि काम शोधायला घरा बाहेर पडते तिच्या डोक्यात एकच विचार घोळत असतो तो म्हणजे आपला मुलगा ओंकार आणि कर्जदार. तुळजा अशिक्षित असते पण व्यवहार कुशल असते तिला घरातली सगळी काम येत असतात म्हणून ती कुठे काम मिळत का ते बघायला जाते. खुप फिरते पण तिला कुठेच काम मिळत नाही शेवटी ती घरी येते.

अस रोज सुरू असत तुळजा नोकरी शोधायला जाते आणि रिकाम्या हाती परत घरी येते. पंधरा दिवस झालेले असतात. एक संध्याकाळची वेळ असते तुळजा आपल्या कामात मग्न असते अचानक तिला आठवत आपण दागिने बनवायचो ती विचार करते तेच काम जर आपण परत सुरू केलं तर? ती लगेच पैशांच्या डब्याकडे जाऊन आपल्याकडे किती पैसे आहेत हे चेक करते आणि त्यातले थोडे पैसे घेऊन पन्नास एक गळ्यातल्यांचे सेट तयार होतील इतके दुकानातून समान आणते तसेच रात्रभर बसुन दागिने तयार करते. तुळजा अशिक्षित असते तिला कुणीच काम देत नाही पण ती हार मानत नाही ती आपल्या कौशल्याने खुप सुंदर दागिने तयार करते आणि घरोघरी जाऊन विकुन येते ते दागिने इतके सुंदर असतात की ते खुप पटकन विकले जातात कुणी कुणी तिला तर ऑर्डर देखील देतात ते बघून तिला खुप हुरुप येतो त्या दागिन्यांचे तिला चार हजार मिळतात वेगवेगळे मोती सुबक रंगसंगतीमुळे तिचे दागिने खुपच उठावदार दिसत असतात. तुळजा एक खुप मेहनती स्त्री असते तिला माहिती असत आपल्याला काय करायचं आहे म्हणून पहिल्याच दिवशी जेव्हा तिला 4000 हजार मिळतात तेव्हा तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो ती त्याच आत्मविश्वासाने थोडे पैसे वाचवत बाकीच्या पैशाने समान आणुन दागिने तयार करते आणि आपला एक छोटासा व्यवसाय सुरू करते.

एक दिवस असच तुळजा दागिने विकायला बाहेर पडलेली असते. रस्त्याने चालत असताना तिला अचानक वैदेही भेटते. वैदेही एक समाज सेविका असते आणि गरजु महिलांसाठी काम करत असते. तुळजा आपल्या कडील काही सेट्स वैदेहीला दाखवते. तसेच घेण्याची विनंती करते. वैदेहीला दागिने खुपच आवडतात ती तिच्याकडुन एक गळ्यातल्याचा सेट विकत घेते. आणि तिच्याकडच कौशल्य बघुन ती तुळजाला म्हणते. "तुमच्या कडचे दागिने तर खुपच छान आहेत ताई. मी गरजु महिलांसाठी काम करते. तुम्ही त्या महिलांना दागिने बनवायला शिकवाल का? आम्ही तुम्हाला त्याच योग्य मानधन देखील देउत." हे ऐकल्यावर तुळजाचा आनंद गगनात मावत नाही ती खुप खुश होते. त्याच आनंदात तुळजा वैदेहीला विचारते. "ताई म्या शिकलेली न्हाय बस आवड होती म्हणून ह्ये शिकले ह्याचे पैक बी कमी होत. म्हणून शिकु शकले म्या. मला ह्याच पैक किती मिळतील?" हसुन वैदेही सांगते. "तुळजा ताई तुमचे दागिने खुपच सुंदर आहेत तुम्ही शिकला जरी नसलात तरी तुमच्याकडे एक खुप सुंदर कला आहे तुमच्या ह्या कलेचं मोल होऊ शकत नाही पण तुमच्या मेहनतीचं मानधन आम्ही तुम्हाला नक्कीच देउत 50,000 हजार रुपये. आणि हे ऍडव्हान्स 30,000 हजार रुपये. आता कराल आमच्या बरोबर काम?" तुळजा खुप खुश होते आणि "हो" सांगते. दोघी एकमेकींची आनंदाने गळाभेट घेतात आणि आपापल्या रस्त्याने निघुन जातात. दुपारी घरी आल्यावर तुळजा आपल्या मुलांना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि आपल्या नवऱ्याने ज्यांच्या कडुन पैसे उधार घेतलेले असतात त्यांना बोलवायला सांगते. ओंकार आणि गणेश लगेच सगळ्यांना बोलवायला जातात काही वेळातच सगळे तिच्या घरी येतात तुळजा त्या सगळ्यांचे पैसे परत करते आपल्या मुलांना चांगले कपडे घेते आणि ओंकारची ट्रीटमेंट देखील सुरू करते. 

तुळजाने अशिक्षित असुन देखील आपल्या कौशल्याच्या बळावर सगळकाही मिळवलेलं असत.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational