dhanashri kaje

Inspirational Others

3  

dhanashri kaje

Inspirational Others

भरारी

भरारी

3 mins
384


ती तशी दिसायला फार सुंदर देखणी नव्हती. आणि फार शिकलेली सुध्दा नव्हती. सगळे जण तिला हिणवायचे काही बाही बोलायचे कुणी कुणी तर अगदी तोंडावर देखील बोलायचे. ती हिरमुसली व्हायची रडायची विचार करायची. "मी जर दिसायला सुंदर नाही, कमी शिकलेली आहे तर यात माझी काय चूक."

ती सतत हाच विचार करत बसायची ती म्हणजे. 'श्वेता' श्वेताच्या अश्या वागण्या मुळे तिचे आई वडील सुध्दा अगदी वैतागले होते. त्यांना फक्त एकच काळजी होती ती म्हणजे आपल्या एकुलत्या एका मुलीची श्वेताची. ते सारखा विचार करायचे. "आपल्या नंतर आपल्या मुलीच कस होणार तिच्या अशा दिसण्यामुळे आज तिच्याशी कुणी लग्न सुद्धा करायला तयार होत नाही."

अश्या चर्चा सतत श्वेताच्या घरात चालू असत. तिला नेहमी वाटायच एकदाचा आपण जीवच देऊन टाकुत म्हणजे सगळ्यांची काळजी तरी मिटेल. ती देखणी नव्हती फार शिकलेली सुद्धा नव्हती जेमतेम बारावी झाली होती तिची.

पण म्हणतात न. प्रत्येकाच्या आयुष्यात किती ही संकट आली तरी देव त्यांच्या आयुष्यात एक तरी स्ट्रॉंग पॉईंट देतोच. श्वेताला तो स्ट्रॉंग पॉईंट शिवणकामच्या आणि कंप्युटरच्या रुपात मिळाला होता.

तिला शिवणकलेची आणि कम्प्युटरची खूप आवड होती म्हणून दहावी झाल्यानंतर तिने शिवणकला आणि काम्प्यूटर शिकून घेतलं होतं.

ती एक उत्तम डिझायनर सुध्दा होती ती स्वतः चे ड्रेस स्वतः च डिझाइन करायची पण लोकांच्या आणि घरच्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे श्वेता पूर्ण नकारात्मक विचार करायला लागली होती. तिच्यात आत्मविश्वासच राहिला नव्हता.

एक दिवस श्वेता आयुष्याला कंटाळून नदीत जीव द्यायला गेली ती नदीत उडी मारणार तेवढ्यात तिच्या एका मित्राने राहुल ने ते पाहिलं आणि तिला वाचवलं. राहुल सुद्धा त्याच शिवण क्लासमध्ये शिकत होता जिथे श्वेता शिकत होती सगळे श्वेताला हिणवायचे तिथे फक्त राहुलच तिला समजून घ्यायचा. पण क्लास झाल्या नंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले आणि ते दोघ ही तब्बल दोन वर्षांनंतर समोरासमोर आले ते ही असे. श्वेता राहुलला आपल्या मनातल सगळ सांगत असे.

असच त्या दिवशी सुद्धा दोघांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता श्वेतानी आपल्या जीव देण्याचं कारण ही सांगितलं. ते सगळं ऐकून राहुल नी एक क्षण तिच्या कडे पाहिलं आणि तो लगेच उठला व तिला घेऊन एका ठिकाणी येतो ते ठिकाण असत. 'विद्यानिकेतन अंधमुलांची शाळा'

राहुल तिला समजावतो. "श्वेता आज तुला मी इथे का आणलय माहितीये. कारण ही जागा मला प्रेरणा देते जगण्याची उमेद देते श्वेता आज पर्यंत लोकांनी तुला रंग रूपा वरून शिक्षणा वरून जज केलं तुला हिणवल म्हणून तु इतक अनमोल आयुष्य संपवायला निघाली होतीस? तु हे का विसरलीस तुझ्या कडे शिक्षण जरी कमी असल तु दिसायला जरी ठीक ठाक असलीस तरी तुझ्याकडे दोन मोठी शस्त्र आहेत आज तु त्यांचा उपयोग करून किती पुढे जाऊ शकतेस आपलं नाव कमावू शकतेस. ही मुलं बघ तुझ्याकडे आई बाबा भावंड आहेत, पण फक्त या दोन नकारात्मक विचारांमुळे आज तु जीव द्यायला निघाली होतीस मग यांच्या कडे तर काहीच नाही न ग.. ह्यांनी काय करायचं घरच्यांनी टाकून दिलेली ही मुलं अनाथ आश्रमात राहतात आणि इथे येऊन शिकतात तरी सतत यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो.

विचार कर आज जर ह्या मुलांनी सुद्धा तुझ्या सारखाच विचार केला तर समाजात अंध मुलच काय मुलच राहणार नाहीत. तुला माहीत आहे मी इथे गेल्या तीन वर्षांपासून येतोय ही मूल मला प्रेरणा देतात जगण्याचं बळ देतात. यातल्या काही मुलांना परिस्थितीने अंधत्व आलय तर काही जन्मतःच आंधळी आहेत जर यांनी जगण्याची उमेद सोडली नाही तर तुझ्याकडे सगळं असून सुद्धा तु जगण्याची उमेद का सोडत आहेस?"

श्वेता नुसत एक सारख त्या मुलांकडे बघून विचार मग्न होती. काही क्षणातच ती भानावर येते आणि राहुलला म्हणते. "खर आहे तुझं. राहुल तु माझा खरा मित्र आहेस तू आज माझे डोळे उघडलेस माझ्यातला आत्मविश्वास मला परत मिळवून दिलास आज तु मलाच माझी परत नव्याने ओळख करून दिलीस. आता याच आत्मविश्वासाने मी भरारी घेईन आणि एक नवी ओळख निर्माण करेल." दोघ त्या मुलांकडे बघत गप्पात रंगून जातात.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational