Vishal Patil "Vishu.."

Horror Thriller

4.7  

Vishal Patil "Vishu.."

Horror Thriller

ती एक रात्र..

ती एक रात्र..

7 mins
472


आशिष एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला नुकतेच एक वर्ष झाले नोकरीला लागलेला. एक दिवस असेच घरातील काही किरकोळ कामा वरून त्याचे घरच्यांशी भांडण होते. भांडण इतके विकोपाला जाते की आशिष चिडलेल्या मनस्थितीतच तडकाफडकी घरातून बाहेर पडतो ते कायमचंच घर सोडून निघायला. सकाळी चिडून बाहेर पडलेला आशिष संध्याकाळ झाली तरी परत नाही आला. आशिषचे घरच्यांना आता काळजी वाटू लागली होती. आईचे डोळे अलगद ओलावले, बाबांची सर्वत्र शोधाशोध चालू झाली, त्याची बहीण सर्व ओळखीतले लोकांना फोन करून आशिष बद्दल विचारपूस करू लागली. दोन तीन तास गेले जवळ-जवळ संपूर्ण शहरभर शोधा शोध केली पण आशिषचा काहीच ठाव ठिकाण नाही लागला. शेवटी एकच मार्ग होता तो हरवल्या बद्दल पोलीसात तक्रार दाखल करण्याचा. आशिषचे बाबांचे सोबत त्यांचे मित्र व शेजारील काही लोक पोलिसात आशिष हरवलेची तक्रार दाखल करून येतात.

इकडे आशिष सकाळी चिडून बाहेर पडलेला न खाता-पीता तसाच दिवस भर चालत चालत शहरापासून खूप दूर पोहोचलेला असतो. भयंकर चिडलेल्या आणि डोक्यात अनेक विचार घेऊन बाहेर पडलेला आशिष त्याला माहितीच नसते आपण कोठे, कसे आणि कोणत्या दिशेला चाललोय. आता रस्त्यावर पूर्ण काळोख असतो.. सर्वत्र सुन्न करणारी शांतता.. अधून मधून येणारे एक दोन गाड्या.. आशा भयान शांततेत गेलेवर त्याच डोकं ठिकाणावर येत पण तेव्हा खूप वेळ निघून गेलेला असतो. कारण त्याला काहीच माहिती नसते आपण कोठून, कोठ आणि कसे आलोत ते. पूर्ण काळोख अधून मधून येणाऱ्या एक-दोन गाड्या पण त्या भयाण एकांतात एक ही कोणी मदतीला गाडी थांबवेनात. जस जशी रात्र वाढत गेली तस तसा थंडीचा कडाका ही वाढत चालला होता. आता आशिषला ही कळून चुकले की आपण किती मोठ्या संकटात सापडलो आहोत. तरी ही तो वाट दिसेल तिकडे चालत होता. रागाचे भरात बाहेर पडलेने त्याने सोबत काहीच आणलेले नसते ना मोबाईल, ना घड्याळ आणि ना पैसे..

त्या वाटेवरून दूरवर त्याला एका ठिकाणी उजेड दिसतो आणि तो मग त्या उजेडाचे दिशेने मार्गस्थ होतो. पोटात काहीच नसतं, पायातही तितकसं बळ राहिलेलं नसतं, कडाक्याची थंडी आणि तिथे जवळपास खाण्यासाठीही काहीचं नसते. त्या दूरवर दिसणाऱ्या उजेडामुळे त्याला आशेचा एक किरण दिसलेला असतो. जाताना वाटेतच त्याचा पाय अचानक मधेच अटकतो, तो पाहतो तर काय?.. त्या रस्त्या कडेला एक जुने फाटलेलं घोंगडे पडलेलं असते आणि त्यातच त्याचा पाय अटकलेला असतो. तो कसाबसा आपला अटकलेला पाय त्या घोंगड्यातून काढतो. ते घोंगडे पाहून त्याचे मनात विचार येतो, थंडी ही खूप आहे मग आपण हे घोंगडे पांघरले तर अंगा भोवती थंडीची तीव्रता ही कमी होईल थोडी. मग तो ते रस्त्या कडेला पडलेलं फाटलेले घोंगडे अंगाभोवती पांघरतो आणि कसा बसा त्या उजेडा पर्यंत पोहोचतो आणि पाहतो तर काय?.. एका झाडा जवळ एक शेकोटी पेटवलेली पण तिथे तो इकडे-तिकडे आजूबाजूला त्या शेकोटीची उजेडात पाहतो तर तिकडे कोणीच नसतं. आता पुन्हा त्याचे मनाची घालमेल वाढली. थंडीचा कडाकाही खूप असतो मग तो त्या शेकोटीजवळ जाऊन बसतो. काही वेळानी त्या शेकोटीचे आगीची तीव्रता वाढते त्यामुळे उष्म्याच्या अधिकच झळा बसू लागलेने तो तसाच बसलेले अवस्थेत हळू हळू मागे मागे सरकू लागतो. तोच इतकेतच त्याचा हात एका खाद्य पदार्थांनी भरलेल्या कागदी ताटात जातो. तो ते खाद्य पदार्थांनी भरलेले कागदी पान हळू हळू शेकोटीचे उजेडात आणतो. त्याला आश्चर्य वाटते इथे तर आपल्या शिवाय कोणीच नाही मग हे इतके खाद्य पदार्थांनी भरलेले पान आले तरी कोठून आणि कोणी ठेवले असले ते इथे?.. तो पुन्हा इकडे तिकडे पाहतो तर कोणीच नसते व पुन्हा त्याची नजर त्या खाद्य पदार्थांनी भरलेल्या कागदी पानाकडे जाते. त्यानी दिवसभर काहीच खाल्लेले नसते त्याला खूप भूक ही लागलेली असते तो विचार करतो, इथं आसपास तर कोणीच नाही आणि आपलेला भूक ही खूप लागले जर आपण या पानातील थोड पदार्थ खाल्ले तर तेवढाच पोटाला थोडा आधार वाटेल हा विचार करत तो ते खाद्य पदार्थांनी भरलेले पान जवळ घेऊन खाणार इतकेतचं पाहतो तर काय??.. त्याचे दोन्ही हात.. त्याचे ते दोन्ही हात रक्तानी माखलेले असतात..

आशिष स्वतःचे असे रक्तानं माखलेले हात पाहून पुरता खबरून जातो काय करू आणि काय नको होते त्याला.. कारण त्याचे आजूबाजूला तर कोणीचं नसते.. तो ते खाद्य पदार्थाचं पान तिथेच टाकून उठतो आणि ते अंगावरील पांघरलेले फटाके घोंगडे झटकून पाळणार इतकेत.. त्या शेकोटीचे उजेडात तो पाहतो तर काय ?? त्याचे संपूर्ण अंगावरील कपडे देखील लाल लाल रक्तात माखलेले.. तो खूप घाबरतो मदतीसाठी इकडे तिकडे आरडा ओरड करतो पण त्या काळोख रात्री त्याचे मदतीला तिथे कोणीच नसते.. त्या कडक थंडीतही त्याचे अंगाला घाम फुटू लागतो.. साधारणतः मध्य रात्रीचे बारा-एक वाजले असतील त्यामुळे त्या रस्त्यातून जाणारे एक-दोन गाड्यांची वर्दळ पण आता बंद झाली होती. त्या भयाण शांत, एकांत, काळोख्या रात्री तो एकटाच तिथे बाकी सर्वत्र भयाण शांतता पसरलेली.. क्षणातच त्या शेकोटीतून "फट्ट" असा एकदम मोठा आवाज होतो आणि त्याचे पायात अचानक एक कवटी चा तुकडा त्या शेकोटीतून उडून पडतो. तो तिथून घाबरलेल्या अवस्थेत पळू लागतो आणि पुन्हा त्याचा पाय एका ढिगाऱ्यात अडकतो, पाहतो तर काय त्या ढिगाऱ्यातून अर्धवट जळलेला एक सांगाडा आणि त्यात त्याचा पाय अडकलेला. तो कसाबसा आपला पाय सोडवत आणि पुन्हा वाट सापडेल तिकडे धावत सुटतो. त्याला कळून चुकते की आपण एका स्मशान भूमीत आलो आहोत आणि ती शेकोटी नसून कोणाची तर चिता पेटवलेली होती. पुढे धावत जाणार इतकेतच पुन्हा त्याचा पाय अडकतो आणि तो पुरता घाबरतो कारण यावेळी त्याचा पाय एका मानवी शरीरात अडकलेला असतो. साधारणतः १८-१९ वर्षाच्या तरुण मुलाची ती बॉडी असते आणि त्याचा चेहरा पूर्ण रक्तानं माखलेला असतो. आशिष त्याचा अडकलेला पाय त्या तरुण मुलाचे शरीरातून सोडवणार इतकेतच त्याला त्या बॉडीमध्ये काहीतरी हालचाल जाणवते त्या तरुण मुलाची बॉडी त्याला पुन्हा पकडणार तोच तो वेगाने धावणार त्याचा पाय एका दगडात अडकतो आणि तो जोरात जमिनीवर कोसळतो व त्याचे डोके एका मोठ्या दगडावर आदळते. आशिष डोक्याला खूप जोरात मार बसलेने बेशुद्ध होऊन पडतो..

आशिष बेशुद्ध पडतो आणि तशी सर्वत्र सुन्न शांतता पसरते.

काही वेळानी त्या १८-१९ वयाचे तरुण मुलाचे बॉडीमध्ये काहीतरी हालचाल होऊ लागते. पाहता पाहता ती बॉडी जागेवर उठून बसते, उभी राहते, त्याचे रक्तालेल्या चेहऱ्याचे डोळे उघडतात. त्या तरुण मुलाची बॉडी आता हळू हळू आशिषचे बाजूला जाते आणि त्याचे रक्ताळलेले ते कपडे आणि चेहरा पाहून जोर जोरात ओरडते.. "भूत.. भूत.." तो तरुण आशिषला त्या अवस्थेत पाहून घाबरतो आणि तिथून जवळच असलेल्या आपल्या वाडीच्या दिशेने "भूत.. भूत.." करत धावू लागतो.. घाबरलेल्या अवस्थेत तो तरुण साधारणतः पहाटेच्या ४:०० ते ४:३० वाजताचे दरम्यान त्याचे वाडीवर पोहोचतो. तो वाडीचे दिशेने असा रक्ताळलेला, घाबरलेला चेहरा घेऊन त्याला सकाळी पहाटे वैरणीसाठी गेलेले वाडीतील काही लोक पाहतात. तो एका धनगर कुटुंबातील मुलगा होता त्याचे नाव बाळू. बाळू त्या वाडीतच एक छोटीशी झोपडी बांधून आपल्या वडिलांसोबत राहत होता. वाडीतील लोक त्याला त्याचे झोपडीमध्ये घेऊन जातात आणि त्याला पाणी वगैरे देऊन तो इतका का घाबरला आहे, तसेच त्याचे डोक्याला जखम कशी झाली विचारू लागतात. यावर तो गावकऱ्यांना घडलेली हकीकत सांगू लागतो "काल सकाळी आबा चा अपघात झाला आणि तो जागेवरच गेला.. नंतर वाडीतील मंडळींचे उपस्थितीत आपण आबा चे चितेला स्म्शानात दहन दिले.. सगळी वाडीतली मंडळी आपल्या आपल्या घरी निघून गेली.. पर माझा पाय तिथून निघेना आणि म्या तिथेच आबाच्या चितेला पेटतेल पाहत झाडा खाली घोंगड पांघरून बसलो होतो.. कधी दिस मावळला आणि अंधार पडला कळलंच नाही. आबा सकाळी मेंढ्या चरायला निघाला तोच काही वेळानं त्याचे अपघाताची बातमी वाडीवर आली आणि हुत्याच नव्हतं झालं.. माझा आबा मला एकटं सोडून गेला.. मला काय करू काही सुचत नव्हतं .. पाहता पाहता रात्र झाली आणि अचानक म्या पाहिलं की, लांबून कोणीतरी येत होते अंधारामुळे नीटस दिसत नव्हतं.. अजून थोडे पुढं आल्यावर पाहतो तर काय??.. शरीराला पूर्ण घोंगड गुंडालेली ती आकृती आबाचे चितेच्या दिशेनं येत व्हती.. म्या त्या झाडाच्या आडान दडून पाहिलं तर ते माझ्या आबाचच घोंगडे होत त्या आकृतीनं गुंडाळल्यालं.. ती आकृती हळूहळू चितेच्या दिशेने जात होती.. आबाचे चितेजवळ जाऊन बसली आणि काही वेळातच ती बसल्या बसल्या उलटी चालू लागली.. म्या घाबरलो आणि तिथून पळत सुटलो अन माझा पाय कशात तर अडीकला आणि म्या जोरात दगडावर आदळून बेशुद्ध पडलो.. नंतर शुद्ध आल्यावर पाहतो तर काय??. त्या रक्ताळलेले आबाचं घोंगड तिथंच चिते जवळ पडल्यालं पण त्यातली ती आकृती गायब झाली व्हती.. काही दूरवर पाहतो तर काय एक पूर्ण लाल भडक रक्तात माखलेली बॉडी तिथं पाडल्याली.. मी कसा बसा तिथून माझा जीव वाचवून पळालो ते थेट वाडीपर्यंत आलो.. आयुष्यात म्या पाहिलांदाच इतक्या जवळून भूत पाहिलं.. आता आयुष्यात कधी रातीचं स्म्शानात नाय थांबणार.."

इकडे आशिषला काही वेळानी शुद्ध येते.. आशिष उठून इकडे तिकडे पाहतो तर काय?? त्या १८-१९ वर्षाचे तरुणाची बॉडी तिथून गायब झालेली पाहून आशिष घाबरतो आणि आजूबाजूलाही कोणीच नाही फक्त चार पाच राखेचे ढिगारे. तो रात्री शेकोटी समजून बसलेला ती चिता देखील पूर्ण जळून राख होऊन गेलेली असते. आशिषचे मनात विचार येतो काल रात्री खरचं आपण भूत पाहिले का??.. रात्रीत कोठे गायब झाली त्या तरुण मुलाची रक्तानं माखलेली ती बॉडी??.. मग आशिष त्याचे अंगावरील रक्तानं माखलेली कपडे काढून फेकतो आणि तिथेच झाडाखाली पडलेले दुसरे घोंगडे पांघरून घेऊन घरी निघून जातो. घरी गेलेवर तो आपण केलेल्या चुकी बद्दल आई बाबांची माफी मागतो आणि स्मशानात त्याला रात्री आलेला तो भयानक, थरारक अनुभवही त्यांना सांगतो.. कसा तो घरातून बाहेर पडला.. कसा तो त्या स्मशान भूमीत जाऊन पोहोचला.. आणि त्या रात्री स्मशान भूमीत त्यानं पाहिलेलं ते तरुण मुलाचं भूत..


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror