STORYMIRROR

Vishal Patil "Vishu.."

Drama Romance

2  

Vishal Patil "Vishu.."

Drama Romance

ती जवळ आली अन्..

ती जवळ आली अन्..

2 mins
142

      आज व्हॅलेन्टाईन डे होता आणि कॉलेजमध्ये तिचीच चर्चा रंगली होती.. म्हंटले चला आपण ही पहावं जरा.. सगळेच इतक बोलत होते तिच्या बद्दल.. मग काय, गेलो मी पण मग आणि पाहिले निरखून जरा.. आणि मग खरंच खात्री पटली.. कॉलेजमध्ये सगळे तिच्या विषयी बोलत होते त्यावर विश्वास ही बसला.. पण पहिल्यांदा विश्वासच बसत नव्हता.. पण जेव्हा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले अन् खरंच हरवून गेलो.. काहीच सुचत नव्हते.. मी निशब्द होतो.. फक्त एकटक पाहत होतो.. बघता बघता ती खूपच जवळ आली होती.. आता फारसं अंतरही राहिले नव्हते मध्ये.. ती इतकी जवळ आलेली पाहून मनाची घालमेल अधिकच वाढली होती..

      काय करू अन् कसं करू आणि कोठून सुरवात करु काही काही सुचत नव्हते.. तिच असे अचानकपणे जवळ येण अनपेक्षितच होते.. माझ्यासोबत कॉलेजमध्ये सर्वांनाच हूरहूर लागली होती आता काय होणार.. मी पण कशीबशी मनाची तयारी केली.. मन घट्ट केले आणि पुन्हा नजर वर करून पाहिलं ती इतकी जवळ आली आहे तर आपलेला ही आता असे गप्प बसून चालणार नाही हे कळून चुकलं.. मग कॉलज आवारातीलच एका शांत निर्जन स्थळी गेला.. तिकडे एका बाकड्यावर जाऊन बसलो.. त्यामुळे आता मनाला थोडा एकांत मिळाला आणि तिच्या जवळ येण्याचे दडपण ही कमी झाले.. ती अगदी जवळ तोंडा समोरच आली होती.. मी माझ्या खांद्यावरील बॅग काढून बाजूला ठेवली आणि डोळे बंद करून जे पाहिले ते खूपच भयंकर लाजिरवाणे होते.. मला कल्पनाही करवत नव्हती असे काही होईल असे.. मी त्या बंद डोळयांनीच घाबरत घाबरतच देवाची प्रार्थना केली आणि हळूच डोळे उघडले.. आणि ठरवलं मनाशी आता नाही डगमगायचे जे होइल त्याला सामोरी जायचे ती जवळ आली म्हणून आपण नाही घाबरायचे आपणही धाडसाने तिच्यासमोर जायचे.. जे ठरवलं ते साध्य करायचेच कोणत्याही परिस्थितीत.. आता माघार नाही..

      मी माझ्या कॉलेज बॅगमधून माझे पुस्तक काढले आणि मनापासून अभ्यासाला सुरुवात केली.. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर परीक्षेच वेळापत्रक पाहिलं अन् खात्रीच पटली.. माझी कॉलेजची परीक्षा खूपच जवळ आली होती.. आणि मला कोणत्याही परिस्थितीत पास व्हायचच आहे.. अन् काही वेळापूर्वी बंद डोळयात पाहिलेलं मी नापास झालेच स्वप्न प्रत्यक्षात बदलायच आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama