Manasi Gangal

Others Drama

3  

Manasi Gangal

Others Drama

ती आणि तो

ती आणि तो

9 mins
1.1K


तिनं मनाशी ठरवून टाकलं . 


आज चा प्रयत्न शेवटचाच!!

असं खूपदा ठरवूनही ते घडत नव्हतं तिला मुळी त्याचा विरह सहन होत नव्हता! ओळख तशी फार जुनी नव्हती उणीपुरी महिन्याभराची.

. पण एक घाव तिच्या काळजावर झाला होता..


 तो चाळिशी पार आणि ही सुद्धा चाळिशी च्या उंबरठ्यावर ! तो दिसायला अगदी चार चौघांन सारखा मध्यम बांधा , गोरा , रुंद कपाळ आणि सॉल्ट अॅण्ड पेपर केसांचा, डोळे पिंगट आणि नजर तीक्ष्ण 

समोरच्याला एका नजरेत जोखणारा!

ती ! ती काहीशी स्थूल सुखवस्तू बांध्याची, गव्हाळ पण नाकी डोळी नीटस मोहक मधाळ नजरेची , अन मोकळया स्वभावाची !  


भेट कसली फेसबुक वरच फ्रेंड रिक्वेस्ट आली त्याची ति गांगरूनच गेली ... का काय विचारताय? अहो तिच्या लेकाच्या शाळेतल्या त्याच्या एक्स मैत्रिणीचा बाप निघाला तो .

ती अजूनही तिच्या लेकाला त्या मैत्रिणी वरून चिडवायची आणि लेकही अगदी मनापासून दाद द्यायचा 

अर्थात ती छोकरी शाळा सोडून गेलेली पण शंका येऊन हिने विचारलं अमुक अमुक तुमची मुलगी ?

उत्तर: हो !

तुम्ही कसं ओळखता??  

झालं गप्पांना आयता विषय मिळाला पण हे इतक्यावरच थांबलं नाही आता ती आणि तो एकमेकांशी मस्त फ्लर्ट करू लागले मेसेंजरद्वारे अन.मैत्री फुलायला लागली आणि अचानक त्यांन सांगून टाकलं ... मोडलय माझं घरटं 😞 पिल्लं आणि माझी ताटातूट झालीय .

एका कडवट गोष्टीनी माझ्या लग्नाची घडीच विस्कटली तिला खूप वाईट वाटलं आणि आश्चर्यही इतक्या पटकन यांन आपल्याला का बरं हे सांगितलं? एवढा विश्वास! आता मात्र फोनवर बोलायला हवं ! त्यांनी फोन नंबर दिला होता तिने कॉल केला मग पुन्हा एकदा उजळणी झाली कटु विषयाची आणि आता तिनही सांगून टाकलं त्याला तिच्या एकल पालकत्वाविषयी तो हळहळला, दोघेही काडीमोडाच्या प्रवासात एकमेकांचे आता सोबती झाले.

भेटीगाठी वाढल्या जवळीकही वाढली एकमेकांचे नव्या आयुष्यातले सोबती होउयात अशा आणाभाका हि घेतल्या . काही दिवस खूप सुंदर आणि फुल पाखरा सारखे गेले.

त्याचं त्या शहरात केवळ एक भाड्याचं घर होतं आणि तिथे तो एकटाच राहत होता कामानिमित्त सतत फिरतीवर ही असायचा पण जेव्हा शहरात असायचा तेव्हा आवर्जून तिला आणि तिच्या लेकाला भेटायला यायचा .तीही स्वतःची नोकरी सांभाळत स्वतःच्या एका छोट्याश्या भाड्याच्या घरात राहत होती .एकंदरीत भविष्याची बरीच स्वप्न त्यांनी रंगवली अगदी स्वतःचं टुमदार घर घेण्याचं स्वप्नही!


आता त्याचा वाढदिवस अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला तिनं खूप प्लॅनिंग केलं !

पण त्यानी कळवलं पुरात त्याच्या गावच्या घराचं खूप नुकसान झालंय .

वाढदिवस वगैरे नकोच. . ती हिरमुसली पण समजून घेतलं ! 

त्याला धीर देत राहिली पण हळूहळू तो तिला टाळू लागला. . अचानक हे काय घडतय ! धड बोलत नव्हता कि काही कळवत नव्हता. तिचा मात्र त्याच्यातला पाय गुंता वाढत गेला सतत त्याला फोन मेसेज करून ती जाणून घ्यायचा प्रयत्न करीत राहीली पण प्रतिसाद शून्य तिला काय करावं सुचेना तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं याला नाही का काही नातं ठेवायचं?

काही चुकलं का आपलं काही? की फसवले गेलोय आपण ? कि मग हा अशा कुठल्या अडचणीत आहे जे तो सांगूच शकत नाहीये?   एक ना अनेक असंख्य विचार तिच्या मनात फेर धरून नाचू लागले.


मधल्या काळात तिच्या लेकानं तिच्या भावना उमजून त्याला आपला भावी बाबा म्हणून स्वीकारलं होतं एक वेगळंच नातं आता त्या दोघांना मिळालं होतं पण याच्या अशा विक्षिप्त वागण्यामुळे ती मनस्वी संतापली होती कारण जर ही फसवणूक असेल तर ती केवळ तिची एकटीची नव्हती तिच्या लेकाची ही होती .तशी खंबीर. धीराची ती ! पण आताशा हळवी झाली पुन्हा पुन्हा त्याला संपर्क करायला अधीर होउ लागली 

मनात रंगवलेल्या स्वप्नांमुळे अन आता ती कोमेजून जातायत कि काय? काहीच वर्कआऊट का होत नाहीये? हे पाहून स्वतःवरच चिडायला लागली .

असेच काही दिवस गेले प्रतीक्षेत ! तो अद्याप परतला नाही कि त्यानं फोनही घेतले नाही आणि मेसेज ला रिप्लाय नाही.

पण ! 

पण .आज तो दिवस उगवला तिनं मनाशी निश्चय केला.

आजचा प्रयत्न शेवटचाच आणि त्याच्या फोनची रिंग वाजत राहिली

अजूनही प्रतिसाद शून्यच !

आज जवळजवळ एक महिना उलटून गेला पण तिने प्रयत्न सोडले नव्हते . .

आज इतक्या दिवसांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर जवळच्या एका रेस्टॉरंट मधला त्याचा फोटो दिसला . .

बरेच दिवस ती त्याचं फेसबुक व्हॉट्सअॅप वर काही अपडेट दिसतायत का हे चेक करतच होती 

आज सापडला अखेर.

मन त्याला पाहायला बेचैन झालं होतं! आता काहीही करून लवकरात लवकर त्याला गाठायचंच असा निश्चय केला होता , तिने रिक्षा बुक केली आणि हॉटेलच्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला.


इथवर पोचेपर्यंत तिच्या मनात असंख्य विचार चालू होते समोर भेटला तर काय बोलायचं ? कसं बोलायचं? कुणी सुरुवात करायची ? पण हा तिथे असेल का ? की एव्हाना निघून गेला असेल ?असुदे ! आपण मात्र जायचंच .बघुया तरी !

आज देेैव तिच्या साथीला होतं ती आत गेली आणि एका कोपऱ्यातल्या टेबलवर तिला तो दिसला !

ती थेट त्याच्या समोर जाऊन उभी राहिली तो मात्र फोनमध्ये तोंड खुपसुन बसला होता.


त्यानी हातातला कॉफीचा कप खाली ठेवला आणि वेटरला बिल मागवायला मान वर केली . पाहतो तर ही समोर !! एक क्षण मात्र त्याला वाटलं आपल्याला भास होतोय की काय पण हळू हळू त्याच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्याच्या भावांची जागा अाता काळजीने घेतली. . कसं फेस करू हिला ? आणि आता तेही इतक्या दिवसांनी?

त्याला काही सुधरेना. . एव्हाना ही शांतपणे त्याच्या समोर बसली .वेटरला हाक मारत तिने दोन नेस कॅफेची ऑर्डर सोडली आणि त्याच्या नजरेला शांतपणे नजर मिळवत ती बोलू लागली " जर या नात्यात घुसमट होत होती तर सांगायचस ना? मी अजिबात अडकवलं नसता तुला! पण माझ्या आणि माझ्या पिल्लांच्या भावनेशी असं खेळून काय मिळालं तुला?? असो! मला हे नातं नकोय !


पण मी मैत्रीचा हात पुढे करते ती जर जपावी असं वाटत असेल तर आत्ताच सांग !

त्यानं अधीरतेने तिचा हात हातात घेतला म्हणाला प्लीज !मला मैत्री हवीये तुझी !!..

पण मी हेही कबूल करतो कि मी या नात्यात आता नाही गुंतू शकत एका विचित्र परिस्थितीतून जातोय आजवर खूप समजून घेतलंस मला! आताही समजून घ्यायला अाली आहेस. . कळतंय ! पण मी तुला आता काहीच सांगू शकत नाही . मला खरंच माफ कर पण मैत्री तोडून जाऊ नकोस.

सगळ्यांनाच स्पष्ट बोलायला जमत असं नसतं ग! माझ्यातही हे धाडस न्हवत! आणि म्हणूनच तुझ्या समोर आजवर नाही येऊ शकलो ! खूप बोलायचय. आज की उद्या ते नाही सांगू शकत! पण मी येतो भेटायला ! आपण बोलूयात . .

तिने शांतपणे त्याचं ऐकून घेतलं पण आता तिच्या मनात एक विचार रुंजी घालत होता. . मुळात ज्या माणसानी आपल्याला इतकं इग्नोर केलं आपल्या भावनांशी अप्रामाणिक राहिला त्याच्याशी आपण मैत्री ठेवणार आहोत? खूप दुखावली गेली होती ती! चाळिशीचे मूड स्विंग्स, तेही चालू झाले होतेच पण तरीही तिने मैत्री कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. साफ वेगळाच निर्णय

होता! कारण , तिची मानसिक गुंतवणूक त्याच्यातून पूर्णपणे संपलेली ही नव्हती आणि आता जुन्या अलवार नात्याशी तिचे पाशही तुटले होते .

ती म्हणाली ठीक आहे भेटूयात! पण आता माझ्या घरी यायचं नाही. आपण केवळ पब्लिक प्लेसमध्ये भेटणार आहोत आणि मला फक्त 'ते' नकाराचं कारण ऐकायचंय कारण त्यामुळेच मला खूप मानसिक त्रास झाला आहे मग ते काहीही असु दे! 


यावेळी हे सांगताना तिचं मन खूप शांत झालं होतं . आजवरचा तो उद्वेग, राग, त्रागा सगळंच जणू क्षणात शमलं होतं ! खरंतर ती इतकी प्रेमात होती त्याच्या पण तिलाच कळलं नाही इतके अलगद आपण याच्यापासून स्वतःला कसे बाजूला करू शकलो??  

कदाचित वयानी येणारी परिपक्वता यालाच म्हणत असतील! अनुभव खूप शिकवून जातो माणसाला! असाही एक अनुभव! ना गोड ना कटू! 

खूप न्यूट्रल करणारा !    

कॉफी आली तिने स्वतःच्या कॉफीचे पैसे ठेवले आणि म्हणाली टीटीएमएम! त्यानी चमकुन तिच्याकडे पाहिलं! हसत उत्तरली! अरे ! अजून आपल्या तशी घट्ट मैत्री झाली नाहीये ना! तीच्या वागण्याकडे बघून त्याला काय रिअॅक्ट करावं कळलेच नाही! तो कसानुसा हसला ! पण अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला त्याने पटकन विचारलं तुला कसं कळलं मी आता इथे आहे ते??

ती हसली! फेसबुकला त्याच्या 'त्या' फोटोखाली एक कमेंट तिने टाकली! " इथे नेस कॉफी चांगली मिळते! नक्की ट्राय कर " .त्याच्या mobile नोटिफिकेशनमुळे त्याची तिच्यावरची नजर हटली आणि त्यानी ती फेसबुक कमेंट वाचली . . .

तिच्याशी बोलायला म्हणून त्याने तिच्याकडे मान वर करून पाहिलं. . पण ती! ती! त्याला निघून जाताना दिसली. . . पाठमोरी!  की पाठ फिरवून !


तिला असं जाताना पाहून त्याच्या काळजात एक कळ उमटली!

तोही क्षणभर विचारात पडला, आपण जे वागलो ते बरोबर होतं ना? पण, पण जेव्हा तिला माझी बाजू कळेल, तेव्हा ती आपसूक मला समजून घेईल! अर्थात हा कयास आपला आहे, 

त्याला आता तिच्या बरोबरचे घालवलेले क्षण आठवू लागले तिचा मोकळा स्वभाव, 

नेमकं, नेमकं ह्याच स्वभावाच आपल्याला आकर्षण वाटलं आणि कदाचित ह्याचं स्वभावामुळे आपण हिला दूर लोटतोय.. 


त्याला त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीचा प्रसंग आठवला... 

तिने हे आपल नातं तिच्या ग्रुप मध्ये अगदी सगळ्यांना सांगून टाकलं.. ही जरा सुद्धा रिझर्व नाही का राहू शकत? 

मला अजिबात इतक सोशल झालेलं आवडतं नाही.. आणि ही.. हिच्या तोंडात तीळ भिजत नाही.. नाही म्हणायला हा गुण तसा प्रत्येक बाई त असतोच.. पण जर आता ही एकल पालकत्व स्वीकारून जगतीये तर जरा भान नको.. किती तिचे मित्र.. त्यांचं late night कॉल्स करणं आणि काय त्या वाट्टेल त्या विषयावरच्या गप्पा...  

नाही.. म्हणजे मी काही इतक्या कोत्या वृत्तीचा नाहीये.. माझी मित्र असण्याबद्दल ना देखील नाहीये.. मी ही सोशल आहेच की.. पण हिच्या सारख सतत माणसात हरवणं मला नाही जमत,, 

तिला तस आडून आडून सुचवून ही पहिल कि आपण? 

असो तिचं आयुष्य आहे... मुळात ती मैत्रीण म्हणून बेस्ट च आहे पण तिचं व्यक्तिमत्व आपल्याला जड जातंय.. तसेही आता आपले विचार, सवयी आपण इतक्या पटकन कुणासाठी बदलणं.. नाही जमणार.. 

तिला मी टापटीप राहणारा.. वेगवेगळ्या विषयावर बोलणारा सगळ्या गोष्टींमध्ये रस घेणारा.. असा काहीसा अपेक्षित आहे... खूप फिल्मी वाटत मला.. 

साधी सवय ! सकाळी पेपर वाचायची माझी... पण ही.. फेसबुक वरच्या चारोळ्या कथा.. यातलं काहीसं वाचते.. मला म्हणे त्याच त्याच पॉलिटिक्स accident खून मारामाऱ्या बलात्कार ह्या नेगेटिव्ह गोष्टी का वाचू? आणि ह्यानी दिवसाची सुरुवात?? छे छे अजिबात शक्य नाही!! B positive always !!

मुळात जर आमचं लग्न झालं तर ते टिकेल का? अशी शंका सतत मनात येत राहते... मला तसही माझ्या स्वातंत्र्यावर गदा यायला नको अस नक्की वाटतंय.. पण जेव्हा पासून हिला भेटलोय.. ती मला सतत कशात ना कशात गुंतवत ठेवतीये असा का फील येतोय? मग ते तिचं friend circle असो किंवा तिचे निरनिराळे छंद... 


तिच्या साठी हे लग्न आणि आमच्या नात्याकडून खूप जास्त अपेक्षा दिसतायत... आपली पिल्लं सुद्धा हिला आणि तिच्या लेकाला कशी accept करतील ह्याचा अंदाज घेऊन झालाय.. पण मुळात आडनेड्या वयातल्या पोरांना ही दुसरी आई नकोच आहे.. 

शेवटी हे नातं जर आज जोडलं तर भविष्यात किती टिकेल याची कल्पना पुरती आलीये आपल्याला... 

इकडे त्याचे हे विचार... नकार कळवायला आणि तिकडे तिच्या विचारचक्रात हा मात्र केंद्र स्थानी... 


त्याच्या या स्वमग्नते मुळे आज ती याच्या पासून कायमची दुरावली जाणार होती...  


तिला ही कुठे तरी हे नातं विरतंय हे जाणवत होतंच पण त्याच्यावरच्या गाढ प्रेमापायी आणि भविष्यात बायको अशी हक्काची प्रेमळ हाक ऐकण्यासाठी ती काहीही करायला तयार झाली होती... 


बायको ! हम्मम.. तिला पाचवीत off पिरियड ला विचारल होत.. शाळेतल्या बाईनी.. काय ग मोठे पणी तू कोण होणार?  हिच उत्तर : बायको.. सगळा वर्ग फिदीफिदी हसला होता... पण हिच्या मनातली भातुकली तिला मोठेपणी मांडायलाच मिळाली नाही.. नवर्याच्या दारू पार्ट्या आणि व्यवहारशून्य वागण्यामुळे केवळ हप्ते भरणारी आणि जेमतेम घर चालवणारी बायको होता आलं.. तिच्या मनीचा हळवा कोपरा जपावा अस एकदाही तिच्या नवऱ्याच्या मनात आल नाही.. त्यामुळे पदरी आला घटस्फोट आणि एकुलत्या एक मुलाचं एकल पालकत्व.. 


बायकांना अपेक्षित असत ते हळवं होणं पण पुरुषांना मात्र तो दुबळे पणा वाटतो .. rather काही अर्थी फिल्मी पणा वाटतो.. 


आतां जो जोडीदार तिला भेटला त्याच्या कडून नेमक्या ह्याच अपेक्षा तिने ठेवल्या.. मनानी अजूनही ती पंचविशीतच अडकली होती.. अलवार स्पर्श.. निसटते.. घायाळ कटाक्ष.. आपली हुरहूर त्याला कळण.. आणि वय उलटून जातं असलं तरी न शमलेल्या आपल्या सुप्त गरजा.. हे सगळं त्यानी ओळखून आपल्याला साथ द्यावी... इतकीच माफक अपेक्षा... असो.. पण इथेही निराशाच पदरी आलीये... पण खचून जाणार्यातले आपण नक्कीच नाहीयोत.. योग्य वेळी त्याची पारख झाली हेच उत्तम.. तिच्या विचारचक्राला तिने विराम दिला.. अगदि पूर्ण विराम !


आज त्यांच्या भेटीचा दिवस उगवला.. ती आणि तो पुन्हा एकदा समोरासमोर बसले...त्याच हॉटेल मध्ये .. अवघडलेपणा केव्हाच संपला होता त्यांच्यात.. . खूप शांतपणे त्यानी तिला सांगितलं... मला वाटलं होत जुळतील आपल्या तारा.. पण त्या छेडल्या तर त्यातून जे ऐकू आलं मनात... तो थांबला.. तिच्या मनाचा अंदाज घेत तो पुढे बोलणार इतक्यात.. त्याच अर्ध वाक्य तिने झटकन पूर्ण केलं.

"श्रवणीय संगीत नाही ऐकू आलं ". हेच म्हणणार होतास ना..  

हो !.. त्याचा दीर्घ pause.. ऐक ना.. पण मैत्रीण म्हणून तू मला खूप आवडलीयेस.. हवीये मला तुझी मैत्री... कायमची !..


तिने त्याच्याकडे पाहात उत्तर दिलं.. "मैत्री आधीही होती! आणि आता ही राहील.. मधला काळ जो मी जगलीये तुझ्याबरोबर त्या काही सुखद क्षणांसाठी... थँक यु !..


ती उठली .. एक गोड़ स्मित हास्य ओठांवर सजवून तिने त्याचा निरोप घेतला.. आणि ती मार्गस्थ झाली... आज तिने ह्या जुन्या नात्या कडे पाठ फिरवली असली तरी मनात उमेद अजून शिल्लक होती... एक जुनी तिचीच चारोळी तिला आठवली...


स्पंदने अन स्पर्श माझे 

जरी मी तुजला वाहिले 

परी फिरुनी माझिया मनी

मम 'आत्मभान' ते जाहले... 



Rate this content
Log in