Manasi Gangal

Horror Romance

3  

Manasi Gangal

Horror Romance

पाडवा

पाडवा

2 mins
359


अहो.. उठा नं.. आज पाडवा आहें...ती लडिवाळपणे कुजबुजली.

झोपू दे गं... तो कूस बदलत म्हणाला..

अरे... आज आपला दिवस आहें.. ते काही नै.. उठा ना.. 

सगळे उठायच्या आत तुला उटणं लावायचयं... स्वर चढला..

तो डोळे चोळत उठला.. 

उजव्या हातानं चष्याच्या केस मधून "चक्षु" धारण करत मोबाइल वर वेळ पाहत म्हणाला...

अगं.. पहाटेचे 3 वाजलेत

इतक्या मध्यरात्री काय उठवतेसं...

ती आता त्याच्या अलगद जवळ आली...

तरंगतच होती..त्या मदहोश ख्वाबोमें...

त्याच्या मानेवरून.. पाठीच्या कण्यावरून अलगद बोटं फिरवत त्याच्या कमरेला हाताने विळखा घातला...

तो ही त्या मोहाला बळी पडला..

काही क्षण एकमेकांना न्याहाळण्यात गेले...

मग लक्षात आलं...

अरे... ही तीच साडी नेसलीये..

किरमिजी रंगाची खण साडी आणि त्यावर तिचं लाडकं चोळी फॅशनच मागे गाठ बांधलेल हिरवं ब्लाउज...

त्यानं मुद्दाम तस्स शिवायला लावलेलं..

अर्थात फक्त त्यांच्या स्पेशल मोमेन्टसाठी...

तिच्या सम्पूर्ण अंगावर पारंपरिक दागिने होते, हिरवा चुडा होता..

अगदीच मधुचंद्राला नटली होती..

तश्शीच दिसत होती त्याची मृगया...

तो थट्टेनं म्हणायचा ही...

तुझ्या नावानं, रूपानं अन गुणानं तू नेहमीच माझी 'मृगया' करतेस...

तिच्या मानेवर त्याच्या कुंदकळ्यांनी हलकेच खूण उमटवत तो तिच्यात विरघळू लागला... प्रत्येक क्षण त्यांच्यातला प्रेमाला, आकर्षणाला उसळवत राहिला... काही क्षण द्रुत लयीत तर काही विलंबित लय रंगवू लागले... तिच्या प्रत्येक रोमारोमातून कस्तुरी गंंध दरवळू लागला आणि त्याच्या प्रत्येक हालचाली तिला रोमांचित करू लागल्या.. स्पर्श अत्तराची कुपी जणु उघडावी अन मनमुराद सुगंध उपभोगावा तसें ते एकमेकांना उपभोगत रिते होऊ लागले...

अन एका बेसावध क्षणी तो अर्ध ग्लानीत असतानाच ती बाजूला झाली...

विखुरलेली वस्त्र सावरत आली तशी अलगद निघून गेली...


आज पुन्हा एकदा पाडवा साजरा झाला...

तिला जाऊन आज 12 वर्ष झाली...

आज ही येते ती... तिच्या हक्काची ओवाळणी घ्यायला..


काय झालं..? संदर्भ लागला नाही... मगाशी म्हणाले ना...

ती अलगद जवळ आली.. 'तरंगत'


हम्म्म्म... बघतीये ती तुम्हाला... आशा आहे तुम्ही तुमच्या "तिला "मनाजोगती ओवाळणी" दिली असेलच...😉


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror