तांत्रिक भाग ४
तांत्रिक भाग ४
तांत्रिकांन एकांतात भेटायला सांगितल्यानंतर धर्माच्या जीवाची घालमेल सुरू झाली. त्याला असे एकांता भेटणं योग्य होईल का? तो काय म्हणतो? तिथं काय होईल? तिथे जाऊन आणखी काही अ आबदा येणार नाही ना? शेवटी तो तांत्रिक आहे त्यावर कितपत विश्वास ठेवावा? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्यापुढे आव असून उभा राहिले. पण दुसरीकडे तांत्रिकाला भेटल्यामुळे आपला फायदा होईल. कुस्तीसाठी मेहनतर आपण करतच आहोत पण त्याचबरोबर काही शक्तींचा आधार घेतला तर आपल्याला कुस्ती जिंकनं आणखीन सोपं होईल. आपण अनेक कुस्त्या जिंकल्या तर आपलं खूप मोठं नाव होईल.पुढ जाऊन तालमीवर सुद्धा आपला धबधबा निर्माण होईल. तालीम सुद्धा आपल्या ताब्यात येईल ! आपले पेपर ला फोटो येतील. आपल्याला भरपूर पैसा मिळेल. घरातली गरीबी दूर होऊन मोठं घर बांधता येईल. गाडी घेता येईल. मोठा सुखाचा संसार होईल. अशा येक ना अनेक प्रलोभनांनी त्याचा मनाचा डोह ढवळून निघत होता.
किरिक तांत्रिकाची आणि धर्माची बातचीत तालमी पुढच्या रोडवर झालेली असल्याने इतर मुलांनी ती पाहिली होती. त्यामुळे त्यांनी ती माहिती बाळू वास्तव्याला सांगितली. दुसऱ्या दिवशी बाळू वस्तादानं तालमीत आल्यानंतर धर्माला सांगितलं "हे बघ धर्मा आपल्या तालमीत जो प्रकार घडला त्यात किरिक तांत्रिकांन आपल्याला मदत केली हे खर हाय पण! त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही! त्यानं तुला काहीतरी वाबड्या लावल्या असतील, कुस्त्या जिंकण्यासाठी, मोठं होण्यासाठी आपल्या मेहनतीवर, जिद्दीवर ,चिकाटीवर आणि कष्टाच्या सातत्यावर लक्ष द्यायला हवं. असं चुकीच्या मार्गानं मोठं होण्याचा प्रयत्न करणं आपल्यावरच उलटू शकत!" धर्मालाही तो काय सांगतोय, त्याचा इशारा काय आहे हे कळत होतं पण! त्याच्या मनावरती हळूहळू प्रलोभनांचं जाळ घट्ट होत होतं, ज्याच्या दाट सावलीतून बाळू च्या शब्दांचा प्रकाश खाली उतरत नव्हता. त्याला त्याच अंधाराची साखर झोप गोड वाटत होती.
तो ऐकूनही न ऐकल्यासारखं करतोय हे बाळूच्या लक्षात आलं. पण आपण जास्त बोललो तर तो तालमीतून बंद होईल म्हणून बाळून त्याच्या न समजून घेण्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याला समजावून सांगितलं आणि विषय तिथेच सोडून दिला.
त्या दिवशी कुस्त्यांचे चार डाव झाल्यानंतर धर्मा आणि त्याचे पाच सहा मित्र बोलत बसले त्या वेळेला धर्मा त्यांना म्हणाला "याला म्हणायची मेहनत! असं रोज करत राहिलाव तर यंदाच्या वरसी सगळ्यांचच नाव मोठं होणार बघ! यंदा तर साक्रीची जत्रा बारा वर्षांनी भरती आहे आणि त्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस दहा हजार आणि ढाल आहे. तवा त्यासाठी मी माझं नाव दिलयं समोर कंचाबी पैलवान असू दे त्याला चित्रपट केल्याशिवाय सोडणार नाही बघ !
तसा किसना म्हणाला "आणि हजारात बक्षीस म्हणतोस मग बाहेरच कसलेलं पैलवान बी येणार की तिथं तुझा निभाव लागायला नको का? धर्मा म्हनाला "का लागत नाही? आर! त्यासाठी काय करायचं ते सगळं मी करायच लागलोय. आणि एक डाव टाकणार हाय! त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर यायला पाहिजे. तसा किसना म्हनाला "आणि कुठला डाव आणि त्यात आम्ही काय करणार आहे बाबा!" तसा धर्मा म्हणाला किरीक तांत्रिका कडं जायला एवढी मदत मला करा! बाकीचे मी बघतो. तसा सकरा म्हनाला "या आणि किंदरात कुठ चाललास! काय तांत्रिक आहे तो भयान! तुला आणि काय मंतर मारलाय त्यनं! बोलला म्हणजे काय तुला मदत करलं कशावरनं?आणि काहीतरी ब्याद अंगावर आली म्हणजे मंग?" तसा धर्मा म्हनाला "तुम्हाला म्हणून तर बरोबर चला म्हणतोय. तुम्ही लांब राहून नुसती पाळत ठेवा! मी त्याला भेटतो आणि लगेच येतो". तसं कचरत कचरत साऱ्यांनी माना हलवल्या.
त्या दिवशी रात्रीच्या अंधारात त्यांनी किरीक तांत्रिकाकडे जायचं ठरवलं.आणि आठ वाजल्यानंतर ही मुलं अंगावर चादर कांबरुन करून घेऊन तोंड फडक्यांनी बांधून घेऊन तालमीच्या समोरच्या वाटेनं किरीक तांत्रिकाकडे निघाली. तसा किसना म्हणाला "अजून चांद कुठं दिसत नाही!" तसा किसना म्हणाला "आता आठ वाजलेत आणि एवढ्या लवकर कसा चांद दिसायचा तुला?" धर्मा म्हनाला "आता चांद उगवायचा तो किरीक तांत्रिकाच्या झोपडीतच बघं!" असं म्हणत सारे एकजुटीने वाट कातरत निघाले होते. सभोवताली दाटलेला काळोख आणि त्यातून पुसट दिसणारी वाट म्हणजे सर्वांच्या जीवाचा थरकाप होत होता. पण बळ एक वटून ती निघाली तेवढ्यात किरीक तांत्रिकाचं झोपडं दिसायला लागलं .
आतून काहीतरी मंत्रांचे उच्चार त्यांना ऐकू येत होते. एक धुराची लाट सुद्धा पसरलेली होती. दूरवर कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता! झोपडीच्या भोवतीच्या उंच चिंचच्या झाडावर मोठी मोठी वटवाघूळं आक्रोश करत होती. अशा परिस्थितीत साऱ्या मुलांना इकडे का आलो! असं झालं होतं. पण !धर्माच्या आग्रह खातर त्यांनी हे पाऊल उचललेलं होतं. झोपडं जवळ आल्यानंतर धर्म म्हणाला "गड्याओ तुम्ही आता इथचं थांबा! मी जाऊन येतो. आणि लक्षात ठेवा मला जर काही शंका वाटली तर मी किसना! किसना म्हणून दोन वेळा हाका मारीन!आणि अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्ही होऊन झोपडीत या! मी लवकरात लवकर बाहेर पडायचं बघतो".
असं म्हणून धर्मानं बळ एकवटलं आणि तो झोपडीकडे निघाला. झोपडीचे दार उघडचं होतं .आत मध्ये जणू लालबुंद विस्तवाचा निखार पसरलेला होता. किरीक तांत्रिक एकटाच मोठ मोठ्याने "हिम क्रीम" असं बडबडत होता. त्याच्या समोर मानवी डोक्याची कवटी होती. त्याच्यावरती तो काही अंगारा कुंकू हळद टाकत होता.
हे पाहत असताना धर्माच्या अंग अंगातून घामाच्या धारा सुटल्या होत्या! झोपडीत आत येण्यासाठी धर्मा पाऊल ठेवतच होता तितक्यात! किरीक तांत्रिक ओरडला "ये धर्मा ये !मी तुझीच वाट बघत होतो! मला माहित होतं आज तू येणार !
आज दिवस भारी निवडला आहेस बघ !याला म्हणायचं मोहतुर! आज अमावस्या हाय! माझी लाडकी अमावस्या! असं म्हणून किरीकन अकराळ विक्राळ हसण्याचा आनंद घेतला. त्यांऩ अमावस्या शब्द उच्चारल्याबरोबर धर्माच्या डोळ्यासमोर काळ गुडुप आभाळ भरून आलं! तो जे मुलांना म्हणत होता ती झोपडीत चांद दिसणार या शब्दाची त्याला आठवण झाली !आणि ही काय बैदा झाली बाबा! त्याच्या काळजात धस झालं !आणि मी आलोय हे किरीकला कसं कळालं? या अंधारात त्याने कस जाणल? प्रश्नांचा जंजाळ त्याच्या मनात जागं झालं.
तसा किरीक म्हणाला "घाबरू नकोस आत ये. तुझ्यासाठी मी समदी व्यवस्था करून ठेवलीय ! इकडे समोर ये माझ्यासमोर बस". किरीक त्याला बोलवत होता आणि हळूहळू -धर्माच्या मनावरती काही वेगळाच परिणाम होऊन तो त्याच्याकडे ओढला जात होता. धर्मा निशब्द झाला होता. तिथे पडलेल्या अंगार्यानं हळदीकुंकवानं त्यांन स्वतःच्या तोंडाला माखून घेतलं त्याच्यावर जणू किरीक तांत्रिकाचा अंमल सुरू झाला होता घामाच्या धारांनी भिजलेला धर्मात त्या हळदीकुंकवाने विचित्र आणि भयान दिसू लागला होता त्याचा त्याच्यावरच ताबा उरला नव्हता. तसा किरीक म्हणाला "बस खाली बस" तसा धर्मा खाली बसला.
किरीक तांत्रिकाच्या हातात एक हाडाचा भाग होता ज्याला समोरच्या बाजूला धारदार शस्त्र जोडलेलं होतं ते किरिक न धर्माच्या अंगावरून पाच वेळा फिरवलं त्यानंतर धर्माला आपण वेगळ्याच ठिकाणी असल्याचे जाणवलं. मंद बेधुंद झाल्याचं त्याला जाणवू लागलं. आपण कोण कोठे आलोय काय करतोय हे सार तो विसरून गेला. हजारो विंचवांनी एकाच वेळी नांग्या मारल्यासारखा तो शहारून गेला. ते हाड बाजूला ठेवत तांत्रिक म्हणाला "धर्मा आता कसं वाटतंय !तसा विकट हास्य दाखवत धर्मा म्हनाला "महाराज आता मला स्वर्गात असल्यासारखे वाटतं माझ्या अवतीभवती हिऱ्यांच्या आणि मोत्यांच्या ऱ्हास पडलेले आहेत. माझ्यासमोर दास दासी मदिरा 56 प्रकारचे भोग उभे आहेत. तुम्हीच मला हे सुख देऊ शकता महाराज तुमच्या चरणात माझा नमस्कार आहे"
तसा किरीक म्हणाला "तुला मी म्हटलं नव्हतं का !तुला एक वेगळीच दुनिया दाखवतो म्हणून! आता इथून पुढे बघ मी तुझ्या जीवनाचा कायापालट करून टाकतो ! प्रत्येक गोष्टीत जिंकणार म्हणजे जिंकणार! सारे भोग तुझ्या पायाशी लोळण घेणार. तुझ्यापुढे कोणताही रुस्तम पैलवान येऊ दे दोन मिनिटात तो चितपट होणार."तसा धर्मा म्हणाला "होय! होय! मी आता तुमचाच आहे आणि तुम्ही सांगाल ते ऐकणार. तांत्रिक म्हणाला "हे बघ तू इथं आला आहेस हे सारं पाहिलेस या गोष्टीचा आस्वाद घ्यायला मोठे नशब लागतं हे कोण्या एरिया गबाळ्याचं काम नव्हं मी कुणालाच असं जवळ करत नाही पण तुझा स्वभाव मला पटलायं! पण ही मजा, ही दौलत, हे कोणालाही सांगू नकोस तुला मी ही मंतरलेली अंगार्याची पुडी देतो ती सदैव आपल्याजवळ ठेव अगदी आंघोळ करताना सुद्धा बाजूला काढू नकोस आणि आठवड्यातून एकदा मला येऊन इथेच भेटत जा. तुला पुढची सगळी आखणी मी करून देत जातो. धर्माला त्याच्या शब्दांनी जणू पाशात ओढलं होतं धर्माला ना शरीराची जाणीव होत होती ना भूक तहान जाणवत होती आज पर्यंत त्यांना अशा प्रकारची अनुभूती कधी घेतलीच नव्हती हे उच्च प्रकारची विद्या सापडण्याचा त्याला भास होत होता त्याच्या इतका शक्तिशाली कुणीच नाही असं त्याला वाटत होतं की सारी त्या तांत्रिकाच्या मोहम्मयेची जादू होती आणि बिचारा धर्मा त्यामध्ये फसत जात होता पण थोड्याच वेळात गिरी तांत्रिकांना त्या हाडाच्या अवजारांना पुन्हा त्याच्यावरती काही मंत्रांचा मारा केला आणि हळूहळू धर्मा पुन्हा जागृत अवस्थेत आला जागृत अवस्थेत येतात त्याच्या सगळे लक्षात आले आणि पुन्हा त्याला भीती वाटू लागली तसा किरी तांत्रिक म्हणाला तुला घाबरायचे अजिबात आवश्यकता नाही तू आता माझा चेला आहेस इथून पुढचं सगळं तुझं काम मीच करणार फक्त मी सांगतो तसं तू करत जायच धर्मा मनाला होय होय तुम्हीच आता माझं गुरु तसा लिरिक म्हणाला हे बघ आता तू जा जाताना मागे पाहू नकोस आणि इथून पुढे कसलाही विचार करू नकोस फक्त मला आठवड्यातनं एकदा भेटत जा तुझं सार सुराला लावतो. तुला मी वचन दिले! तुझा झेंडा बारा गावात फडकल्याशिवाय राहणार नाही . हे माझं वचन आहे! आणि हे बघ मला हेही माहिती आहे की तुझ्याबरोबर तुझे मित्र पण आलेतं . असू दे तू पहिला वेळ आलायस! घाबरणं स्वाभाविक आहे .पण असं कोणाला आणायचं काही आवश्यकता नाही तु मला भेटतोस हा भेद ते गावभर करू शकतात. त्यामुळे पुढल्या वेळी एक लाच ये!"
(क्रमशः)

