तांत्रिक - भाग 3
तांत्रिक - भाग 3
तालमीतल्या मुलांनी आता चांगलाच वेग धरला होता. एव्हाना दिवाळी होऊन गावोगावच्या जत्रांना सुरुवात होत होती. त्यामुळे प्रत्येक जत्रेत कुस्त्यांचा कार्यक्रम ठरलेलाच असायचा. या निमीत्ताने मुलांना आपली कला पैलवानकी दाखवायला खूप मोठा वाव होता. शिवाय बक्षीस सुद्धा होतीच. खरंतर बक्षीसांपेक्षा कुस्ती जिंकलेल्याचा आनंद मुलांच्यासाठी खूप मोठा होता. त्यामुळे मुलं खूप काळजीने सरावाला लागलेली होती. मुलांना असा सराव करताना पाहून बाळू वस्तादला सुद्धा बरं वाटायचं. पण एक दिवस तालमीत काही आक्रीतच घडलं सकाळी तालमीत मुलं पोहोचली आणि कुस्तीच्या आखाड्यात त्यांना काही लिंबू पडलेले दिसले! ज्यांना हळद कुंकू न माखलं गेलं होतं काही टाचण्या सुद्धा मारल्या गेल्या होत्या! ते पाहून मुलांना घाबरायला झालं. एकाने थेट बाळू वस्तादाच घर गाठलं आणि त्याला बोलवून आणलं. बाळू नं पण ते लिंबू पाहिले सारे गोळा केले. आणि तो मठ्ठ होऊन खाली बसला.
त्याच्या मनात विचारांचं काहूर जागं झालं. त्याच्याबरोबर मुलं सुद्धा कावरी बावरी होऊन बसलेली होती. त्यातच एकानं धाडस करून बाळूला विचारलं "काय म्हणायचं आणि काय प्रकार" बाळू म्हणाला "अरे! हे गाव जितकं चांगला आहे तितकं वंगाळ बी हाय! इथल्या साऱ्यांनाच तुमची मेहनत बगवते असं नाही. पण बघू आपण! हे धाडस कोणी केलं? काल तुम्ही तालीम बंद करताना कुणी काही पाहिले का?" तसा शिरपा म्हणाला "नाही बा आम्ही आपला सराव करून दार बंद करून हत्या व्यवस्थित लावूनच गेलो होतो! हे कोणीतरी बाहेरच्या जावळीतूनच आत फेकल असणार रातीला!" बाळू म्हणाला "तुम्ही गावाकडे जाताना तर कोणाला इकडे येताना पाहिले का? तशी मुलं म्हणाली "तसं रोजचीच लोक होती" धायगुडेचा किसना म्हणाला "दोन माणसं मला जरा वेगळी वाटली !बर का! त्यांच्या तोंडाला फडकी बांधलेली होती. हातामध्ये पिशवी होती". तसा बाळू म्हणाला " बघूया कोण आहे ते तुम्ही आपलं सराव चांगला करा पोरांनो !जत्रा जवळ आली यंदा एक बी डाव हरला नाही पाहिजे आपण!"असं म्हणून बाळू तालमीच्या बाहेर येऊन बसला. तसा एक जण मुलगा म्हणाला "बाळूमां हे काम त्या किरीक तांत्रिकाच नसल नव्हं". तसा बाळू म्हणाला "आता कसं सांगावं बाबा! तो असं धाडस करणार नाही पण शेवटी तांत्रिक! मी करतो चौकशी तुम्ही बिनघोर सरावाला लागा. आणि हे काय बी डोक्यात घेऊ नका. जत्रा जवळ आल्यात तुम्हाला मेहनत चांगली करायला पाहिजे यंदा कुस्त्याचा एक बी डाव हरला नाही पाहिजे तुम्ही. तशी मुलं हा हा म्हणत आखाड्यात उतरली. तोवर एकटा म्हणाला "अरे थांबा असं लिंबू टाकल्यानंतर ही जागा जरा शुद्ध करून घेतलेली बरं!" तसा बाळू म्हणाला "ती आणि कशाने करतोस" तसा तो म्हणाला "आमच्या घरात गाय आहे देशी! तिचं गोमूत्र घेऊन येतो आणि शिंपडतो" बाळू म्हणाला ते बेस होईल तसंच कर! उगा तुमच्या मनात मळ नको" त्या मुलांना पळत जाऊन गाईचं गोमूत्र आणलं ते शिपडून मुलं सरावाला लागली पण बाळूच्या डोक्यातला विषय काय जात नव्हता.
तो तालमीच्या बाहेर विचार करत बसला होता इतक्यात योगायोगाने किरीक तांत्रिक तिथनं निघाला होता. बाळूच्या डोक्यात हा विषय होताच. त्याने किरीक तांत्रिकाला हटकलं !झाल्या प्रकाराबद्दल त्यांनं तांत्रिकाला विचारायला सुरुवात केली. तसा किरीक म्हणाला "हे बघ बाळू मी तांत्रिक आहे म्हणून तू माझ्यावर संशय घेतोस खर गावातलीच पोर आहेत मी कशाला तसं वागेल! आणि मला वागायचं असत तर मी कधीच वागलो असतो" बाळू म्हणाला "हे बघ माझं डोकं काम देत नाही! मी लई कष्टाने ही तालीम उभा केली आहे हि मुलं गोळा केल्यात त्यांच्यावर असं काहीतरी वाईट वंगाळ झालेलं मला चालणार नाही" तसा किरीक म्हणाला "ते बरोबर आहे पण ते जे लिंबू आहे ते कुठे आहे ते जरा माझ्याकडे दे" बाळू ना त्याला ते लिंबू दाखवले. मग तांत्रिक म्हणाला "अरे ये येणाऱ्या पौर्णिमेला फुलंब्री च जत्रा नाही का! तिथे तुझी पोर जाणार आहेत बहुतेक त्या गावच्या मांत्रिकानेच हे केलेलं काम दिसते कारण लिंबू आणि टाचणी लावायची पद्धत बघून मी सांगू शकतो हे कोणी केले" तसा बाळू म्हणाला "खरं सांग! तू म्हणशील ते तुला देईन पण याचा उलगडा व्हायला हवा" तसा किरीक म्हणाला "अरे होय शंभर टक्के हे दुसऱ्या गावच्या तांत्रिकाचं काम आहे पण तू काळजी करू नकोस याचा तोडगा माझ्याकडे आहे मी बरोबर यातून तुझ्या पोरांनी बाहेर काढतो फक्त एक अट आहे आत्ताच्या आत्ता तालीम बंद कर दोन दिवस तालमीकडे कोणीही फिरू नका मी सार व्यवस्थित करतो मग परत सरावाला सुरुवात करा आणि ज्या दिवशी तुम्ही जत्रला कुस्तीसाठी जाणार त्या दिवशी मुलांनी मला भेटायला लाव सार व्यवस्थित होते काळजी करू नकोस" बाळूला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता पण तो गावचा आहे आणि तो असं वंगाळ करणार नाही असंच त्यालाही वाटलं.आणि त्यानं त्याचा शब्द मानत तालीम बंद केली.
मुलांना घराकडे पाठवले. दोन दिवसानंतर मुलं तालमीत आली पुन्हा सरावाला लागली असं होतं यात्रेचा दिवस उजाडला. बाळू न मुलांना सांगितलं तुम्ही तीन पोरं जी फुलंब्रीच्या जत्रत कुस्तीला जाणार आहेसा सकाळी लवकर किरीक तांत्रिकाने तुम्हाला भेटायला सांगितले" मुलांनी ही मान्य केलं यात्रेच्या दिवशी सकाळी तांत्रिकांन त्यांना एकेक अंगारा पुडी दिली आणि त्या जत्रेत गेलेले तिन्ही पैलवान जिंकूनच परत आले. त्यामुळे बाळू वस्ताद आणि मुलांचा किरीक मांत्रीका वरचा विश्वास वाढला. त्यांनी आनंदानं किरीकला जिंकल्याचं सांगितलं. आपल्या अकराळ विक्राळ हसण्यानं किरकनं ते मान्य केलं.
ही सर्व घटना धर्मा पहातच होता त्याला मात्र काही वेगळ्याच विचारांनी घेरलेलं होतं. पण तो बोलू शकत नव्हता. किरीक तांत्रिकाची साथ घेतली तर कुस्ती जिंकायला खूप मदत होईल. असं त्याला वाटू लागलं होतं. त्यानं इतर साथीदारांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि सर्वांनी परत एकदा तांत्रिका कडे सवडीने जायचं ठरवलं. बाळू वस्तादला सुद्धा आता घाबरण्याची गरज नव्हती कारण की न त्याची सुद्धा मदत केलेली होती. एक दिवस सकाळी सकाळी मुलं तालमीत सरावात रमलेली होती आणि किरीक तांत्रिक बाहेरून जात होता. तसा धर्म लगबगिने पुढे झाला. आणि त्यांनं किरिक तांत्रिकाला हात जोडले आणि म्हणाला "तालमीवर आलेल्या बालंट तुम्हीच दूर केलं !सगळ्या मुलांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला अशा काही गोष्टी घडल्या तर मार्ग दावा!" तसा किरीक हसत हसत म्हणाला "अरे म्हणजे काय! कवाबी कवाबी या माझ्याकडे! कंचीबी अडचण असू दे दूर केलं नाही तर मला विचारा? धर्मा तू सत्य वाचनाचा दिसतोस तुला कुस्तीत न लय मोठे यश मिळणार आहे बघ! मला तुझं भविष्य दिसतंय पण जराशी अडचण आहे! त्यासाठी तू एकलाच येऊन मला एकांतात भेट तुला सगळं सांगतो"
(क्रमश:)

