Vilas Yadavrao kaklij

Tragedy Crime

3  

Vilas Yadavrao kaklij

Tragedy Crime

"सवत " भाग -४

"सवत " भाग -४

7 mins
209



क्रमाश:- भाग 4


सुगंधा नेहमीप्रमाणे तिच्या नोकरीच्या गावी येऊन पोहोचली. जुन्या खोलीमध्ये असलेला वर्षभरापूर्वी पसारा आवारण्यास तिला दोन दिवस लागले . सारा पसारा नीटनेटका लावल्यानंतर ती आपल्या नोकरीच्या जागी रुजू झाली . तोपर्यंत गावाने तिच्या जागेवर एक एका अनाथ मुलीची नेमणूक केली होती. ती पण एक अनाथ स्त्री होती .त्यामुळे ती  सुगंधा चे काम करत होती . आल्यानंतर तिला अतिशय वाईट वाटले तिची सारी हकीकत ऐकल्यानंतर सुगंधाला वाटले आपल्या सारखी तिची परिस्थिती होऊ नये म्हणून सुगंधाने तिलाही मदत म्हणून येण्यास सांगितले .पगारातून काही भाग देईल असे म्हणून तिने सुगंधा बरोबर मदतनिसांचे काम सुरू केले . साधारणता आठवडाभर अनेक चर्चांना तिला सामोरे जावे लागले. काय कारण होते ? कशामुळे इतक्या दिवस गावी गेली होती?..... या असंख्य कारणांना वेगवेगळी निमित्त सांगून तिने वेळ मारून नेली व आपल्या काम करू लागली .

तिने दाखल केलेली तक्रार त्याची दखल घेऊन आठवडाभरात पोलीस मदनच्या गावी जाऊन पोहोचले. ग्रामीण भागात पोलीस आल्यानंतर पूर्ण गावभर चर्चा होते व कशामुळे आली ? जणू गावात एखाद्या आपत्ती आल्या प्रमाणे सर्वांच्या कानोकानी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत त्याच गोष्टीची चर्चा ! सुरू होते . पोलीस चौकशीसाठी मदनच्या घरी आले अंगणामध्ये मदन चे वडील -आई बसलेले होते .पण पोलिसांनी मदन विषय चौकशी केली .कुठे नोकरी करतो ? काय करतो ? त्यांना पाहिजे असलेली सारी चौकशी केल्यानंतर घरामध्ये मदन च्या पत्नी विषयी विचारले . तेव्हा मदनच्या वडिलांनी दोघींना बाहेर बोलावले. पोलिसांनी संगीताला विचारले मदन विषयी, मुल किती ? मदन चे विषयी काही तक्रार ? घरि येतो कि नाही . त्याने दुसरे लग्न करण्याचे कारण विचारले नंतर रंजनाला सारी हकीकत विचारली. तेव्हा पोलिसांच्या भीतीने रंजनाने खरी खरी माहिती सांगितली. ऐकल्यानंतर पोलिसांचा संशय मदन विषयी आलेल्या माहितीनुसार थोडा लफडेबाज व लबाड माणूस असल्याचे त्यांनी निष्कर्ष काढला . व नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले . जाताना मात्र पोलीस येण्याचे कारण सांगितले की एका स्त्रीने त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो बलात्काराचा ! व फसवणुकीचा गुन्हा आहे . यासाठी आम्ही चौकशी करीत आहोत . ऐकल्यानंतर मात्र मदनच्या सवतीच्यां पायाखालची जमीन सरकली .कारण त्यांना दोन वर्षापूर्वी मदनचे घरी येणे व शाळेच्या कामानिमित्त जास्त दिवस बाहेर गावी राहणे .तेव्हा त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती .गेल्या सहा महिन्यापासून मदन हा प्रत्येक सुट्टीमध्ये घरी येत होता. व पूर्वीपेक्षा जास्त प्रेमाने वागू लागला त्यामुळे बदल हा त्यांना शंकेचे कारण ठरत होता .त्यांची शंका वाढू लागली. तिकडे मदन निवांत आपल्या नोकरीच्या गावी काही केलेच नाही किंवा कोणताच ससेमिरा आपल्या मागे नाही . अशा पद्धतीने तो निवांत वागत होता.

मात्र दुसऱ्या दिवशी मदन च्या शाळेवर पोलीस येऊन दाखल झाले ! व त्यांला हजर राहण्यासाठी समन्स बजावून गेले. तिसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी मदन निघाला . इकडे सुगंधाला ही सुगंधाने केलेले आरोप कोर्टामध्ये विचारण्यात आले . मदनवर तिने केलेले आरोप हे खरे आहेत किंवा खोटे यासाठी तिला पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र सुगंधा गावात दिवस गेल्याचे माहिती होऊ नये म्हणून दुसऱ्या गावी आली होती व त्या गावांमध्ये सुगंधा आणि मदन याविषयी वाईट असे कारण सांगत नव्हते .कोणत्याही प्रकारचा संशय येत नव्हता . त्यांची मैत्री पूर्व चांगला असा खुलासा मिळाला. सुगंधाला मात्र सारी घटना खरी असून सुद्धा तिला पुरावे मिळवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. तिने सांगितले बाळाला जन्म दिलेला आहे . त्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट आणले ! मात्र त्यावर नोंद करताना वडिलांचा ( मदन ) कुठेही उल्लेख नव्हता नेहमीप्रमाणे तिने सुगंधाने तिच्या गेलेल्या नवऱ्याच नाव टाकले होते. मात्र नवरा गेल्यानंतर या बाळाचा जन्म झाल्यामुळे पोलिसांना शंका निर्माण झाली. व त्यांना सुगंधा विषयी संशय येऊ लागला . ती विना कारण मदन वर आरोप करत आहे . व दुसऱ्याच पाप त्याच्या माथी मारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वकिलांनी प्रत्येक तारखेला वेगवेगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रथमदर्शनी अशी ठोस पुरावे सुगंधाला सादर करता येत नव्हते . कारण प्रतिष्ठेपायी तिने त्या बाळाचा जन्म दाखला आणला मात्र ते बाळ कुठे असे विचारल्यास तिने सांगितले आश्रमामध्ये आहे . तेथे चौकशी केली असता तिने सांगितलेली तारीख व बाळ झाल्याची तारीख यामध्ये तफावत आढळून आली .कारण तिने दाखल केलेल्या तारखेला एक स्त्री जातीचे व दोन पुरुष जातीचे बालक दाखल केल्याची नोंद त्या आश्रमात होती .मात्र दाखल करणारे नसल्याने बेवारस म्हणून त्यांची नोंद केली होती . सुगंधही अंदाजाने स्वतःचे बाळ सांगत आहे असा खोटा पुरावा मांडण्यात आला. तीला स्वतःचे बाळ असून सुद्धा स्वतः दाखल न केल्यामुळे अनाथालय च्या दारात टाकून गेल्याने ते मीच टाकले अस तिला सिद्ध करता आले नाही. निर्सगात जनावरांमध्ये एखाद्या जनावरांचे पिल्लू हरवल तर जनावर स्वतःचे पिल्लू ओळखू शकत . मात्र मानवामध्ये सर्व असून सुद्धा ? दाखवता आले नाही .कारण बाळा आईजवळ नसल्याने आई विषयी असलेले आकर्षण किंवा न पाहिलेले त्यामुळे बाळाने ही तिला ओळखले नाही . व बलात्काराचे आरोप कोणत्या गावी ? व कुठे ?झाला . तक्रार का नाही केली .? तिने नोकरीच्या गावी सांगितले मात्र त्या गावात मदन विषयी वाईट किंवा असे मदने केले याविषयी कोणी सांगितलेले नाही .कि मदन वर खोटेआरोप केले जात आहे असे सर्वांचे म्हणणे होते.

प्रत्येक तारखेला वकिलाला पैसे देणे व तालुक्याच्या गावी जाणे यामुळे सुगंधा चा ही पूर्ण पगार कोर्ट कचेरी मध्ये खर्च होत होता . तिकडे मदनचे ही तिच अवस्था झाली होती घरी दोन 'सवती'चे कुटुंब . आणि इकडे कोर्टाचा खर्च ! त्यामुळे त्यालाही पगार पुरेनासा झाला. त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. घरी पुरेसा पैसा नसल्यामुळे घरामध्ये सगींताचे व रत्नाचे भांडणाला सुरुवात झाली. म्हाताऱ्या आई-वडिलांना काही बोलता येत नव्हते . कमवण्यासाठी फक्त एकटा 'मदन ' होता .त्यामुळे कमी पैशामध्ये कुटुंब चालवणे रंजना व संगीता दोघांच्या भांडणाला सुरुवात झाली. "दोन बायका आणि फजिती ऐका " याप्रमाणे मदनाची अवस्था होऊ लागली .घरि भांडणे 'कलह व तिकडे कोर्टाच्या तारखा ! चालू असल्यामुळे खर्च वाढत होता . त्याचबरोबर आतापर्यंत कमवलेली इज्जत खराब होत असल्यामुळे मतद'न कडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदलला होता. कोर्टामध्ये प्रत्येक आठवड्याला गेल्यानंतर सुगंधाला वेगळे पुरावे विचारले जात होती मात्र तिला माहीत मिळत नव्हती त्यामुळे ती 'वेगळ्या ...... चालीची .बदचलन ! असं म्हणून संबोधण्यात येत होत व चांगल्या माणसावर आरोप आरोप केल्यामुळे तिच्यावर मदने मानहानीचा दावा दाखल केला..... साऱ्या गोष्टी घडून सुद्धा सुगंधाला केवळ समाजाच्या प्रतिष्ठेपायी व स्वत :ची इज्जत सांभाळण्यासाठी तिला कोणत्याही प्रकारचे पुरावे देता आले नाही . तेव्हा तिच्या मनामध्ये मदन विषयी सुडाची भावना निर्माण झाली. तिने सात्या गोष्टी सांगितल्या मात्र प्रथमदर्शनी पुरावा नसल्याने मदनला खोट्या केस मधून मुक्त केले..... मात्र इकडे सुगंधा... मनातून एखाद्या जखमी झालेल्या वाघिणी प्रमाणे वागू लागली. तिने मदन च्या घरी वेगळ्या प्रकारची माहिती देण्यास सुरुवात केली .मदन च्या घरी दोघांची चाललेली भांडणे व त्यामध्ये सुगंधाने टाकलेल" तेल ' यामुळे अधिकच भडका उठू लागला . त्यामुळे मदन घरी जाण्याचे टाळू लागला. पुर्वी केलेला बाहेरख्यालीपणा व स्त्रीसंख्य केलेली लगट यामुळे शरिरावर परिणाम होऊ लागला हळूहळू त्याचे वजन कमी होऊ लागले वेगळ्या प्रकारची लक्षणं शरीरामध्ये दिसू लागली . परिणामी त्याला दवाखाण्यात चक्कर मारावी लागली .सरकारी दवाखान्यांमध्ये गेल्यानंतर त्याचा रक्ताचा रिपोर्ट घेतला गेला . दुसऱ्या दिवशी सरकारी दवाखान्यात मधून त्याला बोलवण्यात ! आलं व सांगितले तू एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे ? तेंव्हा मात्र च्या आयुष्यात प्रथमच काजवे चमकले ! चा भास झाला . कारण आयुष्यामध्ये आपण केलेले पराक्रम !त्या चे परिणाम निसर्ग नक्की देत असतो . तो कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने शिक्षा करतो. याची जाणीव मदन ला झाली .डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले व त्याला घरापासून व पत्नी पासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला. हि बातमी घरी कळाली तर ? आपल्याला घरामध्ये सुद्धा प्रवेश मिळणार नाही . आणि घडले तसेच ! I कित्येक दिवस घरी 'न ' गेल्यामुळे वेगळ्या प्रकारची निरोप येऊ लागली . इकडे त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती . शेवटी मदनला रुग्णालयांमध्ये भरती व्हावे लागले . तेव्हा मात्र त्याला बघण्यासाठी कोणीही जात नव्हत ? प्रत्येक जण 'मदन 'ला शिव्याशाप देत होता .

नियती प्रत्येकाला जागा दाखवते याचा त्याला प्रत्यय आला होता. रोज त्याच्या तब्येती जास्त खराब होऊ लागली .एक राजबिंडा गोरा गोमटा तरुण काळा ठिक्कर पडला होता व शारिर एक सापळा झाला होता .आजाराची शेवटची स्टेज होती .मृत्य ने आम त्रणं दिले होणे . शारिर आता हालचाल ही करू शकत नव्हत. आणि एक दिवस नीयतीने त्याला शिक्षा केली. व मदन हे जग सोडून गेला ! ही बातमी जेंव्हा रत्नाला आणि संगीताला कळाली तेंव्हा मात्र आकाश कोसळल्या चा भास त्यांना झाला. वारस म्हणून त्याने फक्त संगीताची नोंद होती . नंतर रत्नाला ही कोर्टाचा आधार घ्यावा लागला . वारस ची नोंद करून मदन ची पेन्शन दोघींना समान हिस्सा मध्ये वाटप करण्यात . करण्यात आली . मदन चे 'शेव'घरी आणण्यात आल . अंत्यसंस्कार त्याच्या गावी आई-वडिलांचा समोर करण्यात आले .तेव्हा मात्र वडिलांना अतिशय दुःख झाले .


माझे स्वप्न पूर्ण करणारा????? तालुक्यामध्ये नाव कमावणारा ???  " मदन" होता व जाताना ? सारे कमवलेले ..नाव ;इज्जत; आणि माझे स्वप्न! सारे पुसून गेला! . मात्र जाताना दोन "सवती " या माझ्या पुढ्यात आणून सोडले होत्या या म्हाताऱ्या अवस्थेत आम्हाला यांचे भांडण आणि अर्धवट असा संसार बघण्याच दुर्भाग्य !.... याचा वडिलांनी धसका घेतला ...

संगीता- रत्ना यांना मात्र 'सावती' झाल्यामुळे आणि त्याच कारणाने सारे झाले होते . पुढील आयुष्य हे आपण चांगल्या पद्धतीने जगु शकणार नाही . व आपली सारी स्वप्न ? संपली होती . तेव्हा त्यांना आपण केलेल्या चुका .. त्यांची जाणीव झाली . एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा संसार त्याबरोबर स्वतःचा संसार कशा पद्धतीने मोडतो ? हे जर बघायचे असेल .अनुभवायचे असेल .

तर ?????.

आयुष्यात कधीही कोणाची....... "सवत"...... होऊ नका !


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy